mns_jalgaon_.19

mns_jalgaon_.19 मनसे जळगांव खान्देश

03/06/2026

जळगांव :सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचाराविरोधात मनसे आक्रमक; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लाचखोरी, नातेसंबंधातून कंत्राट वाटप आणि बेरोजगारांवरील अन्यायाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार, लाचखोरी, अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना शासकीय कंत्राटे वाटप आणि हितसंबंधांच्या संघर्षाच्या आरोपांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच शासकीय कंत्राटांमध्ये पारदर्शकता आणून सुशिक्षित बेरोजगार युवकांना समान संधी मिळावी, अशी भूमिका मांडण्यात आली. चौकशी न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

जळगांव :उमवि परीक्षा विभागाचा भोंगळ कारभारः परीक्षा देऊनही TYBCA चे विद्यार्थी निकालात 'गैरहजर' !
01/06/2026

जळगांव :उमवि परीक्षा विभागाचा भोंगळ कारभारः परीक्षा देऊनही TYBCA चे विद्यार्थी निकालात 'गैरहजर' !

27/05/2026

पेट्रोल पंपांच्या मनमानी कारभाराविरोधात मनसे आक्रमक !

जळगाव-जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक ४-५ तास रांगेत आहेत. त्यातच पंप चालकांकडून ऑनलाईन पेमेंट नाकारले जात असल्याने संताप वाढला आहे. या मनमानी कारभाराविरोधात मनसेने जिल्हा पुरवठा विभागाला निवेदन देत जाब विचारला आहे.

शिवतीर्थावर सुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा..जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महारा...
26/05/2026

शिवतीर्थावर सुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा..

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील शिवतीर्थ परिसर सध्या विविध सामाजिक आणि कामगार प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आज आंदोलनस्थळी दाखल झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व आंदोलनांना पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. समाजातील सामान्य नागरिक, कामगार, बेरोजगार युवक आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांबाबत मनसेने नेहमीच संवेदनशील भूमिका घेतली असून, अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रेल्वे भरती प्रक्रियेत २०१२ पासून निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्तीपत्र न मिळाल्याने देशभरातील उमेदवार संतप्त झाले आहेत. जळगावसह विविध राज्यांतील उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले असून, “निवड होऊनही नोकरी नाही” अशी वेदना त्यांनी व्यक्त केली. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी मनसेने केली.

तसेच जळगाव जिल्हा हमाल-मापाडी कामगार संघटनेच्या धरणे आंदोलनालाही मनसेने पाठिंबा दिला. हमालीची कामे ठेकेदारांकडे देऊन माथाडी व्यवस्थेचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. “कामगारांच्या हक्कांवर गदा आणून माथाडी मंडळ कमजोर करण्याचा उद्योग सुरू आहे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. कामगारांच्या रोजगार आणि हक्कांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मनसेने नमूद केले.

या शिवाय भील प्रदेश क्रांती सेना विविध सामाजिक व आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. आदिवासी भिल समाजातील ऊसतोड कामगारांना ठेकेदारांकडून डांबून ठेवण्यात आल्याची गंभीर तक्रार, मुख्यमंत्री अर्थसाहाय्य योजनेतील कर्ज प्रकरणे मंजूर न होणे, तसेच इतर विविध प्रश्नांबाबत संघटनेने आवाज उठवला आहे. आदिवासी व वंचित समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला आवाहन करत आंदोलनकर्त्यांची तातडीने भेट घेऊन त्यांच्या रास्त व हक्काच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेचा असंतोष अधिक तीव्र होईल, असा इशारा दिला.

24/05/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अधक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


22/05/2026

जळगाव :शहरातील अवैध धदे बंद करा..

#मनसे #अवैधधदे #मनसेजळगाव #जळगावपोलीस #पोलिसअधिक्षक

21/05/2026

राज ठाकरे गेली अनेक वर्ष ज्या गोष्टींचा इशारा देत होते त्याच गोष्टी सध्या सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत. त्यांनी यापूर्वीही सांगितलं आहे ज्या दिवशी सामान्य नागरिकांच्या दारावर टकटक होईल त्या दिवशी नागरिकांना जाग येील आणि आज अगदी तसंच घडतंय. निदान यावेळी तरी नागरिकांना आलेली जाग ही दिर्घकाळ टिकावी हिच अपेक्षा!

जळगांव :बसस्थानका चे उपहारगृह  तात्काळ सुरु करा.. #मनसे  #जळगांवबसस्थानक  #उपहारगृह  #जळगांव
19/05/2026

जळगांव :बसस्थानका चे उपहारगृह तात्काळ सुरु करा..

#मनसे #जळगांवबसस्थानक #उपहारगृह #जळगांव

19/05/2026

जळगांव :एसटी स्टँडवरील उपहारगृह तात्काळ सुरू करा; अन्यथा मनसेकडून चहा-नाश्ता – इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून निवेदन; प्रवाशांच्या गैरसोयीवरून प्रशासनाला सवाल

जळगाव शहरातील एसटी बसस्थानकावरील बंद असलेले उपाहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात प्रवाशांना सवलतीच्या दरात चहा-नाश्त्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे होत असलेल्या गैरसोयींकडे लक्ष वेधण्यात आले. राज्यातील इतर बसस्थानकांवर सुविधा सुरू असताना जळगाव बसस्थानक अद्याप वंचित का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

उपाहारगृह सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा असूनही प्रशासनाकडून होत असलेला विलंब संशयास्पद असल्याचा आरोप मनसेने केला. यामागे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत का, अशी शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, लवकर निर्णय न घेतल्यास मनसे स�

17/05/2026

Address

Jalgaon
425303

Alerts

Be the first to know and let us send you an email when mns_jalgaon_.19 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share