Harshvarrdhan Patil

Harshvarrdhan Patil • President, National Federation of Cooperative Sugar Factories Ltd
• Former Cabinet Minister, Maharashtra
• Chancellor, Pimpri Chinchwad University and 2009.

Harshvardhan Shahaji Patil (Marathi: हर्षवर्धन शहाजी पाटील ) (born August 21, 1963), is a Maharashtra politician from Bharatiya Janata Party.[1]

He was one of the few ministers who was presiding as a minister for four consecutive terms in Government of Maharashtra. He has shouldered responsibilities of Cooperative Ministry and currently Legislative Affairs. He is known for cordial relations with

all party members. He is Minister since 1995. He was elected MLA in 1995, 1999, 2004. He was appointed as co-operation and parliamentary affairs minister in Chief minister Prithviraj Chavan's ministry. Patil has a soft image in among the ministers. He is the nephew of Shankarrao Bajirao Patil, the former MP.

📍 नेचर डिलाईट, कळसनेचर डिलाईट डेअरीच्या नवीन गेस्ट हाऊस व फार्म हाऊस च्या वास्तुशांती समारंभ निमित्ताने उपस्थित राहत शुभ...
05/09/2026

📍 नेचर डिलाईट, कळस

नेचर डिलाईट डेअरीच्या नवीन गेस्ट हाऊस व फार्म हाऊस च्या वास्तुशांती समारंभ निमित्ताने उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

📍 नवी दिल्ली  भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव मा.संजीव चोप्रा जी तसेच संयुक्त सचिव (साखर) मा. अश्विन...
03/09/2026

📍 नवी दिल्ली

भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव मा.संजीव चोप्रा जी तसेच संयुक्त सचिव (साखर) मा. अश्विनी श्रीवास्तव जी यांची भेट घेऊन साखर उद्योगाच्या विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

📍 नवी दिल्ली   आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी तसेच केंद्रीय कृषिमंत्री मा. ...
02/09/2026

📍 नवी दिल्ली

आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.नितीनजी गडकरी तसेच केंद्रीय कृषिमंत्री मा. शिवराजसिंहजी चौहान यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योग आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रासमोरील विविध महत्वपूर्ण प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, साखर उद्योगाला स्थैर्य मिळावे, इथेनॉल निर्मितीला अधिक चालना मिळावी आणि ऊस व साखर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, यासाठी आवश्यक धोरणात्मक बाबींवर सकारात्मक चर्चा झाली.

📍 पुणे | Puneमहाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, श्री. दिलीपरावजी देशमुख यांना आज पुणे येथे जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनच्या वती...
31/08/2026

📍 पुणे | Pune

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, श्री. दिलीपरावजी देशमुख यांना आज पुणे येथे जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने ‘सहकारभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या मानाच्या पुरस्काराबद्दल दिलीपरावजींचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ, माजी मंत्री श्री. बाळासाहेबजी थोरात, ज्येष्ठ नेते श्री. उल्हासदादा पवार, खासदार मा. डॉ. शिवाजी काळगे, प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे जी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दिलीपरावजी देशमुख यांनी केलेल्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्याची पावती आहे.

राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि युवावर्गाच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेबांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. मराठवाड्यासारख्या मागास भागात सहकार चळवळीची भक्कम पायाभरणी व्हावी, या दूरदृष्टीतून लातूर येथे मांजरा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली.

विलासरावजींच्या या दूरदृष्टीचा वारसा पुढे नेत शिस्त, नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून दिलीपरावजींनी मांजरा परिवाराला नवी उंची मिळवून दिली.आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा परिवारातील साखर कारखाने आदर्शवत कार्य करत असून, त्यांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक सहकारी संस्था व साखर कारखाने करत आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील अर्थकारणाला नवी गती मिळत असून हजारो शेतकरी, कामगार आणि कुटुंबांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे.

दिलीपरावजी देशमुख यांना ‘सहकारभूषण’ पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!

📍 जळगावमहाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या प्रदीर्घ कार्यातून स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेत...
30/08/2026

📍 जळगाव

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या प्रदीर्घ कार्यातून स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांचा गौरव करण्याचा मनस्वी आनंद झाला.

शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रश्नांना सातत्याने आवाज देत, संघर्षशील नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे खडसे साहेब यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकप्रतिनिधी, मंत्री आणि ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

जळगाव परिसराच्या विकासासह कृषी, सिंचन, ग्रामीण विकास, सहकार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने भूमिका मांडली. जनतेशी असलेला त्यांचा थेट संवाद, स्पष्टवक्तेपणा आणि प्रश्न सोडविण्याची तळमळ ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये आहेत.
अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान आणि अनुभव ही महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रासाठी मोठी संपत्ती आहे.

खडसे साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

📍 मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीस आज उपस्थित राहिलो.आदरणी...
29/08/2026

📍 मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीस आज उपस्थित राहिलो.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीकरणासह पक्ष अधिक लोकाभिमुख, प्रभावी आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली तसेच महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर, जनतेच्या अपेक्षा आणि आगामी काळातील पक्षाची भूमिका याबाबतही उपस्थित मान्यवरांशी विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.शशिकांतजी शिंदे, खासदार मा.सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री आमदार मा.जयंतरावजी पाटील, मा. जितेंद्रजी आव्हाड, मा.अनिलजी देशमुख, मा. राजेशजी टोपे, मा.राजेंद्रजी शिंगणे, खासदार डॉ. मा.अमोलजी कोल्हे, खासदार मा.निलेशजी लंके, माजी खासदार मा.फौजियाताई खान, माजी आमदार ॲड. मा.अशोकबापू पवार यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#राष्ट्रवादीकाँग्रेस

Address

Indapur
Indapur
413103

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harshvarrdhan Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Harshvarrdhan Patil:

Shortcuts

Share