20/01/2026
दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सातपुड्याच्या कुशीतील यावल अभयारण्यातील ऊसमली व गाडऱ्या ह्या गावी लोक संघर्ष मोर्चाची मिटीग घेण्यात आली
सामुदायिक वन अधिकारी व जंगल संवर्धना बाबत तयार केलेल्या वर्किंग प्लॅन बाबत सखोल चर्चा करत गावात पुढील नियोजन व वन विभागाचे सामुदायिक वन अधिकार शेत्रात जे अतिक्रमण होते आहे त्या बाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या होळी मोहत्सवाचे आयोजन करण्याबाबत ही सखोल चर्चा झाली व त्या वर २८ जानेवारीला निर्णय घेण्याचे ठरले.
ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चाचे साथी गाठू बारेला, रमेश बारेला,इरफान तडवी,फुलसिंग बारेला, ऊसमली पाटील,दारा बारेला,भरत बारेला, भालसिंग,अजय मनोरे उपस्थित होते