26/05/2023
पिकवला गेला !
पण विकला नाही गेला !!
#कापूस भाव.
सध्या महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. जीवाच रान करून रात्रीचा दिवस करून काबाडकष्टाने बळीराजाने कापूस पिकवला आणि त्यावेळेस कापसाला भाव नाही म्हणून त्याला साठवून ठेऊ आणि नंतर पुढे जाऊन जेंव्हा भाव वाढवून मिळेल तेंव्हा विकू अस ठरवून बळीराजाने कापसाची घरात साठवणूक केली. मागच्या 6 महिन्यापासून घरात कापूस साठवला त्यातून लहान मुलांना खाजर सुटलं, त्वचा चे रोग झाले तरीसुध्दा शेतकरी हे सर्व सहन करत आजपर्यंत आला ते कशासाठी? तर त्याला भविष्यात पुढे जाऊन त्या कापसाला 4 पैसे भाव वाढवून मिळेल त्यातून कर्जाच नवं जून करता येईल, मुलीचे हात पिवळे करता येतील, मुलाच्या शाळेची फी भरता येईल, पुढच्या वर्षी खरीफ च्या वेळेस यातून शिल्लक राहिलेल्या पैशातून पुन्हा कापूस पेरणी करता येईन परंतु बळीराजाच्या या सर्व आशा फोल ठरल्या कारण भाव वाढणं तर दूरच परंतु या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी विरोधी व उद्योगपती केंद्रीत धोरणामुळे उलट भाव ढासळून गेले व आज रोजी कापसाचे भाव 6000-6500 प्रति क्विंटल वर आले आहेत त्यामुळे शेतकरी उलट आता जास्तच अडचणीत आला आहे. एकतर पहिला चं कापूस घरात पडून आहे, मागच्या वर्षीचे बियाण्यांपासून ते रासायनिक खतांचे सर्व पैसे देणे बाकी आहेत आणि एक महिन्यांवर खरीफ हंगाम येऊन ठेपला आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशः कात्रीत सापडून इकडे आड तर तिकडे विहीर अशी बळीराजाची परिस्थिती झाली आहे. खरं तर आपल्या देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की जो बळीराजा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो त्या बळीराजाची आज ह्या दळभद्री सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अशी परिस्थिती झाली आहे व शेतकरी इतका प्रचंड संकटात सापडला आहे आणि अशा परिस्थिती मध्ये जिल्ह्याचे स्वयंघोषित नेते, पालकमंत्री, सत्तेतील आमदार एक ब्र्ह शब्द काढायला तयार नाहीत, विधानसभेत एक प्रश्न विचारायला तयार नाहीत. म्हणजेच यांना शेतकऱ्यांचं, कामगारांच कोनाचच काहीच पडलेल नाही याउलट जनतेच्या पैशावर मज्जा मारत हे परदेशी दौरे करण्यात व्यस्त आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देश पट्ट्यात कापूस उत्पादक शेतकरी हा प्रमुख म्हणून ओळखला जातो त्या मागोमाग केळी पीक हे नगदी पीक म्हणून घेतले जात परंतु ह्या सरकारच्या काळात आज कापूस असो की केळी, की कांदा असे कोणतेही पिके असुद्या जी पिके खान्देश च्या पाठीचा कणा म्हणून ओळखली जातात त्याची आज काय परिस्थिती होऊन बसलेली आहे परंतु यावर उपाय योजना करणं तर दूरच परंतु उलट गुजरातच्या निवडणुकीत व्यापाऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळण्यासाठी परदेशातून कापूस आयात केला जात आहे अशी चर्चा आज खेड्या पड्यात चालू आहे आणि खरंच अस झालं तर भविष्यात कापसाचे भाव 5000 रुपयांवर आल्या शिवाय राहणार नाही म्हणजे शेतकरी उपाशी आणि दलाल तुपाशी अशी भयानक परिस्थिती ह्या सरकारनी करून ठेवली आहे म्हणजेच आधीच वादळी वाऱ्या पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला अजून च जास्त संकटात टाकायचं अडचणीत आणायचं ही योजना ह्या सरकारची दिसतेय अस वाटत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे कारण या देशातील बळीराजा जर असाच संकटात सापडून संपत गेला तर भविष्यात काय परिस्थिती होईल याचा विचार आपण करून ठेवला पाहिजे.