04/10/2021
*लोटस इंग्लिश मिडीयम स्कुल, इचलकरंजी.*
आज *लोटस इंग्लिश मिडीयम स्कुल, जवाहर नगर, इचलकरंजी येथे 2 ऑक्टोबर 2021 रोजी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती* साजरी करणेत आली.
यावेळी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस मा. शिक्षिका सारला दिवटे मॅडम यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून तुषार सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी स्कुल मध्ये *महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री* यांच्या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
मा. शिक्षिका स्मिता सौदत्तिकर मॅडम यांनी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांच्या इतिहासाचा उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षिका रुपाली शिंदे मॅडम, योगिता कोष्टी मॅडम, तैजुम मुजावर मॅडम, कोष्टी मावशी उपस्थित होते.