Vikram Foundation Jath - विक्रम फाउंडेशन जत

  • Home
  • India
  • Jath
  • Vikram Foundation Jath - विक्रम फाउंडेशन जत

Vikram Foundation Jath - विक्रम फाउंडेशन जत Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vikram Foundation Jath - विक्रम फाउंडेशन जत, Political organisation, jath, sangli, Jath.

जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (Chief...
08/10/2025

जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (Chief Minister's Relief Fund) विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून धनादेश सुपूर्द करताना माजी आमदार मा.विक्रमसिंहदादा सावंत व समवेत इतर मान्यवर.
vikramsawant

#मुख्यमंत्री_सहाय्यता_निधी #पूरग्रस्तमदत #जत

विरक्तमठ, बिळूर (ता. जत) या पवित्र स्थळी प.पू. श्रीमन निरंजन प्रणवस्वरुप राजयोगी श्री गुरुबसव महास्वामीजी यांच्या दिव्य ...
21/08/2025

विरक्तमठ, बिळूर (ता. जत) या पवित्र स्थळी प.पू. श्रीमन निरंजन प्रणवस्वरुप राजयोगी श्री गुरुबसव महास्वामीजी यांच्या दिव्य कृपाशिर्वादाने प.पू. श्री ईशप्रसाद स्वामीजी यांच्या निरंजन चरपट्टाधिकार अध्यात्मिक सोहळ्यास उपस्थित माजी आमदार मा.विक्रमसिंहदादा सावंत.vikramsawant

बेंगलोर येथे राज्याचे मंत्री मा. ना. एच. के. पाटील यांची माजी आमदार मा. विक्रमसिंहदादा सावंत यांनी भेट घेऊन जत तालुक्याच...
18/08/2025

बेंगलोर येथे राज्याचे मंत्री मा. ना. एच. के. पाटील यांची माजी आमदार मा. विक्रमसिंहदादा सावंत यांनी भेट घेऊन जत तालुक्याच्या तसेच कर्नाटक सीमाभागातील नागरिकांचे प्रश्न मांडले.
vikramsawant

#सदिच्छा_भेट #जत

विक्रम फाउंडेशन, जतच्या संचालिका सौ. वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील माजी नगरसेवक मोहनभैया कुलकर्णी यांच्या नूत...
17/08/2025

विक्रम फाउंडेशन, जतच्या संचालिका सौ. वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील माजी नगरसेवक मोहनभैया कुलकर्णी यांच्या नूतन वास्तूच्या गृहप्रवेश व वास्तुशांतीच्या शुभप्रसंगी उपस्थित राहून नव्या वास्तूसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि या नवीन घराला सुख, शांती व समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली.

#वास्तुशांती #गृहप्रवेश #सदिच्छा_भेट

जत येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाहीच्या रक्षणासाठी, माजी आमदार मा.विक्रमसिंहदादा सावंत यांच्या नेतृत्वात ...
16/08/2025

जत येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाहीच्या रक्षणासाठी, माजी आमदार मा.विक्रमसिंहदादा सावंत यांच्या नेतृत्वात जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने "मतदान चोरीचा" निषेध नोंदवत भव्य कॅन्डल मार्च / मशाल मोर्चा आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी सहभागी होत लोकशाही वाचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त धैर्यशील सावंत ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित,जत येथे माजी आमदार मा.विक्रमसिंहदादा स...
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त धैर्यशील सावंत ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित,जत येथे माजी आमदार मा.विक्रमसिंहदादा सावंत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.vikramsawant

जत येथे नव्याने सुरु झालेल्या शिवराज मोटर इलेक्ट्रिक बाइक शोरूमच्या उद्घाटन समारंभास उपस्थित माजी आमदार मा. विक्रमसिंहदा...
08/08/2025

जत येथे नव्याने सुरु झालेल्या शिवराज मोटर इलेक्ट्रिक बाइक शोरूमच्या उद्घाटन समारंभास उपस्थित माजी आमदार मा. विक्रमसिंहदादा सावंत. .vikramsawant

#उद्घाटन_सोहळा

लोकनेते स्व. बी. आर. (काका) शिंदे यांच्या ९३ व्या  #जयंती निमित्त, मार्केट यार्ड (जत) येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास...
08/08/2025

लोकनेते स्व. बी. आर. (काका) शिंदे यांच्या ९३ व्या #जयंती निमित्त, मार्केट यार्ड (जत) येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास माजी आमदार मा. विक्रमसिंहदादा सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून #विनम्र_अभिवादन केले व आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिले. यावेळी सां. कृ. उ. बाजार समितीचे सभापती श्री. सुजय (नाना) शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय काँग्रेस ओ.बी.सी. शहर जिल्हाध्यक्ष, सांगलीमा.श्री. अशोकसिंग रजपुत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
07/08/2025

राष्ट्रीय काँग्रेस ओ.बी.सी. शहर जिल्हाध्यक्ष, सांगली
मा.श्री. अशोकसिंग रजपुत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एकुंडी (ता. जत) येथे नव्याने सुरू झालेल्या श्री बसवेश्वर दूध संकलन व चिलिंग सेंटरच्या वास्तुशांती आणि श्री सत्यनारायण पू...
04/08/2025

एकुंडी (ता. जत) येथे नव्याने सुरू झालेल्या श्री बसवेश्वर दूध संकलन व चिलिंग सेंटरच्या वास्तुशांती आणि श्री सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमास माजी आमदार मा.विक्रमसिंहदादा सावंत यांनी उपस्थित राहून सर्व संबंधितांना मनःपूर्वक शुभेच्छा देत पुढील वाटचालीस यश लाभो, अशी श्री बसवेश्वर चरणी प्रार्थना केली. vikramsawant

मंगळवार पेठ, जत येथे नव्याने सुरु होत असलेल्या मा. नितीन शिंदे यांच्या हॉटेल स्वप्नपूर्ती फॅमिली रेस्टॉरंटचे माजी आमदार ...
04/08/2025

मंगळवार पेठ, जत येथे नव्याने सुरु होत असलेल्या मा. नितीन शिंदे यांच्या हॉटेल स्वप्नपूर्ती फॅमिली रेस्टॉरंटचे माजी आमदार मा. विक्रमसिंहदादा सावंत यांनी उद्घाटन करत त्यांना नवीन व्यवसायासाठी व पुढील यशस्वी वाटचालीस सदिच्छा दिल्या.vikramsawant

#उद्घाटन #हॉटेल #जत

Address

Jath, Sangli
Jath
416404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vikram Foundation Jath - विक्रम फाउंडेशन जत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share