Giants Social Forum

Giants Social Forum जायंट्स का उद्देश मनुष्य के जीवन को समृद्ध करना तथा बुराई को रोकने में उनकी सहायता करना है। Giants International was founded in 1972.

Giants International President Padmshri Nana Chudasama inaugurated this organisation named Giants Group of Islampur in 1976. Today 50 members are participated in social work of Giants.

Humble and heartfelt homage in loving memory of Late Kakasaheb Chitale. A great social reformer, a renowned entrepreneur...
08/02/2026

Humble and heartfelt homage in loving memory of Late Kakasaheb Chitale. A great social reformer, a renowned entrepreneur, an unforgettable mentor in the Giants fraternity, and a revered source of inspiration for us... 💐🙏💐
Chitale Bandhu Mithaiwale

जायंटस वेलफेअर फाऊंडेशन या सामाजिक संघटनेच्या फेडरेशन २ क मधील विविध ग्रुपच्या माजी अध्यक्षांचा मेळावा कोल्हापूर येथे आय...
20/05/2024

जायंटस वेलफेअर फाऊंडेशन या सामाजिक संघटनेच्या फेडरेशन २ क मधील विविध ग्रुपच्या माजी अध्यक्षांचा मेळावा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला.. संघटनेतून ८६ माजी अध्यक्ष उपस्थित होते. जायंटस वेलफेअर फाऊंडेशनचे केंद्रीय समिती सदस्य आणि माजी अध्यक्ष फोरमचे विभाग प्रमुख मा. दिनकर आमिन हे प्रमुख अतिथी तसेच मा. गिरीश चितळे, फेडरेशन अध्यक्ष रामदास रेवणकर, श्री. प्रमोद शहा, डॉ. सतीश बापट, अ‍ॅड. विलासराव पवार, सौ. मंगलाताई कुलकर्णी, डॉ. साधना मालगावे, डॉ. राजकुमार पोळ, श्री भरतेश कलंत्रे, श्री ज्ञानेश्वर भष्मे, श्रीमती बबीता जाधव श्री मेस्त्री यांच्या उपस्थितीत ग्रुपच्या माजी अध्यक्षांच्या सहभागाबद्दल आणि जायंटस वृद्धी बाबत मार्गदर्शक सूचना आणि आढावा घेण्यात आला.
माजी अध्यक्ष फोरमचे विभाग प्रमुख मा. दिनकर आमिन म्हणाले प्रत्येक ग्रुप मध्ये माजी अध्यक्षांची संख्या मोठी आहे. अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेता यावा यासाठी त्यांना पुन्हा संघटीत करणे त्यांना वेगळी जबाबदारी देणे ही काळाची गरज आहे. संघटनेच्या कार्यातील सातत्य टिकविण्यासाठी ग्रुपच्या माजी अध्यक्षांना ग्रुपचे आधारस्तंभ मानून त्यांना प्रवाहात पुन्हा सक्रीय करावे यासाठी या मेळाव्यानिमित्त प्रेझेंटेशन द्वारे त्यांनी मार्गदर्शन केले. आष्टा, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, कवठेमहांकाळ, पलूस, फलटण, बारामती, मलकापूर, भिलवडी, शिराळा, विविध ग्रुपच्या अध्यक्षांनी जायंटस मधील कार्याबद्दल मनोगते व्यक्त केली.

जायंटस रत्न, समाजसेवक स्व. काकासाहेब चितळे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...- Giants Group of Islampur...
08/02/2024

जायंटस रत्न, समाजसेवक स्व. काकासाहेब चितळे यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

- Giants Group of Islampur...

जायंटस ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी तर्फे मोरणा हॉस्पिटल शिराळा येथे डॉ.राहुल कदम व डॉ. पूनम कदम (स्त्री रोग तज्ञ) यांनी भागात...
29/01/2024

जायंटस ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी तर्फे मोरणा हॉस्पिटल शिराळा येथे डॉ.राहुल कदम व डॉ. पूनम कदम (स्त्री रोग तज्ञ) यांनी भागातील महिलांना कर्करोग, स्किन प्रॉब्लेम, हार्मोनल चेंजेस, मोनो पोज, गुड टच बॅड टच याविषयी मार्गदर्शन केले.
शिराळा गावातील आशा वर्कर्स यांनी समाजामध्ये इतर महिलांना आरोग्याबाबत कसे मार्गदर्शन करावे याची माहिती दिली.
ग्रुपच्या सदस्या डॉ. पूनम कदम यांनी हळदीकुंकूचे वाण भेट दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सरोजिनी कदम यांनी केले, तसेच प्रास्ताविक डॉ.सविता नलवडे, आभार प्रदर्शन रेश्मा पवार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी शिराळा तालुका सुपरवायझर राजश्री पाटील व सर्व शिराळा तालुक्यातील गटप्रवर्तक तसेच 110 अशा वर्कर्स व मोरणा हॉस्पिटल मधील सेवक उपस्थित होते.

शुक्रवार दि. २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन ग्रामीण रुग्णालय शिराळा येथे साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर ...
26/01/2024

शुक्रवार दि. २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन ग्रामीण रुग्णालय शिराळा येथे साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांच्यातर्फे बधिर-मुक विद्यालय, शिराळा येथे जिलेबी खाऊ देण्यात आला. यावेळी अध्यक्षा सरोजिनी कदम, कार्यवाह रेश्मा पवार, माजी अध्यक्षा डॉ. सविता नलवडे व बधिर मुक विद्यालयच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.

“The bicycle is the noblest invention of mankind.”      – William Saroyan..- सायकल चालावा, निरोगी रहा हा सायकल रॅलीचा उप...
31/12/2023

“The bicycle is the noblest invention of mankind.” – William Saroyan..

- सायकल चालावा, निरोगी रहा हा सायकल रॅलीचा उपक्रम पर्यावरणाचे संतुलन आणि आरोग्याची काळजी या हेतूने ११ वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येतो. यावर्षी नूतन वर्षाच्या प्रारंभी मोठ्या संख्येने या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन इस्लामपूर शहरासाठी जायंटस आणि सकाळ यांचेकडून करण्यात आले आहे.

GIANTS Welfare Foundation Federation 1A (N.G.O) Giants International Federation 2 C Giants International RTI FORUM Giants Friends Giants international Prerna sriganganagar Giants Giantschowpatty

  महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक सकाळ आणि जायंटस या सामाजिक संस्थेतर्फे इस्लामपूर येथे सायकल-डे निमित्त भव्य रॅलीचे आयोजन...
29/12/2023

महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक सकाळ आणि जायंटस या सामाजिक संस्थेतर्फे इस्लामपूर येथे सायकल-डे निमित्त भव्य रॅलीचे आयोजन - २०२४.

'जगण्यातील आनंद हीच खरी वास्तविकता आहे' असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.श...
28/06/2023

'जगण्यातील आनंद हीच खरी वास्तविकता आहे' असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.श्री.दिलीप पटवर्धन यांनी रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी केले......
जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर आणि श्री लक्ष्मीनारायण पाटीदार सनातन समाज / युवक मंडळ / महिला मंडळ, इस्लामपुर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते.
सध्याचे राहनीमान, जीवनशैली व आरोग्य तसेच नेत्रदान आणि त्वचादान याबाबत डॉ. पटवर्धन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक जायंटसचे माजी अध्यक्ष श्री किरीट पटेल यांनी केले. पाटीदार समाजाचे अध्यक्ष श्री श्यामजीभाई पटेल यांनी पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
रक्तदान शिबिरामध्ये ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी श्री लक्ष्मीनारायण पाटीदार सनातन समाज, इस्लामपुरचे अध्यक्ष मा. श्री. शामजीभाई पटेल, पाटीदार युवक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री भरतभाई पटेल, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दमयंती पटेल, तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. सुनील मलगुंडे, जायंटस ग्रुपचे अध्यक्ष नितीन फल्ले, कार्यवाह ॲड. श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष रणजीत जाधव, भूषणजी शहा, राकेश कोठारी, ज्येष्ठ सदस्य गजानन परब, युनिट डायरेक्टर दुष्यंत राजमाने, इंजि भुवनेश पवार, इंजि. आशिष मलगुंडे, माजी अध्यक्ष दत्तात्रय माने ,पी आर ओ अमेय शहा क्रीडाइचे अध्यक्ष उमेश रायगांधी, तसेच कार्यवाह श्री कांतीभाई पटेल, श्री लक्ष्मीनारायण पाटीदार सनातन समाजाचे पीआरओ श्री तुलसीभाई पटेल, पुरुषोत्तम पटेल, लिलाधर पटेल, प्रवीण पटेल, खेतालाल पटेल,ख़िमज़ी पटेल, लिजेश पटेल, सतीश पटेल, विनोद पटेल उपस्थित होते.

____ 🙏🌷🙏 In loving memory of Rajesh Joshi ____ विनम्र अभिवादन... 🙏🌷🙏19th Death Anniversary...
19/03/2023

____ 🙏🌷🙏 In loving memory of Rajesh Joshi ____ विनम्र अभिवादन... 🙏🌷🙏
19th Death Anniversary...

Giants International in Action - Lord Mahavir Swami Followers Giants Group Twiga & Nation Media Group Lord Mahavir Swami...
22/02/2023

Giants International in Action -
Lord Mahavir Swami Followers
Giants Group Twiga & Nation Media Group

Lord Mahavir Swami Followers donated Food Ration Packs and blankets to 540 Nation Newspapers vendors.
The occasion of Valentines was celebrated by bringing smiles and happiness to the vendors. Giants Group Twiga distributed the packs at Nation Printing plant
The CEO of NMG Mr Stephen Gitagama graced the occasion along with members of Giants Twiga.

आज इस्लामपूर जायंटसने स्व. काकासाहेब चितळे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले. ग्रुपचे अध्यक्ष मा....
08/02/2023

आज इस्लामपूर जायंटसने स्व. काकासाहेब चितळे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले. ग्रुपचे अध्यक्ष मा. दत्तात्रय माने आणि कार्यवाह प्रविण फल्ले यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. भूषण शहा, दुष्यंत राजमाने, दत्तात्रय माने, रणजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीकांत पाटील, संपत कोकाटे, नितीन पारेख यांची उपस्थिती लाभली.
-----------🌷

जायंटस रत्न स्व. काकासाहेब चितळे यांच्या कार्याचा आढावा घेणारा दैनिक लोकसत्ताने लिहलेला लेख आज वाचनात आला.....

शिस्तप्रिय, प्रेमळ, निगर्वी ... समाजसेवक स्व. काकासाहेब चितळे यांनी शेकडो स्थानिकांना रोजगार दिला. अनेकांना या दुग्ध व्यवसायात उभे करत स्वावलंबी केले. या उद्योगाचा विस्तार आणि विकास करतानाच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही कार्याचे मानदंड प्रस्थापित केले. सांगली-भिलवडी परिसरातील अनेक शाळा, वाचनालये, संस्थांचे ते आधार होते. ‘जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन’, भिलवडी सार्वजनिक वाचनालय, भिलवडी शिक्षण संस्था, मुंबई माता-बाल संगोपन केंद्र, विवेकानंद नेत्र चिकित्सालय, ‘नॅब’, लायन्स अशी या संस्थांची मोठी यादी बनवता येईल. यांपैकी अनेक संस्थांचे ते अध्यक्ष राहिले, आश्रयदाते होते. भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे ते गेल्या २७ वर्षांपासून अध्यक्ष होते, तर भिलवडी शिक्षण संस्थेचे गेली अनेक वर्षे विश्वस्त व संचालक होते. या संस्थांच्या पाठीशी ते केवळ आश्रयदाते या नात्याने न राहता त्यांनी त्यांच्या कार्यातही आमूलाग्र बदल केले. भिलवडी वाचनालयात त्यांनी सुरू केलेला वाचनकट्टा, शाळांमध्ये घडवलेले बदल, सांगली-कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या संकटकाळी ‘चितळे डेअरी’च्या माध्यमातून उभे केलेले मदतकार्य ही सर्व त्यांच्यातील सामाजिक जागल्याचीच लक्षणे होती. शेती, आरोग्य, नेत्रदान, रक्तदान, उद्योग अशा अनेक चळवळींशीही त्यांनी जोडून घेतलेले होते. विविध स्तरावर समाजासाठी मोठे योगदान त्यांनी दिले आहे.
---------- 🌷
'जायंट्स' या सामाजिक संघटनेच्या कार्यप्रवासात स्व. काकासाहेब यांच्यासारख्या थोर समाजसेवी व्यक्तित्वचा सहवास आम्हाला लाभला त्या सर्व स्मृति आजही तितक्याच सगंधित आहेत.
प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे स्व. काकासाहेब चितळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन ...

Address

Giants Islampur, Giants Hall, Opp. Urdu Highschool
Islampur
415409

Telephone

+919860600151

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Giants Social Forum posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

Our Story

First India - based International Service Organization Founded - 31st August 1972. It is our commitment that with Generosity in our heart and with Integrity as our guide, we shall carryout our Actions and with Nobility in our heart and Truth... Mr. Chudasama was the pioneer of the only India based social ser vice organization Giants International which now has over 600 groups existing as on December 2018 including 7 groups abroad say Nairobi, Nairobi Twiga, London, Maurities,USA, UAE, Auckland (New Zealand). GI President Padmshri Nana Chudasama inaugurated our Giants Group of Islampur in 1977. This organization was solely started by him with service to humanity as its main objective. Besides projects done in various fields such as Family welfare, Disaster Management programmes during earthquakes, floods, and other National calamities, Environmental projects, Support to the differently abled, Medical, Educational and Water harvesting projects, Water conservation project, Consumerism & Environment, help to differently able and many other public spirited activities in India & abroad.