Sahara Anathalay Parivar, Balgram

Sahara Anathalay Parivar, Balgram AAI Foundation -"The Origin Of Love..." Home That Joins Humanity & Relationship

जागतिक पर्यावरण दिन विशेष...आज बालग्राम परिवारातील चिमुकल्यांनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संरक्षणाचा सुंदर आणि प्...
05/06/2026

जागतिक पर्यावरण दिन विशेष...

आज बालग्राम परिवारातील चिमुकल्यांनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संरक्षणाचा सुंदर आणि प्रेरणादायी संकल्प केला.

हवामान बदल, वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि जलसंकट यांसारख्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पृथ्वीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हेच महत्त्व बालग्रामच्या बालकांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केले.

यावेळी गेवराई वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. समाधान सानप सर तसेच वनपरिक्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी बालकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत वृक्षसंवर्धन, पाणी बचत आणि स्वच्छतेचा संदेश दिला.

एक झाड – अनेक पिढ्यांचा श्वास
पाण्याचा प्रत्येक थेंब – भविष्याची बचत
स्वच्छ पर्यावरण – निरोगी जीवन

चला, आपणही पर्यावरणपूरक सवयी अंगीकारूया आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी हिरवीगार, स्वच्छ आणि सुरक्षित पृथ्वी घडवूया.

“निसर्ग वाचवा... भविष्य घडवा!”

#माझीवसुंधरा #जागतिकपर्यावरणदिन #पर्यावरणसंवर्धन #बालग्रामपरिवार

05/06/2026

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज बालग्राम परिवारातील चिमुकल्यांनी 'माझी वसुंधरा' शपथ घेऊन निसर्गाचे रक्षण करण्याचा सुंदर संकल्प केला. आपल्या पृथ्वीला हिरवीगार आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे, हेच या लहानग्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. या बालकांचा हा उत्साह नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. चला, आपणही यात सहभागी होऊया! 🌱✨
#जागतिकपर्यावरणदिन #माझीवसुंधरा #बालग्राम #पर्यावरणरक्षण

"निसर्गाचा समतोल राखूया, समृद्ध भविष्याकडे वाटचाल करूया."
05/06/2026

"निसर्गाचा समतोल राखूया, समृद्ध भविष्याकडे वाटचाल करूया."

🌼  #मनापासून_आवाहन 🌼समाजातील अनेक निराधार, अनाथ, संकटग्रस्त आणि वंचित बालके आज शिक्षण, संस्कार आणि सुरक्षित भविष्याच्या ...
04/06/2026

🌼 #मनापासून_आवाहन 🌼
समाजातील अनेक निराधार, अनाथ, संकटग्रस्त आणि वंचित बालके आज शिक्षण, संस्कार आणि सुरक्षित भविष्याच्या प्रतीक्षेत आहेत. या मुलांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
बालग्राम परिवार अशा गरजू बालकांना मोफत शिक्षण, निवासी सुविधा, संगोपन आणि संस्कार देण्याचे कार्य करत आहे. प्रत्येक बालकाला प्रेम, आधार आणि संधी मिळाली तर तेही उद्याचे जबाबदार नागरिक बनू शकतात.
आपल्या परिसरात जर अनाथ, निराधार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील किंवा इतर संकटग्रस्त परिस्थितीतील पात्र बालके असतील, तर त्यांची माहिती संस्थेपर्यंत पोहोचवा. तसेच या सेवाभावी कार्यात सहभागी होऊन समाजाप्रती आपले कर्तव्य निभावा.
एक हात मदतीचा... एका बालकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी!
"आज दिलेला आधार, उद्या एका बालकाचे संपूर्ण आयुष्य घडवू शकतो."
📞 संपर्क: 75881 77979 | 75594 37365 | 96040 08205
बालग्राम परिवार
"संगोपन • संस्कार • सुरक्षित भविष्य"

हे खूप त्रासदायक चित्र आहे...अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे... ज्यांना मुलं नको असतील त्यांनी ...
26/05/2026

हे खूप त्रासदायक चित्र आहे...

अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे...

ज्यांना मुलं नको असतील त्यांनी आमच्याकडे सोपवावीत आम्ही त्यांचं पालनपोषण करू!

त्या निरागस, निरपराध जीवांना इतक्या क्रूरपणे चिरडण्याचा तुम्हाला मायबाप असला तरी अधिकार नाही!

संवेदनशील नागरिकांना नम्र आवाहन आहे. आपल्या आजूबाजूला अशा शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या घटना घडत असल्यास पुढाकार घ्यावा...

मुलांसाठी 24×7 मो. 7588177979 या क्रमांकावर कॉल करा...

ही देशाची संपत्ती हकनाक जाऊ द्यायची नाही... हे घडू नये त्याकरिता पुढाकार घ्या... सोबत या...

संवेदनशील मानवतेला आपुलकीची साद...Please share it...😊
17/05/2026

संवेदनशील मानवतेला आपुलकीची साद...

Please share it...😊

गौरवमूर्तींच्या सन्मानाने उजळला प्रेरणेचा सोहळा! बालग्राम परिवाराच्या कार्याचाही झाला सन्मान! (हा सन्मान आम्ही कृतज्ञता ...
16/05/2026

गौरवमूर्तींच्या सन्मानाने उजळला प्रेरणेचा सोहळा!

बालग्राम परिवाराच्या कार्याचाही झाला सन्मान!

(हा सन्मान आम्ही कृतज्ञता पूर्वक कै. श्री. आनंद (काका) नाडकर्णी यांना समर्पित करत आहोत.)

रोटरी क्लब ऑफ गेवराई यांच्या वतीने आयोजित “पुरस्कार वितरण सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर “गौरवमूर्ती” चा यावेळी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात
गेवराई शहराच्या प्रथम नागरिक मा. सौ. गीताभाभी पवार — (राजकारण/ समाजकारण)

र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या मा. प्राचार्या डॉ. रजनी शिखरे — शैक्षणिक क्षेत्र

मा. सौ. संगीता भावसार — संगीत

मा. प्रा. डॉ. राणी पवार (राठोड) — क्रीडा क्षेत्र

या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बालग्राम परिवाराचा झालेला गौरव हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला.

या कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर सुधीर लातुरे सर, संगीताताई लातुरे, कल्याणजी कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे, उपाध्यक्ष सुदाम धुपे, सचिव प्रविणजी जैन, उत्कृष्ट निवेदक आणि संवादक धर्मराज करपे सर, नगरसेवक प्रशांतजी राख व सोपनजी मडके, प्रा. शरद सदाफुले सर, उत्तम निवेदक श्री. गलांडे सर, श्री. सुरेंद्र अप्पा रुकर आणि राजेंद्र ढेंगे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सन्मानपूर्वक गौरव केला.

रोटरी क्लब ऑफ गेवराई परिवाराचे मनःपूर्वक आभार!
🙏
बालग्राम परिवार

 #संघर्षातून_यशाच्या_शिखराकडेबालग्राम परिवारातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून सर्वां...
11/05/2026

#संघर्षातून_यशाच्या_शिखराकडे
बालग्राम परिवारातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून सर्वांचं मन अभिमानाने भरून टाकलं. त्यांच्या या यशाचं कौतुक करत दै. बीडसत्ता, बीडचे संपादक मिलिंदजी आदमाने यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
बालग्राम परिवार त्यांच्या या प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे...🙏

#10वी_चा_निकाल
#विद्यार्थ्यांचे_यश
#संघर्षातून_यश








#बालग्राम_परिवार
#उज्ज्वल_भविष्य
#शिक्षण_ही_शक्ती

संघर्षातून उमललेलं यश.!       बालग्राम परिवारातील आपल्या लेकरांनी इयत्ता 10 वीच्या परीक्षेत यश संपादन करत आयुष्याच्या नव...
08/05/2026

संघर्षातून उमललेलं यश.!

बालग्राम परिवारातील आपल्या लेकरांनी इयत्ता 10 वीच्या परीक्षेत यश संपादन करत आयुष्याच्या नव्या वाटेवर पहिले पाऊल टाकले आहे. ज्यांच्या आयुष्यात कधीकाळी अंधार, वेदना, असुरक्षितता आणि संघर्ष होता… तीच लेकरं आज शिक्षणाच्या बळावर स्वप्नांना नवी दिशा देत आहेत.

आपल्या गुणवान विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !

आदित्य – 41.20%
प्रणव – 44.80%
बाबाजी – 45.60%
शिवकन्या – 61.20%
विद्या – 63.20%
गौरव – 69.80%
गणेश – 72.20%
सुमित्रा – 72.60%
गौरी – 73.40%
शैली – 75.20%
प्रसाद – 79.00%
कृष्णा – 83.20%

ही फक्त टक्केवारी नाही… तर प्रत्येक आकड्यामागे आहे संघर्ष, अश्रू, जिद्द, मेहनत आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न.!
या यशामागे आमच्या दात्यांचे, हितचिंतकांचे, चिंतेश्वर विद्यालय, गेवराई, आश्रमशाळा गेवराई येथील शिक्षकांचे, स्वयंसेवकांचे आणि समाजातील संवेदनशील हातांचे अमूल्य योगदान आहे. आपण दिलेल्या प्रेमामुळे, आधारामुळे आणि विश्वासामुळे ही लेकरं आज आत्मविश्वासाने उभी राहत आहेत.
आपण फक्त मदत केली नाही… तर या निरपराध लेकराच्या आयुष्याला नवी दिशा दिली, स्वप्नांना पंख दिले आणि भविष्य उजळून टाकलं. बालग्राम परिवार आपल्या प्रत्येक सहकाऱ्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. अशीच साथ, आशीर्वाद आणि मायेची ऊब कायम राहू द्या.!
आपले नम्र
🙏
प्रिती आणि संतोष गर्जे

#बालग्राम_परिवार
#१०वी_निकाल
#संघर्षातून_यश


दैनिक पुढारी बीड यांचे जिल्हा प्रतिनिधी श्रीमान उदय सर यांनी बालग्राम परिवारातील बारावी उत्तीर्ण मुलांच्या यशाचं आपल्या ...
05/05/2026

दैनिक पुढारी बीड यांचे जिल्हा प्रतिनिधी श्रीमान उदय सर यांनी बालग्राम परिवारातील बारावी उत्तीर्ण मुलांच्या यशाचं आपल्या लेखणीतून कौतुक करत पाठीवर थाप देऊ केली आहे. दै. पुढारी आणि उदय सर यांचे मनातून आभार...🙏

Address

Sahara
Gevrai
431127

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahara Anathalay Parivar, Balgram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sahara Anathalay Parivar, Balgram:

Share