JalnaSkill

JalnaSkill This is district level field office of the Department of Skill Development, Employment and Entrepreneurship,Model Career Center Government Of Maharashtra.

Mainly serving to the unemployed youth and Employers.

केंद्र तथा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना याबाबत जिल्ह्यातील बँकिंग आ...
29/05/2026

केंद्र तथा राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आणि प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना याबाबत जिल्ह्यातील बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधील विविध बँकांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय जालना

10/05/2026
दिनांक ०९ मे , 2026  रोजी  “जागेवर निवड संधी” चे जालना येथे  आयोजन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कें...
07/05/2026

दिनांक ०९ मे , 2026 रोजी “जागेवर निवड संधी” चे जालना येथे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना अणि विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड जालना यांचे संयुक्त विद्यामाने दिनांक ०९ मे, 2026 शनिवार रोजी विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड बोरखेडी, सिंदखेड राजा रोड जालना येथे सकाळी ९ ते दु. २ वाजेपर्यंत (प्लेसमेंट ड्राईव्ह) “जागेवर निवड संधी” आयोजित करण्यात आला आहे. यासाठी २७ रिक्तपदे उपलब्ध आहेत.
रोजगार कार्यालया कडील नोंदणीकृत सुशिक्षित महिला व पुरुष उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळाव्याचे आयोजीत करण्यात येत आहे. या मेळाव्यात विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड जालना यांचे नियुक्ते उमेदवारांची निवड करणार आहे. सदर मेळाव्यामध्ये नियोक्त्यांकडून 27 रिक्तपदे 1) आयटीआय फिटर 01 पदे 2) आयटीआय इलेक्ट्रिशन 01 पद 3) आय टी आय मशीनिस्ट 01 पद 4) वेअर हाऊस सहाय्यक 02 पदे 5) अकाउंट असिस्टंट 02 पदे 6) ऑफिस एच. आर. 0१ पदे 7) लोडिंग ड्रायव्हर १० पदे 8) सुपरवायझर ०३ पदे 9) डाटा एन्ट्री ऑपरेटर 05 पदे इत्यादी, 18 ते ३५ वयोगटातील पात्रता धारक उमेदवारां साठी पदे उपलब्ध झालेली आहेत, सदर पदासाठी आयटीआय, बी. कॉम पदवीधर, एमबीए, कोणत्याही शाखेतील पदवी त्याच प्रमाणे ड्रायव्हर पदासाठी अनुभव धारक उमेदवारा यांच्यासाठी ही जागेवर निवड संधी आयोजित करण्यात येत आहे.तरी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नोकरी इच्छूक महिला व पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा. मुलाखती साठी बायोडाटा एक प्रत सोबत ठेवावी. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विक्रम टी प्रोसेसर प्रा. लिमिटेड बोरखेडी, सिंदखेड राजा रोड जालना सकाळी ०९ वाजता उपस्थित राहावे.असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

24/04/2026

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जालना
“पंतप्रधान इंटर्नशिप योजना”

जालना जिल्ह्यामध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत खालील कंपन्यांमध्ये इंटर्नशिप ची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

https://pminternship.mca.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून इंटर्नशिप साठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तात्काळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर प्रशासकीय इमारत दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे संपर्क साधावा.

MCA

Entrepreneurship Development Training Program under CMEGP Scheme Organized by Maharashtra center for  Entrepreneurship D...
16/04/2026

Entrepreneurship Development Training Program under CMEGP Scheme Organized by Maharashtra center for Entrepreneurship Development Jalna...!

📌 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2026 📌भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन...
16/04/2026

📌 राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2026 📌

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य' आयोजित करत आहे एक विशेष निबंध स्पर्धा!

📝 विषय: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य.
(उदा. मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क इ.)

🗓️ *निबंध पाठवायची अंतिम तारीख: 25 एप्रिल 2026 (वाढविण्यात आलेली)*

👥 गट आणि बक्षिसे:
गट 1: ITI / डिप्लोमा विद्यार्थी (शब्दमर्यादा: 500-800)
गट 2: पुरुष / महिला खुला वर्ग (शब्दमर्यादा: 800-1200)

🏆 आकर्षक पारितोषिके (प्रत्येक गटासाठी):
🥇 प्रथम क्रमांक: ₹ 31,000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
🥈 द्वितीय क्रमांक: ₹ 21,000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र
🥉 तृतीय क्रमांक: ₹ 11,000/- + स्मृतिचिन्ह + सन्मानपत्र

📥 सहभागासाठी:
निबंध PDF स्वरूपात पाठवावा. नावनोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:

🔗 https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8

निबंध मराठी भाषेत लिहिणे अनिवार्य आहे.निबंध मूळ (Original) असावा, कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल. प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर शिष्ट आणि सुसंस्कृत असावा.

निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल; मात्र अंतिम सादरीकरण PDF स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध स्कॅन करून दिलेल्या लिंकवर अपलोड करावा.

स्पर्धकांनी खालील माहिती आवश्य भरावी: पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, ITI/शाळा/महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9152230193
*सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल*

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जालना जिल्हयात संधी उपलब्धकेंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत प्रधानमंत्...
02/04/2026

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जालना जिल्हयात संधी उपलब्ध

केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना राबविण्यात येत आहे सदर योजनेच्या तिसऱ्या फेरी करिता जालना जिल्ह्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप च्या संधी उपलब्ध झाल्या असून जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

सदर योजनेअंतर्गत उमेदवारांना ६ ते ९ महिन्याकरिता इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा ९००० रु एवढे विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे जालना जिल्ह्यामध्ये नामांकित कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध असून याकरिता पात्रता दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवीधर आहे. रुजू झाल्यानंतर सहा हजार रुपये अनुदान दिले जाईल.

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता https://pminternship.mca.gov.in या वेबसाईट भेट द्यावी व अधिक माहिती साठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत दुसरा मजला जिल्हाधिकारी कार्यालय जालना या पत्त्यावर प्रत्यक्ष भेट द्यावी.असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जालना यांनी केली आहे.

28/03/2026
दिनांक 27 मार्च, 2026  शुक्रवार रोजी आयोजित “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार  मेळाव्यासाठी” 200 रिक्त पदांसाठी भरती. जिल्ह...
25/03/2026

दिनांक 27 मार्च, 2026 शुक्रवार रोजी आयोजित “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी” 200 रिक्त पदांसाठी भरती.

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना आणि हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (ITI) जालना, यांचे संयुक्त विद्यामानाने दिनांक 27 मार्च, 2026 रोजी हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (ITI) जालना, येथे सकाळी ०९ ते दु. 02 वाजेपर्यंत “पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे 200 पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध आहेत.

या मेळाव्यात पाचवी ते दहावी / बारावी /आय.टी.आय. ऑल ट्रेड / इलेक्‍ट्रि‍कल / फिल्‍ड असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, कॅशियर, टेक्न‍िशियन, ऑपरेटर, फिल्‍ड एक्झिक्युटिव्‍ह, हेल्पर, अप्रेन्‍टीस ट्रेनी, ए.सी.सी. मशीन ऑपरेटर, इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक उमेदवारा साठी एकूण 200 रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखती साठी विविध 09 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये खंडेलवाल ज्वेलर्स अकोला प्रा. लि. जालना यांची १5 पदे, भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. जालना, यांची 2० पदे, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, यांची २० पदे, बजाज ॲटो लि. छ. संभाजी नगर, यांची 5० पदे, बजाज ॲटो लि. चाकण, आकुर्डी, पुणे यांची 30 पदे, एथर एनर्जी लि. बेंगलोर यांची 15 पदे, संजीव ॲटो लि. बाळूज, छ. संभाजी नगर यांची 15 पदे, एंड्युरन्स टेक्नॉलॉजी लि. बाळूज, छ. संभाजी नगर यांची 05 पदे व धूत ट्रान्समिशन प्रा. लि. छ. संभाजी नगर यांची 30 पदे असून या मेळाव्यासाठी वरील 9 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्येक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

या सुवर्ण संधीचा रोजगार जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझ्युमे / बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्ड / सेवायोजन नोंदणी छाया प्रतीसह सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. जालना जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा [SPECIAL JOB FAIR- 6 (2025-26) JALNA] या ओळीतील ॲक्शन मेनुतील दुस-या बटनावर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. पात्रतेनुसार मॅचिंग झालेल्या विविध कंपन्यांच्या रिक्त पदांना Apply बटनावर क्लिक करा. या साठी काही अडचण आल्यास कार्यालयीन या दुरध्वनी क्रमांकावर 02482-299033 वर संपर्क करावा असे आवाहन गणेश चिमणकर, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गतजालन्यातील उद्योजकांसाठी खास संधी! ✨ 🌐जिल्हा कौशल्य ...
17/03/2026

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत
जालन्यातील उद्योजकांसाठी खास संधी! ✨

🌐जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करीअर सेंटर जालना आणि deAsra फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक मेळावा येतोय आपल्या जालन्यात!

उद्योजक मेळाव्याची वैशिष्ठ्ये:
✅ व्यवसाय वाढीसाठी स्ट्रटेजी कशी बनवायची, या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन

✅ सेल्स आणि मार्केटिंग ग्रोथ एक्स्पर्ट राहुल लिमये यांच्याकडून सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आणि उपयुक्त टिप्स मिळवा

📅 मंगळवार, 24 मार्च 2026
🕙 सकाळी: 10:30 ते दुपारी: 01:30 पर्यंत
📍 महसूल भवन, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना

👉 हा कार्यक्रम विनामूल्य असून नोंदणी आवश्यक आहे!
https://forms.gle/b6XCoieR7PJEg7zq5

Address

Administrative Building, 2nd Floor, Collector Office
Jalna
431203

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+912482299033

Alerts

Be the first to know and let us send you an email when JalnaSkill posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to JalnaSkill:

Share