मा. मकरंद पाटे

मा. मकरंद पाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना page owner: Shree Dhawale

17/01/2023
आपणा सर्वाना दिपावालीच्या मनपुर्वक शुभेच्छा.....
23/10/2022

आपणा सर्वाना दिपावालीच्या मनपुर्वक शुभेच्छा.....

आज मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी *स्वयंसिद्धा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या*काही प्रातिनिधिक सभासदांना दिवाळी भेट देण...
18/10/2022

आज मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी *स्वयंसिद्धा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या*काही प्रातिनिधिक सभासदांना दिवाळी भेट देण्यात आली.उर्वरित सर्व सभासदांना दीपावली भेट देणे चालू असून सभासदांनी संस्थेतून घेऊन जावी.संस्थेचे 1500 सभासद असून नारायणगाव व परिसरातील महिलांना आर्थिक सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते ह्या पतसंस्थाचे उदघाटन झाले होते.आपले सर्वांच्या सहकार्यामुळे पतसंस्था नफ्यात आहे.सर्व ठेवीदार व हितचिंतक सभासद यांचे आभार.आपले नम्र मकरंद पाटे (संस्थापक) सोनाली मकरंद पाटे (अध्यक्ष) योगेश तोडकर (व्यवस्थापक) व सर्व संचालक मंडळ

27/09/2022
गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या व...
23/09/2022

गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.

नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.

राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. पण गरज पडलीच तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा पण शिकवतील.
ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.

जो पक्ष संघटना वाढीसाठी काम करेल तोच पदावर राहिल - राजसाहेब ठाकरे
23/09/2022

जो पक्ष संघटना वाढीसाठी काम करेल तोच पदावर राहिल - राजसाहेब ठाकरे

23/09/2022

Address

Junnar, MH, India
Junnar
410502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मा. मकरंद पाटे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share