Kedari Redekar foundation,Gadhinglaj

Kedari Redekar foundation,Gadhinglaj sociel worker team

जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती02327 222637
27/02/2024

जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती
02327 222637

28/03/2018
31/01/2018

पाण्यासाठी.. एक पाऊल..

गेल्यावेळी आपल्याशी संवाद साधताना गडहिंग्लज विभागाच्या पाणी प्रश्नासाठी फौंडेशन ने घेतलेल्या निर्णया संदर्भात काही गोष्टी बोललो होतो. त्यातील एक पाऊल पडले आहे. सुरवात छान झाली आहे अठावीस जानेवारी रोजी भव्य पाणी परिषद पार पडली. या पाणी परिषदेने नेमके साधले काय? असा प्रश्न काही जणांच्या मनात उपस्थित होणे शक्य आहे. या परिषदेच्या यशापयशाचा विचार करताना काही गोष्टी सांगायच्या तर या परिषदेला उदघाटक म्हणू उपस्थित राहिलेले जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषणात पाणी प्रश्न संदर्भात काही ठोस निर्णय जाहीर केले- त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे उचंगी प्रकल्पात येत्या जुने मध्ये पाणी साठपाचा प्रारंभ होईल. या शिवाय आंबेओहोळ, सर्फनाला यातील पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडवून ते प्रकल्पहि मार्गी लावले जातील. पालक मंत्र्यांच्या या ठोस आश्वासनाने परिषदेच्या नियोजनाचा हेतू बऱ्यापैकी पूर्ण झाला असे म्हणता येईल. फौंडेशन ने सर्व पक्षीयांना एकाच व्यासपीठावर आणण्याची दाखविलेली कल्पकता याचे सुद्धा पालकमंत्र्यांनी कौतुक केले. काही विकासाचे प्रश्न राजकारण पलीकडे जाऊन त्याचा विचार करण्याची आवश्यकता असते त्यासाठी अशी काही व्यासपीठे उपयुक्त ठरतात. या विभागातील सर्वच पक्षीयांनी दिलेली साथ खूपच मोलाची आणि भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारी आहे. एक परिषद झाली म्हणजे पाणी प्रश्न सुटला असे होणार नाही याचे भान आहेच. त्यासाठीच या विभागाच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा पाच वर्षाचा आराखडा करून काम करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. त्याची सुरवात म्हणूनच पाणी परिषदेचे आयोजन केले होते. आता आराखड्यानुसार कामाला प्रारंभ करताना दोन विभागावर लक्ष द्यावे लागेल. मंत्र्यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात येण्यासाठी त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी विशेष समिती कार्यरत राहणार आहे. दुसऱ्याबाजूला ज्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी काही उपक्रम राबविण्याचा प्रयत्न होणार आहे. सर्व गोष्टी शासनानेच कराव्यात अशी एक मानसिकता अलीकडे तयार झाली आहे. त्याला छेद देऊन लोक सहभाग वाढविण्यासाठी ज्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी एखादा उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदद घेणार आहोतच. त्या जोडीला ग्रामस्थांचा व्यापक सहभाग मिळविण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही गावांनी त्यासाठी प्रतिसाद दिलेला आहे. पाणी प्रश्नावर काम करताना ज्या आराखड्यावर काम होणार आहे तो गडहिंग्लज पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविणाऱ्या योजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. शासनाच्या स्तरावर जे प्रयत्न आहेत, जे प्रकल्प आहेत त्याचाशी सांगड घालून शासन आणि लोक सहभाग असा हि एक कृतिशील कार्यक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. परिषदेच्या निमित्तानं सर्व पक्ष संघटना एकत्र आले आहेत. हीच शक्ती पाणी प्रश्नाच्या सॊडवणुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागतो ज्यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या आहेत त्यांचे समाधानकारक पुनर्वसन ही सुद्धा आमच्या व्यासपीठाची जबाबदारी आहे. याचे भान सुद्धा आम्हास आहे. या पाणीप्रश्नाच्या व्यासपीठाला सर्वांनाच जोडण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे ज्यांना ज्यांना या व्यासपीठाला जोडून घ्यावयाचे त्यांनी संपर्क साधून सक्रिय व्हावे. यातुन एक सामाजिक क्षेत्रात चांगले काम केल्याचे समाधान निश्चित मिळणार आहे. गडहिंग्लज विभागाच्या पाणीप्रश्नासाठी ज्यांना काम करावयाचे आहे त्यांनी या व्यासपीठाशी संपर्क साधावा असे आवाहन करीत आहे. या आव्हानाला आपण प्रतिसाद द्याल असा विश्वास व्यक्त करून इथेच थांबतो.

धन्यवाद!



आपलाच

सुनील शिंत्रे Shintre

27/01/2018

केदारी रेडेकर फौंडेशन, गडहिंग्लज जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)
‘‘ जन संवाद ’’
आज तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर संवाद साधणार आहे. पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याची सर्वांनाच कल्पना आहे. पावसाचे प्रमाण अनियमित आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी याचा शेती उद्योगाला फटका बसतो आहे. महाराष्ट्रातील शेतकÚयांच्या आत्महत्या हा सर्वांच्या चिंतेचा जसा विषय आहे. त्याचबरोबर या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी चिंतन देखील आवश्यक आहे. केवळ बोलत बसण्यापेक्षा कृतीशील कार्यक्रमातुन लोकांचा सहभाग वाढविण्याची व त्यातुन मानसिकता बदलण्याची गरज आहे. हे काम अवघड असले तरी अशक्य मात्र निश्चितच नाही. या साÚया पाश्र्वभुमीवर फौडेशनने गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाणी प्रश्नावर काम करण्याचा निर्धार केला आहे. 5 वर्षाचा मास्टर प्लॅन करून या कामाचा प्रारंभ 28 जानेवारी रोजी होणाÚया पाणी परिषदेतून होत आहे. या परिषदेला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा राज्यमंत्री नाम. विजय शिवतारे यांच्यासह आमदार खासदार व पाणीप्रश्नाशी निगडीत असलेले विविध पक्ष संघटनातील कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. पाणी प्रश्नावर काम करताना सर्वांना या व्यासपीठाला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या महिनाभरातील नियोजनाच्या स्तरावर काम करताना मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढविणारा आहेच यातुन आणखी काम करण्याची उर्जा मिळत आहे. या विभागातील रेंगाळलेले आंबेओहोळ, सर्फनाला, उचंगी हे अंतिम टप्प्यातील प्रकल्प पुर्ण करणे, उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर व्हावा यासाठी जलसाक्षरता अभियान राबविणे, पाण्याचे पारंपारिक स्त्रोत खुले करण्याबरोबरच विहीरी आणि कुपनलिकांचे पुनर्भरण, पावसाचे पाणी अडवून साठविण्याच्या योजना राबविणे. तलाव बंधारे गाळमुक्त करणे अशा स्वरूपाच्या कामासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि त्या जोडीला महाविद्यालयाीन युवकांची मदत घेण्याचा प्रयत्न आहे. या जोडीला भविष्याचा विचार करून या विभागासाठी आणखी 5 टी. एम. सी. पाण्याची मागणी शासनाकडे करणे व त्याचा सतत पाठपुरावा या सर्व मुद्दयांचा मास्टर प्लॅन मध्ये समावेश आहे. हलकर्णी विभागातील 20 खेडयासाठी हिरण्यकेशीचे पाणी देणाÚया योजनेचा प्रस्ताव करून शासनाची मंजूरी घेणे, आजरा तालुक्यासाठी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करणे, यापेक्षाही प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देणे. या गोष्टींना मास्टर प्लॅनमध्ये विशेष स्थान देण्यात आले आहे. पाणी परिषद हा प्रारंभ आहे. नंतरच्या टप्प्यात पाणी चळवळीत काम करणाÚया राज्यातील व राज्या बाहेरील तज्ञांना पाचारण करून प्रबोधनातून जलसाक्षरतेचे काम करण्यात येणार आहे.
वरील संवादातुन मला पाणी प्रश्नासाठी फौडेशनची जी भूमिका आहे. ती स्पष्ट करावयाची होती. माझ्या समजूतीप्रमाणे गडहिंग्लज विभागाचा पाणी प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न. तुमच्या लक्षात आला असावा असे गृहीत धरतो. तुम्हीसुध्दा या पाणी चळवळीच्या व्यासपीठाला जोडून काही सुचना अथवा नव्या कल्पना असतील तर जरूर मांडाव्यात त्याचे नेहमीच फौडेशन स्वागत करेल.
धन्यवाद!! पुन्हा भेटू!!

आपला नम्र,

प्रा. सुनिल शिंत्रे
(संयोजक, पाणी परिषद)

15/07/2016

एकच मिनिट द्या व वाचा हि पोस्ट आणि पटलं तर शेअर करा. दुसर्यांना पण कळू द्या हि सत्य परिस्थिती.
बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन
झाल..
म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..
एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान
टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली..
त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..
अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..
घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..
बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही
येत नव्हते..
आपली ओढणी संभाळत..
"भैया जल्दी दो"..
या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती..
घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..
तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन
तेथे थांबला..
आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन
एक ती पुर्ण भेदरुन गेली..
तेवढ्यात तो युवक बोलला..
" आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन
पाणी पुरी खातीयेस काय?"
संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले
चालते झाले..
आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास
घेतला..
न राहुन तिने त्या युवकाला विचारल..
"माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे"
तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तर
कुणाची तरी बहिणच ना"?
आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन
निघुन गेला..
त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या
मुलिची मान आभिमानाने उंचावली...
माझ्या भारताला अशा युवकांची गरज आहे..
उद्याचा भक्कम भारत घडविण्यासाठी..
# Plz_Respect_women

केदारी रेडेकर फौंडेशन,गडहिंग्लज आयोजित महिला दिन निमित्त आजरा तालुक्यातील राजकीय,सामजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम...
09/03/2016

केदारी रेडेकर फौंडेशन,गडहिंग्लज आयोजित महिला दिन निमित्त आजरा तालुक्यातील राजकीय,सामजिक,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.यावेळी केदारी रेडेकर संस्था संस्था समूह च्या अध्यक्षा मा. अंजनाताई रेडेकर ,तहसीलदार शिल्पाताई ठोकडे ,संचालिका मा.सौ श्रद्धा सुनील शिंत्रे,डॉ.अरुना सावंत व महिला सरपंच,सर्व क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महापराक्रमी राजा,ज्याच्या मृत्यूलाही जगाच्या इतिहासात तोड न...
16/01/2016

स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात महापराक्रमी राजा,
ज्याच्या मृत्यूलाही जगाच्या इतिहासात तोड नाही.
ज्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे सांभाळली आणि पुढील 9 वर्षात हिंदुस्तानातील सर्व बलाढ्य सुलतानांना धूळ चारली.
अशा "छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले" यांना त्यांच्या 335 व्या राजाभिषेक दिनानिमित्त समस्त शिवशक्ती प्रतिष्ठान परिवारातर्फे विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा….
"देश धरम पर मिटणेवाला शेर शिवा का छावा था,
महापराक्रमी परमप्रतापी एक हि "शंभूराजा" था"

होळीच्या पवित्र अग्नीमध्येनिराशा , दारिद्र, आळस यांचे दहन होवो.वसर्वांच्या आयष्यात आनंद , सुख , आरोग्य वशांती नांदो !!!!...
05/03/2015

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये
निराशा , दारिद्र, आळस यांचे दहन होवो.

सर्वांच्या आयष्यात आनंद , सुख , आरोग्य व
शांती नांदो !!!!!!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

केंद्र सरकारने शेतकऱयाच्या मुळावर उठणारा भूमी अधिग्रहण कायदा संसदेत आणल्याबद्दल आज शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करून य...
02/03/2015

केंद्र सरकारने शेतकऱयाच्या मुळावर उठणारा भूमी अधिग्रहण कायदा संसदेत आणल्याबद्दल आज शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करून या विधेयकाची येथील दसरा चौकात होळी करण्यात आली.

शेतकऱयांच्या हक्कावर बाधा आणणारे अन्यायी भूमी अधिग्रहण विधेयक केंद्र सरकारने त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी शिवसेना व शेतकऱयांच्या वतीने यावेळी करण्यात आली. शिवसेना देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱयांना वाऱयावर सोडणार नाही. केंद्र सरकारने शेतकऱयांच्या जीवनाशी खेळ करू नये. मोजक्या उद्योजक व भांडवलदार यांचे समर्थन केंद्र सरकार करत असेल तर शिवसेनेचा त्यास तीव्र विरोध आहे. या भूमी अधिग्रहण विधेयकाच्या विरोधात शेतकऱयांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील व हे विधेयक जनआंदोलनाच्या दबावाने केंद्र सरकारला मागे घेण्यास भाग पाडू, असे मत संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी व्यक्त केले. यानंतर येथील दसरा चौकात संपर्कप्रमुख दूधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे व शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी या विधेयकाची होळी केली. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी संभाजी पाटील, प्रविण सावंत, प्रा. सुनिल शिंत्रे, दिलीप माने, प्रकाश पाटील, प्रभाकर खांडेकर, अशोक पाटील, डॉ. संजय पाटील, महादेव गावडे, सौ. सुषमा चव्हाण, सौ. रंजना आंबीकर, सौ. शांता जाधव, विद्या गिरी, रोहिणी भंडारे, सौ. शारदा घोरपडे, सौ. शोभा पाटणकर, सौ. मेरी डिसोझा, सागर कुराडे, संजय पाटील, वसंत नाईक, भरत जाधव, राजेंद्र पोवार, बबन पाटील उपस्थित होते.

मराठी बंधु-मित्र आणि भगिनींना मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक-हार्दिक मराठीमय शुभेच्छा !!!!! जय महाराष्ट्र !!!
27/02/2015

मराठी बंधु-मित्र आणि भगिनींना
मराठी राज्यभाषा दिनाच्या
हार्दिक-हार्दिक मराठीमय
शुभेच्छा !!!!! जय महाराष्ट्र !!!

''तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळा...
23/02/2015

''तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.

best of luck....
21/02/2015

best of luck....

Address

Gadhinglaj
416502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kedari Redekar foundation,Gadhinglaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share