Junnar.in जुन्नर

Junnar.in जुन्नर पर्यटन | संस्कृती | सौंदर्य
www.junnar.in

जुन्नर निसर्ग पर्यटन
https://www.facebook.com/junnarnisargparyatan

पुणे जिल्ह्याच्या सर्वात उत्तरेकडचा तालुका जुन्नर,
म्हणजेनिसर्गसौंदर्याची खाणच आहे.
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी हा तर मानिबदू. पण
त्याचबरोबर माणिकडोह, वडज, येडगाव, िपपळगाव जोगा अशी धरणं,
लेण्याद्री-ओझर सारखी तीर्थक्षेत्रे,
ट्रेकर्ससाठी हडसर, चावंड, जीवधन,निमगिरी, सिंदोळा, दुर्ग, ढाकोबा, हटकेश्वर असे किल्लेआणि गिरिस्थाने.
कुकडी,मीना नद्यांचा उगम
आणि ऐतिहासिक नाणेघाटसारखी अद्वितीय कलाकृती

या आणि अशा अनेक गोष्टी या परिसरात खूप मोठय़ा संख्येने आहेत.
जुन्नर म्हणजे किल्ले शिवनेरी,
लेण्याद्री, ओझर हे समीकरण मराठी माणसाच्या मनात अगदी पक्के आहे.
परंतु याशिवायही अनेक गोष्टींनी हा परिसर संपन्न आहे, वैविध्यपूर्ण आहे.
म्हणूनच तो ट्रेकर्स, पर्यटक,पक्षी निरीक्षक आणि पुरातत्त्वविद्यच्या अभ्यासकांना कायमच खुणावत असतो.
जुन्नरचा उल्लेख थेट इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून मिळतो. जीर्ण नगर या नावाने ज्ञात असलेल्या या ठिकाणाचा संबंध सातवाहन कुलापर्यंत जातो. पश्चिम भारतातील या संपन्न राजकुलाने ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ अशी बिरुदावली मिरवली होती. याच कुळातील राणी नागनिका हिने नालासोपारा ते पठण या प्रसिद्ध व्यापारी मार्गावरची वाहतूक होणाऱ्या याच नाणेघाटात एक लेणे खोदून काढले व त्यात एक ऐतिहासिक लेख कोरला आहे. अशी अद्वितीय कलाकृती अन्यत्र क्वचितच आढळेल.
नाणेघाटाच्या संरक्षणासाठीच जणू इथे शिवनेरी, हडसर, जीवधन, चावंड अशा दुर्गाची निर्मिती झाली असा या किल्ल्यांची भ्रमंती आणि त्य
न्याहाळता येणारा आसमंत नितांत रमणीय आहे. नुसते किल्लेच नव्हे तर कुकडेश्वरसारखे समृद्ध मंदिर पण याच परिसरातले. शिलाहारकालिन नमुना म्हणजे हे मंदिर होय. कुकडी नदीच्या उगमस्थानी पू या गावी अंदाजेइ.स.च्या १०-११व्या शतकामध्ये बांधलेले हे शिल्पसमृद्ध मंदिर आवर्जून पाहण्याजोगे आहे.याचबरोबर जुन्नर परिसरातील डोंगरांमध्ये पूर्वजांनी कोरूनठेवलेली विविध लेणी हे तर
अभ्यासकांचे कायमच आकर्षण राहिले आहे. जुन्नरच्या अलीकडे अंदाजे ३ कि.मी.वर डाव्या हाताला मानमोडी डोंगराम कोरलेली लेणी आपले लक्ष वेधून घेतात. मानमोडी, भीमाशंकर,भूतलेणे, तुळजा, अंबाअंबिका असा हा लेण्यांचा समुह इथे आहे. सध्या या लेण्यांमध्ये
मधमाशा मोठय़ा प्रमाणावर असल्याने तेथे जाणे धोकादायक आहे. सुमारे १४ लाख वर्षांपूर्वी इंडोनेशियातील टोबो नावाच्या ज्वालामुखीच्या बाहेर पडलेली राख (टेफ्रा),नारायणगाव नजीकच्या बोरी गावात येऊन पडलीये. नदीपात्राच्या कडेला या राखेचे थर पाहायला मिळतात. बोरी गावाला जातानाच वाटेत खोडद येथील महाकाय रेडिओ दुर्बणिी लक्ष वेधून घेतात.प्राचीन काळ ते आधुनिक वैज्ञानिक युग यांचा सुरेल संगम
आपल्याला जुन्नर परिसरात पाहता येतो. आळे गावातील ज्ञानेश्वरांच्य रेडय़ाची समाधी,नारायणगावचा किल्ला आणि शँपेनन प्रकल्प, पावसाळ्यातील रमणीय माळशेज घाट, खिरेश्व आणि हरिश्चंद्रगड,या आणि अशा अनेक गोष्टींनी समृद्ध परिसर आपली वाट पाहतो आहे. चार दिवस बाजूला काढून आणि नारायणगाव व जुन्नर ही ठिकाणे केंद्रस्थानी ठेवून आपण या परिसराची मनसोक्त भटकंती कर शकतो. एक दिवस नारायणगाव, आळेफाटा, माळशेज हा परिसर पाहायचा. दुसऱ्या दिवशी जुन्नर शहर, शिवनेरी,लेण्याद्री आणि पुढचे दोन दिवस कुकडेश्वर, जीवधन, नाणेघाट आणि हडसर, चावंड,हटकेश्वरसाठी ठेवायचे,असा कार्यक्रम ठरवता येईल. नुसते जुन्नर शहर पहायचे झाले तरीसुद्धा एक दिवस कमी पडेल इतक्या वैशिष्टय़पूर्ण गोष्टी या नगरात आहेत. पकी एक शिल्प महत्वाचे आहे.शिवपूर्वकालीन राजवटीमधील ऐतिहासिक खुणांमध्ये महत्वाचे असलेले हे शिल्प, सदर बाजारातील वेशीनजिकच्या दक्षिणेकडील बुरुजावर आहे. तर एका छोटय़ा दगडावरील द्वारशिल्प आहे. एक हत्ती, त्यामागे एक शुक (पोपट) आणि त्यामागे तोंडाततारा धरलेला वाघ आहे. फारच अर्थपूर्ण शिल्प आहे हे. याचा अर्थ असा- ‘या प्राचीन नगरातील सत्ताधीशांकडे गजांतलक्ष्मी आहे, शुकासारखी विद्वत्ता आणि वैराग् आहे, वाघासारखे पराक्रमी शूर सनिक आहेत अ अवघ्या जगाला प्रकाश देण्याचं सामथ्र्य आहे.’ शिवनेरीवर जन्मलेल्या शिवराजांच्या राज्या हे सगळंच होतं, फक्त हे जुन्नर शहर आणि राजाचे जन्मस्थान शिवनेरी मात्र दुर्दैवाने नव्हता हीच एक खंत. आजही वापरत असलेला मलिकंबर नहर या गोष्टीही पाहण्याजोग्या. जुन्नर्भोवती पद्मावती, भातखळा ,कुंभार, आणि बादशहा असे चार तलाव बांधले गेले होते. तांदूळ, कांदा वफूलशेती यांनी समृद्ध असा हा प्रदेश आहे. संपूर्णपणे शाकाहारी, पण नाव मात् मासवडी असलेला अतिशय चविष्ट
पदार्थ आवर्जून खावा असा आहे.कोणत्याही ऋतूमध्ये हा परिसर रमणीयच आहे.ऐन पावसाळ्यामध्ये हा सगळाच परिसर पाण्याने सचल न्हाऊन निघतो. नजर जाईल तिकडे हिरवाई पसरलेली असते अनेक रानफुले फुललेली दिसतात. काळेकभिन्न कातळ कडे आणि त्यांच्या अंगाखांद्यावर पसरलेली ही हिरवीगार नक्षी अक्षरश डोळ्याचे पारणे फेडते. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण या ठिकाणी पाहायला मिळते.नद्या ओसंडून वाहत असतात, काळे मेघ जमिनीला टेकायला आलेले असतात, खाचरांमध्ये भात रोपांची लागवड चालू असते,आणि य सगळ्याला पाश्र्वभूमी अती भारदस्त किल्ल्यांची किंवा जबरदस्त कातळकडय़ांची. निसर्गाचे एवढे मनमोहक रूप पाहण्यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही. एक दिवसाची किंवा तीन चार दिवसांची, जसा वेळ उपलब्ध आहे तशी भटकंती करायला जुन्नर परिसरासारखे दुसरे ठिकाण नाही.गरज आहे ती बाहेर पडायची आणि इथे मनसोक्त भटकायची. पुण्या-मुंबईला एवढा जवळअसूनही काहीसा दुर्लक्षित राहिलेला जुन्नर परिसर
आपल्याला खुणावतो आहे.

पर्यटन | संस्कृती | सौंदर्य
www.junnar.in
जुन्नर निसर्ग पर्यटन
https://www.facebook.com/junnarnisargparyatan

22/03/2019
01/07/2018
Traditional Rice Farming | Maharashtra | Junnar आवणी - पारंपारिक भात लागवड पावसाळा सुरू झाल्यावर शहरी मंडळी धबधब्यांमध्य...
20/08/2017

Traditional Rice Farming | Maharashtra | Junnar

आवणी - पारंपारिक भात लागवड
पावसाळा सुरू झाल्यावर शहरी मंडळी धबधब्यांमध्ये मनसोक्त भिजण्यासाठी बाहेर पडतात आणि शेतकऱ्यांची मात्र भात लावणीची लगबग सुरू होते. एका दमात कुटुंबाने भातलावणी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. गावकऱ्यांसाठी भात लावणी हा स्नेहमेळावा असतो.
चला पाहूया काय असते, कशी असते, कशी करतात आवणी...

Video पाहण्यासाठी खलील लिंक वर क्लीक करा.
https://youtu.be/ROB6lIktDqc

Cinematography / Ediing : Pratik Sabale
Media Partner : www.junnar.in |Junnar Nisarg Paryatan - जुन्नर निसर्ग पर्यटन

16/07/2017
 #पाऊस . . .
10/07/2017

#पाऊस . . .

"गडकोटांची लेणी, सुंदरतेचा साज मनोहर असे आमचे जुन्नर"जुन्नर चे वैभव नाणेघाट येथील हा सुंदर विडीयो नक्की पहा.- नाणेघाट पर...
09/07/2017

"गडकोटांची लेणी, सुंदरतेचा साज मनोहर असे आमचे जुन्नर"
जुन्नर चे वैभव नाणेघाट येथील हा सुंदर विडीयो नक्की पहा.
- नाणेघाट परिसर, जुन्नर पुणे

जुन्नर निसर्ग पर्यटन | www.junnar.in
- - पर्यटन..संस्कृती ..सौंदर्य - -
C o n n e c t | L i k e | S h a r e
https://www.youtube.com/watch?v=7iKXKTq3bP8

Naneghat is a mountain pass in the Western Ghats range near Junnar in Pune district of Maharashtra, India. During the reign of the Satavahana (200 BCE–190 CE...

03/07/2017

(ITI) आय.टी.आय. प्रवेश अर्ज करण्यास मुदत वाढ करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र आय टी आय प्रवेश 2017-2018
प्रवेश अर्ज करण्याचा शेवट दिनांक /Last Date: 07.07.2017 पर्यंत

संपर्क : तालुका आय टी आय

15/06/2017

मेघ गर्जनेसह जुन्नर मध्ये मान्सून दाखल 💭💭💭💭
⛈⛈⛈⛈
💧💧💧💧

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वां...
01/05/2017

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
#महाराष्ट्र_देशा #जुन्नर
ps : Pratik Sabale

Share | Like | Connect
website : www.junnar.in
facebook : https://www.facebook.com/junnarnisargparyatan
youtube : https://www.youtube.com/channel/UCO3pYU2XNspj__o-ynBg8Xw (junnar)
insta : https://www.instagram.com/junnar.in

Address

Junnar
410502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Junnar.in जुन्नर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Junnar.in जुन्नर:

Share