05/06/2021
☺️
दुःखाचे खरे कारण अपेक्षा
आशाच अपेक्षाच ठेवली नाही तर निराशाच वाटत नाही
समजा आपण एखाद्या दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि अडीचशे रुपयांचा पुष्पगुच्छ घेऊन आलो आणि घरी आल्या आल्या माठ हातातून पडून फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण माठ इतक्या लवकर फुटेल अशी अपेक्षाच आपण केलेली नसते.
त्याउलट 250 रुपयांचा पुष्पगुच्छ संध्याकाळपर्यंत सुकला तरी आपल्याला वाईट वाटत नाही त्याचे कारण फुले सुकणारच हे आपल्याला माहीत असते .
माठ इतक्या लवकर फुटेल असे वाटले नव्हते आणि फुटला त्यामुळे आपल्याला दुःख झाले.
परंतु फूलांकडून ती टवटवीत राहण्याची अपेक्षाच नव्हती त्यामुळे ती सुकली तरी त्याचे दुःख झाले नाही.
मतितार्थ असा आहे की,
ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त त्याच्याकडून तितके दुःख वाट्याला येते आणि ज्याच्या कडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख नाही यामुळे कोणाकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवू नका आनंदी राहा मस्त राहा.
🙏🙏🙏🙏🙏