हा महाराष्ट्राचा तापी खोर्यात वसलेला एक भाग असून तीन जिल्ह्यांचा त्यात समावेश होत्तो.
जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश असे संबोधले जात असे. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते, ही शेती भारतातील इतर श
ेतक-यांच्या साठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० कि.मि² आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंता पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी देखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मि.मि इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- ताप्ती, पूर्णा, गिरणा, वाघूर
प्रसिध्द कवी बालकवी व कवियत्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील आहेत तर साने गुरुजी ह्यांची ही कर्मभूमी होय.
जळगाव जिल्ह्याचा नकाशा
जळगाव जिल्ह्यात समाविष्टतालुके- चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जळगाव तालुका, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर व बोदवड
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ), परोळा किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला), पाल (यवळ तालुका)-थंड हवेचे ठिकाण, फारकंडे मनोरा, पटनादेवी (भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व देवस्थान), उनापदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे, संत मुक्ताबाई मंदिर, संत चांगदेव मंदिर, मनुदेवी मंदिर, ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर)
================================================
धुळे जिल्हा
हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला, शिरपुरचे बालाजीचे मंदीर, नकाणे तलाव, राजवाडे संशोधन मंडळ हि धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस, मिरची, ज्वारी, ऊस ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे.तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे परंतु ती केवळ पावसाळ्यातच खळाळत वाहते.
धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- धुळे, शिरपूर, साक्री व शिंदखेडा.
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ: ८०६१ चौ. किमी.इतके असून लगतचे प्रदेश पुढील प्रमाणे जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा व मध्यप्रदेश राज्य
जिल्ह्याची लोकसंख्या १७,०८,९९३ इतकी असून त्यात पुरुष: ८,७८,५३८ महिला: ८,३०,४५५ असे प्रमाण आहे जिल्ह्याची साक्षरता ७२.०८% आहे. धुळे जिल्ह्यात मराठी व अहिराणी बोली बोलल्या जातात. जिल्ह्यात कीर्तन, टिपरी नृत्य, लोकनाट्य (तमाशा) या लोककला प्रसिध्द आहेत जिल्ह्याचे सरासरी तापमान कमाल: ४५ डिग्री. सेल्सिअस तर किमान: १६ डिग्री. सेल्सिअस इतके असून सरासरी पाऊस ५९२ मिमी. इतका पडतो
================================================
नंदुरबार
जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पुर्वोत्तर सीमेवर आहे. सीमा भागातील काही शहरे (उदा. खेडदिगर + खेतिया) हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यात विभागले गेले आहेत.
================================================
Jalgaon is a city in western India, to the north of the Maharashtra state in Jalgaon District, which itself is located on the northern Deccan Plateau. Located within the productive, irrigated agricultural region of Khandesh, Jalgaon has a municipal corporation. The city is well developed with good roads, shopping centers, and residential areas, and also has good communication and transport infrastructure. Jalgaon is near the famous Ajanta Caves and is one of the key attraction places for tourists.Known as "Banana-City", it contributes to about half of the Maharashtra state's Banana production. Jalgaon has a diverse climate. It is exceptionally hot and dry during summer with temperatures reaching as high as 47 degrees Celsius. The highest temperature recording in May 2010 was 49.2 degrees Celsius. Jalgaon receives about 700 mm rainfall during monsoons, which is followed by pleasant temperature in winter.