Gondia District Youth Congress

Gondia District Youth Congress Official page of Gondia District Youth Congress

✊ लोकशाहीच्या आवाजावर दडपशाहीचा निषेध!शिवराज मोरे यांच्यावरील कथित पोलिसी मारहाणीचा तीव्र निषेध!महाराष्ट्र प्रदेश युवक क...
10/09/2026

✊ लोकशाहीच्या आवाजावर दडपशाहीचा निषेध!

शिवराज मोरे यांच्यावरील कथित पोलिसी मारहाणीचा तीव्र निषेध!

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शिवराज मोरे यांच्यावर आंदोलनादरम्यान पोलिसांकडून कथितरीत्या करण्यात आलेल्या मारहाण व गैरवर्तनाच्या घटनेचा गोंदिया जिल्हा युवक काँग्रेस व NSUIच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

या गंभीर घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ FIR दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आंदोलनस्थळावरील CCTV फुटेज व व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासात घेण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

अर्जुनी मोर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आशिष कापगते यांच्या पुढाकाराने युवक काँग्रेस व NSUIच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर ठाम भूमिका मांडली.

🔥 “लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही सहन करणार नाही!”

दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या वेळी गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुलदीपसिंह राठोड, जिल्हा महासचिव गिरीश शुक्ला, हितेश हत्तीमारे, NSUI तालुकाध्यक्ष अनुप बोरकर, वैभव दहिवले, सौरभ हुकरे, भास्कर गीदमारे, यश यरणे, जितेंद्र हातझाडे, तेजस कांबळे, पवन बहेकार यांच्यासह युवक काँग्रेस व NSUIचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

✊ अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी युवक काँग्रेस ठामपणे उभी आहे!

📍 गोंदिया

Maharashtra Pradesh Youth Congress
Shivraj More
Ashish Kapgate Patil

नागपूर येथील संविधान सन्मान यात्रा आंदोलन दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री शिवराज दादा मोरे यांचा ...
10/09/2026

नागपूर येथील संविधान सन्मान यात्रा आंदोलन दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री शिवराज दादा मोरे यांचा गळा दाबणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबनाची व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासंदर्भात नंदनवन पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी झालेल्या घटनेचा आक्रमकपणे निषेध व्यक्त केला.

📍 नंदनवन पोलीस स्टेशन, नागपूर



Maharashtra Pradesh Youth Congress
Shivraj More

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मा आमदार आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक श...
31/08/2026

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मा आमदार आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

आपणास उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

आपल्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होवो आणि जनतेच्या सेवेचे हे कार्य अविरत सुरू राहो, याच मनापासून शुभेच्छा!


Harshwardhan Sapkal

1501 वें जश्ने ईद- ऐ- मिलादुन्नबी के पुरखुलूस मौके पर तहेदिल से मुबारकबाद ❤️
26/08/2026

1501 वें जश्ने ईद- ऐ- मिलादुन्नबी के पुरखुलूस मौके पर तहेदिल से मुबारकबाद ❤️

Address

Sahid Bhola Bhavan Gondia
Gondia

Telephone

+919834154963

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gondia District Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share