Late S.R.Tambe Library

Late S.R.Tambe Library Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Late S.R.Tambe Library, Library, Otur, Junnar.

16/03/2026
*शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या वैयक्तिक खेळाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक ०६.०३.२०२६ रोजी जिमखाना विभागात संपन्न झाल्य...
07/03/2026

*शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या वैयक्तिक खेळाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक ०६.०३.२०२६ रोजी जिमखाना विभागात संपन्न झाल्या सदरच्या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवलेला आहे सर्व नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.*

१. *बॅडमिंटन*

*वरिष्ठ महाविद्यालय (मुले)*
१. प्रवीण दिघे (T.Y.Bsc)
२. ऋषिकेश हांडे (F.Y.B.Com)
३. प्रणव माळवे (T.Y.B.A)

*कनिष्ठ महाविद्यालय (मुले)*
१. आर्यन चतुर (11 Science)
२. चिराग हांडे (11 Science)
३. दुर्वेश तांबे (11th Science)

*वरिष्ठ महाविद्यालय (मुली)*
१. श्रावणी घोलप (F.Y.B.Com)
२. तृप्ती कोंढार (F.Y.B.Com)
३. स्नेहा दिदळे(F.Y.B.Com)

*कनिष्ठ महाविद्यालय (मुले)*
१. प्रिया शिंदे (11th Science)
२. अनुष्का खंडागळे (11th Science)
३. श्रावणी गाढवे (11th Science)

*२. बुद्धिबळ*

*वरिष्ठ महाविद्यालय (मुले/मुली)*
१. श्रद्धा अहिनवे (S.Y.Bsc)
२. कोमल नलावडे (T.Y.Bsc)
३. शबाना अन्सारी (S.Y.Bsc)

*कनिष्ठ महाविद्यालय (मुले/मुली)*
१. तन्मय विजय वाघमारे (12 Science)
२. प्रतीक्षा नवनाथ औटी (11th Science)
३. समृद्धी दत्तात्रय डुंबरे (11th Science)

३. *दोरीच्या उड्या (Skipping ) (मुले)*

१. तुषार फुलमाळी (11th Science)
२. समीर सोनवणे (F.Y.B.A)
३. साहिल उकिरडे (12 Art's)

*मुली*
१. श्रावणी घोलप (F.Y.B.Com)
२. रूपाली जाधव (T.Y.B.A)
३. शबाना अन्सारी (T.Y.Bsc)

४. *संगीत खुर्ची (मुली)*
१. लांडे श्रद्धा (F.Y.B.Com)
२. वर्षा गबाले (T.Y.B.A)
३. संस्कृती लोहोटे (F.Y.B.Com)

१. समीर सोनवणे (F.Y.B.A)
२. चिराग हांडे (11 Science)
३. वेदांग पटेल (S.Y.B.Com)

*५. पुशअप (मुले)*

१. साहिल उकिरडे (12 Arts)
२. चिराग हांडे (11 Science)
३. यश पानसरे (12 Arts)
३. समीर सोनवणे (F.Y.B.A)

६. *चमचा लिंबू* *मुले*
१. तुषार फुलमाळी (11 Science)
२. प्रणव माळवे (T.Y.B.A)
३. ऋषिकेश हांडे (S.Y.B.Com)
३. अर्णव बेनके (F.Y.B.Com)

*(मुली)*
१. राणी पाथरट (F.Y.B.A)
२. शबाना अन्सारी (S.Y.Bsc)
३. कोमल नलावडे (T.Y.B.A)

*सर्व विजयी खेळाडूंना उद्या दिनांक: ०७.०३.२०२६ रोजी स्पर्धेदरम्यान प्रमाणपत्र व मेडल्स देण्यात येणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित रहावे.*

*वार्षिक क्रीडा स्पर्धा*

*दिनांक ०७/०३/२०२६ रोजी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा मैदानी व सांघिक खेळाचे खालील स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे.*

*विजयी खेळाडूंचे महाविद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन*

*१०० मीटर धावणे*

*पुरुष (वरिष्ठ)*
१. ओमकार धाराडे – S.Y.B.Sc – प्रथम
२. ऋषिकेश हांडे – S.Y.B.Com – द्वितीय
३. प्रणव माळवे – T.Y.B.A – तृतीय

*महिला (वरिष्ठ)*
१. अक्षदा शिंदे – F.Y.B.A – प्रथम
२. साक्षी महाकाल – F.Y.B.Com – द्वितीय
३. वेदाश्री अहिनवे – F.Y.B.Com – तृतीय

*पुरुष (कनिष्ठ)*
१. विजय बोऱ्हाडे – 12 कला – प्रथम
२. चैतन्य महाकाल – 12 वाणिज्य – द्वितीय
३. योगेश उकांडे – 11 विज्ञान – तृतीय
*महिला (कनिष्ठ)*
१. अस्मिता गावरी – 11 वाणिज्य – प्रथम
२. अक्षदा हगावणे – 11 वाणिज्य – द्वितीय
३. समीक्षा देठे – 11 वाणिज्य – तृतीय

*२०० मीटर धावणे*

*पुरुष (वरिष्ठ)*
१. प्रणव माळवे – T.Y.B.A – प्रथम
२. समीर सोनवणे – F.Y.B.A – द्वितीय
३. ऋषिकेश हांडे – S.Y.B.Com – तृतीय
*महिला (वरिष्ठ)*
१. अक्षदा शिंदे – F.Y.B.A – प्रथम
२. पूजा दिघे – F.Y.B.A – द्वितीय
३. साक्षी महाकाल – F.Y.B.Com – तृतीय
*पुरुष (कनिष्ठ)*
१. चैतन्य महाकाल – 12 वाणिज्य – प्रथम
२. सागर ससाणे – 12 वाणिज्य – द्वितीय
३. विजय बोऱ्हाडे – 12 कला – तृतीय
*महिला (कनिष्ठ)*
१. सायली सोनवणे – 11 वाणिज्य – प्रथम
२. अस्मिता गावरी – 11 वाणिज्य – द्वितीय
३. समीक्षा तानपुरे – 11 वाणिज्य – तृतीय

*४०० मीटर धावणे*

*पुरुष (वरिष्ठ)*
१. समीर दाभाडे – S.Y.B.A – प्रथम
२. आदिनाथ कापसे – T.Y.B.A – द्वितीय
३. प्रवीण दिघे – T.Y.B.Sc – तृतीय

*महिला (वरिष्ठ)*
१. श्रावणी घोलप – F.Y.B.Com – प्रथम
२. वर्षा गबाले – T.Y.B.A – द्वितीय
३. पूजा दिघे – F.Y.B.A – तृतीय
*पुरुष (कनिष्ठ)*
१. किशोर गोडे – 11 विज्ञान – प्रथम
२. सागर ससाणे – 12 वाणिज्य – द्वितीय
३. यश पानसरे – 12 कला – तृतीय
*महिला (कनिष्ठ)*
१. सायली सोनवने– 11 वाणिज्य – प्रथम
२. श्रावणी चौधरी – 11 वाणिज्य – द्वितीय
३. समीक्षा तानपुरे – 11 वाणिज्य – तृतीय

*८०० मीटर धावणे*

*पुरुष (वरिष्ठ)*
१. आदिनाथ कापसे – T.Y.B.A – प्रथम
२. कृष्णा मुठे – S.Y.B.A – द्वितीय
३. निलेश दाभाडे – S.Y.B.A – तृतीय

*महिला (वरिष्ठ)*
१. श्रावणी घोलप – F.Y.B.Com – प्रथम
२. श्रुती थापेकर – F.Y.B.Com – द्वितीय
३. प्रज्ञा महाकाल – F.Y.B.A – तृतीय

*पुरुष (कनिष्ठ)*
१. किशोर गोडे – 11 कला – प्रथम
२. विजय बोऱ्हाडे – 12 कला – द्वितीय
३. चैतन्य महाकाल – 12 वाणिज्य – तृतीय

*महिला (कनिष्ठ)*
१. अस्मिता गावरी – 11 वाणिज्य – प्रथम
२. अक्षदा हगावणे – 11 विज्ञान – द्वितीय
३. समीक्षा जाधव – 11 विज्ञान – तृतीय

*१५०० मीटर धावणे*

*पुरुष (वरिष्ठ)*
१. ओमकार धाराडे – प्रथम
२. आदिनाथ कापसे – द्वितीय
*महिला (वरिष्ठ)*
१. श्रावणी घोलप – F.Y.B.Com – प्रथम
२. वर्षा गबाळे – T.Y.B.A – द्वितीय
३. तृप्ती कोंढार – F.Y.B.Com – तृतीय
*पुरुष (कनिष्ठ)*
१. चिराग हांडे – 11 विज्ञान – प्रथम
२. यश पानसरे – 12 कला – द्वितीय
३. ईशावा कांबळे – 11 वाणिज्य – तृतीय
*महिला (कनिष्ठ)*
१. अक्षदा हगावणे – 11 विज्ञान – प्रथम
२. समीक्षा जाधव – 11 विज्ञान – द्वितीय

*लांब उडी : पुरुष*
१. प्रवीण दिघे – T.Y.B.Sc – प्रथम
२. ओमकार धाराडे – S.Y.B.Sc – द्वितीय
३. चेतन खोकराळे – T.Y.B.Com – तृतीय

*लांब उडी : महिला*
१. वर्षा गबाले – T.Y.B.A – प्रथम
२. ज्योती भोईर – F.Y.B.Com – द्वितीय
३. नीता दाभाडे – F.Y.B.A – तृतीय

*गोळा फेक : पुरुष*
१. साई महाकाल – F.Y.B.Com– प्रथम
२. साहिल भोर F.Y.B.Com– द्वितीय
३. सुजित चौधरी F.Y.B.Com– तृतीय

*गोळा फेक : महिला*
१. राणी पाथरट – F.Y.B.A – प्रथम
२. साक्षी महाकाल – F.Y.B.A – द्वितीय
३. श्रुती थापेकर – F.Y.B.Com – तृतीय

*थाळी फेक*:पुरुष

१. साई महाकाळ – F.Y.B.Com– प्रथम
२. साहिल भोर F.Y.B.Com– द्वितीय
३. सुजित चौधरी F.Y.B.Com– तृतीय

*थाळी फेक*: *महिला*
१. राणी पाथरट – F.Y.B.A – प्रथम
२. श्रुष्टी थापेकर – F.Y.B.Com – द्वितीय
३. राणी लांडे – F.Y.B.A – तृतीय

*वेट लिफ्टिंग (पुरुष)*

१. पृथ्वीराज चव्हाण – 12 विज्ञान – प्रथम
२. ओमकार नलावडे – 12 विज्ञान – द्वितीय
३. साई डुंबरे – 11 विज्ञान – तृतीय

*सांघिक खेळ निकाल*
*कबड्डी (मुले)*
विजयी: कला शाखा
उपविजयी: वाणिज्य शाखा

*कबड्डी (मुली)*
विजयी: कला शाखा
उपविजयी: वाणिज्य शाखा

*व्हॉलीबॉल(मुले)*
विजयी: कला शाखा
उपविजयी: विज्ञान शाखा

*रस्सीखेच (मुले)*
*(वरिष्ठ महाविद्यालय)*

विजयी: वाणिज्य शाखा
उपविजयी: कला शाखा

रस्सीखेच (मुली)
विजयी: कला शाखा
उपविजेयी: वाणिज्य शाखा

*(कनिष्ठ महाविद्यालय)*
रस्सीखेच (मुली)
विजयी: वाणिज्य शाखा
उपविजयी: विज्ञान शाखा

रसिकेच (मुले)
विजयी: कला शाखा
उपविजेयी: वाणिज्य शाखा

*वरील सर्व विजेत्या खेळाडूंना महाविद्यालयातर्फे प्रमाणपत्र व मेडल देण्यात येणार आहे.*

*क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग*

*प्राचार्य*

*क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग*

*प्राचार्य*
*अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर*

30/01/2026
26 January 2026 Photo 01
27/01/2026

26 January 2026 Photo 01

🌹🌹हार्दिक अभिनंदन 🌹🌹सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2024-2025 चा *उत्कृष्ट शारीरिक शिक्षण व क्रीडा संचा...
27/01/2026

🌹🌹हार्दिक अभिनंदन 🌹🌹
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष 2024-2025 चा *उत्कृष्ट शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक पुरस्कार* ग्रामीण विभागातून *डॉ. उमेशराज पनेरू* यांना जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🌹🌹🌹🌹

Congratulation sir,

माणूस फक्त शिक्षणाने यशस्वी होऊ शकतो - डॉ. सुधीर तांबेओतूर येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयातील भूगोल सप्ताह यशस्वीरि...
27/01/2026

माणूस फक्त शिक्षणाने यशस्वी होऊ शकतो - डॉ. सुधीर तांबे

ओतूर येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयातील भूगोल सप्ताह यशस्वीरित्या संपन्न झाला. या सांगता समारंभासाठी आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. सुधीर तांबे यांचे ‘भूगोलातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक कै. बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमेचे व पृथ्वीगोलाचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. आमश्या पाडवी यांनी केले. त्यांनी भूगोल सप्ताहामधील भौगोलिक उपकरणांचे प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, श्री. रमेश ननावरे यांचे जीआयएसवरील विशेष व्याख्यान, छायाचित्र स्पर्धा, व्हिडिओ स्पर्धा, प्रादेशिक पाककला स्पर्धा, माजी विद्यार्थी मेळावा या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. भूगोलाच्या विद्यार्थ्यांना जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाला चांगला वाव असल्याने, पाककलेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करू शकतात असे मत मांडले. या पुढील होणाऱ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोनवणे यांनी हा सप्ताह आयोजित करण्यामागे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ असल्याचे व त्यासाठी भूगोल विभागाचे प्राध्यापक विशेष मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख व्याख्याते डॉ. तांबे यांनी जीवनात करिअर करायचे असेल तर विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील काळ हा विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ असल्याचे, तसेच स्पर्धात्मक जीवनात अभ्यासाबरोबर काहीतरी कला हवी असून ती या सप्ताहाच्या माध्यमातून मिळते असे त्यांनी सांगितले. भविष्यात संधी शोधून घरबसल्यादेखील व्यवसाय करू शकता, कष्टातून सर्व काही मिळते, या जगात फुकट काही मिळत नसून, लक महत्त्वाचे नसून त्यासाठी कष्ट करायची तयारी हवी असे त्यांनी सांगितले. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडलो हे जर शोधले तर तो व्यक्ती नक्कीच प्रगती करू शकतो तसेच माणूस हा साधन संपत्ती (रिसोर्सेस) झाला पाहिजे यासाठी शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरसाट यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून सर्वच उपक्रम छान झाल्याचे व विद्यार्थ्यांचा चांगला सहभाग असल्याने याचा त्यांना नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी डॉ. रमेश काशिदे, डॉ. नंदकिशोर उगले, डॉ. जनार्दन नाडेकर, डॉ. अंकुश मोधे, डॉ. रोहिदास मेमाणे, व डॉ. विनायक कुंडलिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रमेश गोपाळे यांनी केले.

शिवनेरी विद्यालय, धोलवड येथील विद्यार्थ्यांनी मराठी शाळा वाचवा पथनाट्य महाविद्यालयात सादर केले .
24/01/2026

शिवनेरी विद्यालय, धोलवड येथील विद्यार्थ्यांनी मराठी शाळा वाचवा पथनाट्य महाविद्यालयात सादर केले .

वाघिरे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन(ओतूर) दि. 24 जानेवारी रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब ...
24/01/2026

वाघिरे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन
(ओतूर) दि. 24 जानेवारी रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतूर येथील भूगोल विभाग आयोजित कला शाखेचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अशा प्रकारची माहिती भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. आमश्या पाडवी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. पाडवी यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये, महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते सद्यस्थितीपर्यंतचा आढावा घेऊन, भूगोल विभागातील माजी विभागप्रमुख व त्यांचे सहकारी यांनी विभागात केलेल्या विकासात्मक प्रगतीचा मागोवा घेतला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतःला वेळ देऊन पर्यटन करा, वाढदिवसाला वृक्षारोपण करा, गरिबाला मदत करा, मुलांना चांगले शिक्षण द्यावे तसेच महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले. डॉ. कल्याण सोनावणे यांनी "मेळावा आयोजित करण्यामागील हेतू म्हणजे सर्व माजी विद्यार्थ्यांचा एकत्रित स्नेह मिळावा व्हावा, सर्वांची भेट व्हावी, महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा मिळावा, जुने दिवस परत आठविण्यासाठी, जुन्या मित्रांची भेट होण्यासाठी, आपल्या गुरूंचे पुन्हा दर्शन व्हावे, तसेच महाविद्यालयातील होणारी जडणघडण जाणून घेण हा होता असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राहुल हांडे (पोलीस पाटील, उंब्रज) व डॉ. सुधीर तांबे (प्राध्यापक, बी.जे. कॉलेज आळे), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट तसेच उपप्राचार्य डॉ. कल्याण सोनवणे व कला शाखेचे सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तर माजी विद्यार्थ्याकडून देखील कला शाखेतील सर्व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. राहुल हांडे यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला, शिक्षकांबद्दलचे प्रेम, महाविद्यालयातील शिस्त, गंमती जंमती, शिक्षकांची ज्ञानाची शिदोरी, किती टेन्शन आलं तरी चेहरा सतत हसरा ठेवण्यातच खरं जीवनाचे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुधीर तांबे, श्री. गणेश गायकर, श्री. आशिष ठोंबरे, श्री. शांताराम बांगर, श्री. दिलीप शिंगोटे, श्री. दत्तात्रय बनकर, श्री. अशोक डोंगरे, श्री. सुदर्शन कांबळे, कु. अक्षया डोंगरे, श्री. अविनाश हांडे, श्री. खळदकर, श्री. बापू देशमुख व श्री. राहुल हुलावळे यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देण्याचे काम केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शिरसाट यांनी, मी स्वतः महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे सांगितले, समाजात वावरणारे आपले माजी विद्यार्थी मित्र हे महाविद्यालयाचे भूषण असून, माजी विद्यार्थी जेवढे मोठे होत आहेत, हीच खरी महाविद्यालयाची संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये कला शाखेचे प्राध्यापक डॉ. वसंत गावडे, डॉ. संदिपान गव्हाळे, डॉ. रमेश काशिदे, डॉ. राजेंद्र आंबवणे, डॉ. रोहिणी मदने, डॉ. जनार्दन नाडेकर, डॉ. नंदकिशोर उगले, डॉ. जितेंद्र घोडके, डॉ. अंकुश मोधे, डॉ. उमेशराज पनेरु, डॉ. निलेश हांडे व डॉ. योगेश्वर काळदंते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. रमेश गोपाळे यांनी केले.

Address

Otur
Junnar
412409

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late S.R.Tambe Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Late S.R.Tambe Library:

Share

Category