Gondia Police

Gondia Police Gondia District Police Official Page

आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत अधिकारी अंमलदार यांनां मा. पोलीस महासांचालक यांचे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल हार्दिक अभ...
01/05/2026

गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत अधिकारी अंमलदार यांनां मा. पोलीस महासांचालक यांचे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.🎉

सर्वांना महाराष्ट्र दिन आणि  गोंदिया जिल्हा स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
01/05/2026

सर्वांना महाराष्ट्र दिन आणि गोंदिया जिल्हा स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया प्रेस नोटशनिवार  दिनांक-   १८/०४/ २०२६स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरीमो...
18/04/2026

पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया
प्रेस नोट
शनिवार दिनांक- १८/०४/ २०२६
स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरी
मोटार सायकल चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या जाळ्यात -
पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतून मोटर सायकल चोरी करणारा आरोपीकडून चोरीची १ मोटारसायकल एकूण किमती ५०,०००/- रुपये चा मुद्देमाल जप्त
--००--
दिनांक १७/०४/२०२६ रोजी मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सर यांचे निर्देशाप्रमाणे व पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर , स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक पोलीस स्टेशन रामनगर व गोंदिया शहर परिसरात अउघड मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी शोध व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना सिविल लाईन परिसरात लोकोशेडच्या जवळ एक संशयित इसम मोटर सायकल सह मिळून आल्याने त्यास पोलीस पथकाने नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव गौरव उर्फ सलमान नरेश शर्मा वय २७ वर्ष राहणार यादव चौक गोंदिया असे सांगितले व तसेच त्याचे ताब्यातील मोटर सायकल बाबत सखोल विचारपूस करण्यात आली असता त्याने सदरची मोटर सायकल रामनगर परिसरातून चोरी केल्याचे कबुल केले .
दिलेल्या माहितीनुसार आरोपी नामे गौरव उर्फ सलमान नरेश शर्मा वय २७ वर्ष राहणार यादव चौक गोंदिया याचेकडून खालीलप्रमाणे १ मोटर सायकल हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहे.
१) १ हिरो कंपनी ची HF Delux मोटर सायकल काळ्या रंगाची अंदाजे किमती ५०,०००/- रुपये

वरील जप्त करण्यात आलेले मोटर सायकल बाबत गुन्हे अभिलेख तपासण्यात आले असता हे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस स्टेशन रामनगर येथील अपराध क्रमांक १९६/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेलेले वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर आरोपीस मुद्देमाल सह पोलीस स्टेशन रामनगर येथे पुढील तपास कामी स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सहायक फौजदार राजू मिश्रा, पोहवा महेश मेहर, पोहवा प्रकाश गायधने, पो. शि. राकेश इंदूरकर, चापोशि राम खंदारे यांनी केली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदियाप्रेसनोटदिनांक 30.03.2026**  *नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वी थांबविण्यात आला. *दामिनी पथक ग...
18/04/2026

पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया
प्रेसनोट
दिनांक 30.03.2026

** *नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वी थांबविण्यात आला.

*दामिनी पथक गोंदिया व जिल्हा महिला बालविकास, इंडियन वेलफेअर सोसायटी गोंदिया यांची संयुक्त कारवाई*

गोंदिया -
दिनांक 28/3/2026 रोजी तिरोडा येथे बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच. मा. जिल्हाधिकारी प्रजित नायर, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी कीर्ती कुमार कटरे आणि मा.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांचे आदेशान्वये आणि मार्गदर्शनात दामिनी पथकचे गोंदिया चे पोलीस निरीक्षक योगिता चाफले मॅडम, जिल्हा बाल संरक्षण कक्ष , चाइल्ड हेल्पलाइन, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया, दामिनी पथक यांची टीम तयार करून प्राप्त माहितीनुसार होऊ घातलेल्या विवाहातील बालक आणि बालिकेचे जन्म प्रमाणपत्र नगरपरिषद तिरोडा कडून प्राप्त करून घेण्यात आले. सदर प्रमाणपत्रा नुसार बालिकेचे वय बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार पूर्ण नसल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने संपूर्ण टीम तिरोडा येथे 12 वाजता पोहोचले.दामिनी पथक चे पोलीस निरीक्षक योगिता चाफले, सहायक पोलीस निरीक्षक मनिषा निकम मॅडम, पोलीस उपनिरीक्षक पूजा सुरळकर, पो. शि. प्रशांत बनसोड, म. पो. शि. सोनाली टिके, म. पो. शि. प्रीती बुरेले, म. पो. शि, वैशाली भांडक्कर, पर्यवेक्षिका पद्मशाली मॅडम,अंगणवाडी सेविका, नगरसेवक अनिकेत कटरे, वार्ड बाल संरक्षण समितीचे इतर सदस्य यांची बैठक घेऊन सदर होणाऱ्या विवाहाबद्दल माहिती देण्यात आली.
मंडप पूजन व हळदीचा कार्यक्रम 4 एप्रिल
2026 रोजी आणि 5 तारखेला सकाळी 11.30 वाजता लग्न होत असल्याची माहिती मिळाली होती. दामिनी पथक सह, महिला बाल विकास विभाग व इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी च्या टीमने नवरदेव, नवरी त्यांच्या आई वडील आणि नातेवाईक यांचेकडे चौकशी करुन सदर होऊ घातलेल्या विवाहातील बालकांचे वय कमी असून बालविवाह प्रतिबंधक 2006 च्या कायद्यानुसार वय पूर्ण नसल्याने गुन्ह्यास पात्र आहे. बालविवाहमुळे होणारे दुष्परिणाम बालकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगण्यात आले. वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे कायदेशीर हमीपत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाईकांकडून आणि बाल संरक्षण समितीच्या सदस्यांकडून लिहून घेण्यात आले. बालविवाह मुक्त भारत, बालविवाह मुक्त महाराष्ट्र आणि गोंदिया जिल्हा या महत्त्वकांक्षी अभियानाची मोहीम सुरू असून बालविवाह मुक्त गोंदिया करण्यासाठी आपला संकल्प अभियान सुरू आहे. याप्रसंगी जमलेल्या सर्व लोकांना अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास अंगणवाडी सेविका, जवळचे पोलीस स्टेशन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन च्या टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावे असे सांगण्यात आले.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांचे नेतृत्वात ही कार्यवाही करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्ता मनीषा चौधरी आणि इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीच्या दीपमाला भालेराव यांनी बालिकेचे समुपदेशन करून पुढील शिक्षण घेणार असल्याचे बालिकेने सांगितले. बालिकेला मा. बालकल्याण समिती गोंदिया यांच्या समक्ष सादर करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर होणारा बालविवाह थांबविण्याकरिता दामिनी पथकाचा पोलीस निरीक्षक योगिता चाफले व . सहायक पोलीस निरीक्षक मनिषा निकम मॅडम, पोलीस उपनिरीक्षक पूजा सुरळकर, पो.शि. प्रशांत बनसोड, म. पो. शि. सोनाली टिके, म. पो. शि. प्रीती बुरेले, म. पो. शि, वैशाली भांडक्कर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे मुकेश पटले संरक्षण अधिकारी, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, बाल विकास प्रकल्प अधिकारी तिरोडा विनोद चौधरी, आणि रवींद्र टेंभुर्णे संरक्षण अधिकारी,चाईल्ड लाईनचे अजय खोब्रागडे आणि तिरोडा पोलीस स्टेशन बालविवाह थांबविण्याच्या कार्यवाहीमध्ये सहभागी होते.

*दिनांक :-१४/०४/२०२६**पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*सामान्य प्रशासन विभाग,...
18/04/2026

*दिनांक :-१४/०४/२०२६*

*पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन २०२६ मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ति संत व समाजसुधारक यांची जयंती शासकिय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे. त्याअनुषंगाने दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर मपोका पल्लवी वैभव गजभिये यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश लावुन उपस्थितांना थोडक्यात माहीती सांगितली.

सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह श्री रामदास शेवते प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया पोनि रामेश्वर पिपरेवार तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरीमोटार सायकल चोरी करणारे  २ अट्ट्ल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या ...
18/04/2026

स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया ची धडाकेबाज कामगीरी
मोटार सायकल चोरी करणारे २ अट्ट्ल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या जाळ्यात -
गोंदिया जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे व नागपूर येथील १ गुन्हा उघड - आरोपीतांकडून चोरीचे ३ मोटारसायकल एकूण किमती २,१०,०००/- रूपये जप्त
--००--

दिनांक १६/०४/२०२६ रोजी मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सर यांचे निर्देशाप्रमाणे व पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर , स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया येथील पोलीस पथक जिल्हा हद्दीत अउघड मोटार सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपी शोध व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदार कडून माहिती प्राप्त झाली कि १) धीरज भूषण फुंडे वय ३५ वर्ष रा. कालीमाटी व त्याचा मित्र २) तेजराम उर्फ तेजस जगदीश आडे , वय ३० वर्ष रा. कोंढा कोसारा तालुका पवनी जि भंडारा यांनी मिळून गोंदिया जिल्यातील व नागपूर येथून मोटार सायकल चोरी केलेली असून चोरीची मोटार सायकल विक्री करण्यासाठी गोंदिया येथे येणार आहेत.
या खबरेवर स्थानिक गुन्हे शाखांचे पथकाने सापळा रचून १) धीरज भूषण फुंडे वय ३५ वर्ष रा. कालीमाटी २) तेजराम उर्फ तेजस जगदीश आडे , वय ३० वर्ष रा. कोंढा कोसारा तालुका पवनी जि भंडारा यांना दिनांक १६/०४/२०२६ रोजी सायंकाळी मौजा कुडवा येथून ताब्यात घेऊन मोटार सायकल चोरी संबंधाने सखोल विचारपूस केली असता सांगितले कि, दोघांनी मिळून आमगाव येथून २ मोटर सायकल , गोंदिया रेल्वे स्टेशन परिसरातून १ मोटर सायकल व प्रतापनगर नागपूर परिसरातून १ मोटार सायकल चोरी केल्याचे काबुल केले .
दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपीतांकडून खालीलप्रमाणे एकूण ३ मोटर सायकल हस्तगत करून जप्त करण्यात आलेले आहेत .
१) १ हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल काळ्या रंगाची अंदाजे किमती ५५,०००/- रुपये
२) १ हिरो कंपनी ची स्प्लेंडर मोटार सिल्वर काळ्या रंगाची अंदाजे किमती ७५,०००/- रुपये
३) १ हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल काळ्या रंगाची अंदाजे किमती ८०,०००/- रुपये
असे एकूण ३ मोटर सायकल एकूण किमती २,१०,०००/- रुपयाचे जप्त करण्यात आलेले आहेत.
वरील जप्त करण्यात आलेले मोटर सायकल बाबत गुन्हे अभिलेख तपासण्यात आले असता हे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस स्टेशन आमगाव येथील २ गुन्हे , पोलीस स्टेशन गोंदिया येथील १ गुन्हा , पोलीस स्टेशन प्रतापनगर नागपूर येथील १ गुन्हा असे गोंदिया जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे एकूण ३ गुन्हे व नागपूर जिल्ह्यातील १ गुन्हा असे एकूण ४ गुन्हे स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी उघडकीस आणला आहे.
आरोपितानी १ मोटार सायकल कवर्धा छत्तीसगढ़ येथे लपवून ठेवलेली असून ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दोन्ही आरोपीताना मुद्देमाल सह पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे पुढील तपास कामी स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात सपोनि धीरज राजूरकर, सहायक फौजदार राजू मिश्रा, पोहवा महेश मेहर, पोहवा दीक्षितकुमार दमाहे , सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, पो. शि. राकेश इंदूरकर, चापोशि घनश्याम कुंभलवार यांनी केली आहे.

“गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्...
11/04/2026

“गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न”
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातून फेब्रुवारी-२०२६ मधे “गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न” करीता निवड झालेले गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनचे तापसी अधिकारी/भूषण बुराडे, सपोनि/किशोर मावस्कर, पोलीस निरीक्षक/पुरुषोत्तम अहेरकर व पैरवी अधिकारी यांना आज दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

02/04/2026

गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत जाळीत महिलेचा खुनाचा २४ तासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीस अटक

02/04/2026

गोंदिया शहर हद्दीत झालेल्या खुनाचे गोंदिया पोलीस यांच्याकडून उघड.......

02/04/2026

गणपती विर्सजन मिरवणूक व ईद ए मिलाद संबंध पो स्टे गोंदिया शहर व पो स्टे रामनगर हद्दीत रूट मार्च

Address

S. P. Office, Patanga Maidan, Amgaon Road
Gondia
441601

Telephone

+91 7182 237 129

Website

https://www.instagram.com/gondia_police/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gondia Police posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gondia Police:

Share