Niswarth Seva - निस्वार्थ सेवा

Niswarth Seva - निस्वार्थ सेवा गडहिंग्लज - आजरा - चंदगड - भुदरगड परिसरातील सुजाण नागरिकांनी हा ग्रुप जॉईन करावा..

परवा मुगळी येथे भिंत कोसळून झालेल्या अपघातात, नांगणुर गावाच्या कांबळे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला... घरातील कर्...
05/06/2021

परवा मुगळी येथे भिंत कोसळून झालेल्या अपघातात, नांगणुर गावाच्या कांबळे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला... घरातील कर्त्या लोकांच्या अचानक जाण्याने पोरक्या झालेल्या 8 अज्ञान मुलं - मुली व 2 वृध्द लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना काल उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. गणेश इंगळे साहेबांनी भेट दिली, सर्वांचे सांत्वन करून त्या कुटुंबाला आधार देत मुलांच्या शिक्षणात कठल्याही प्रकारची अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले... तसेच बसाप्पा कांबळे यांच्या कुटुंबाला 1 महिना पुरेल इतके राशन देत, काही मदत लागल्यास संपर्क करण्याची विनंती केली... या प्रसंगी 🛡️"निस्वार्थ सेवा" 🛡️ मोहिमेचे अमोल देसाई (अभिनेता), जय शहा (उद्योजक) यांच्यासह स्थानिक सरपंच, उपसरपंच पोलिस पाटील ई. उपस्थित होते...

गडहिंग्लज - आजरा - चंदगड व भुदरगड भागातील सर्व गावांमध्ये मदतीसाठी लगेच संपर्क करा...
📲 संपर्क : "निस्वार्थ सेवा"
👉🏻 8007436555 ( सारथी फाउंडेशन )
👉🏻 8446212166 ( जय शहा )
👉🏻 9890161532 ( अमोल देसाई )

30/05/2021

*स्वत:हून व्हिटॅमिनच्या गोळ्या खात आहात का? मग बातमी आपण वाचलीच पाहिजे!*

संकलन... साहेबराव माने.
9028261973

प्रतिकारशक्ती कमी होऊन आपल्याला कोरोना होईल या भीतीमुळे कित्येक लोक स्वत:हून व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊ लागले आहेत. परंतु ते अत्यंत धोेकादायक आहे. अशा गोळ्यांचे ओव्हरडोस घेण्याने किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतात, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. नैसर्गिक आहारातून मिळणारी जीवनसत्त्वेच घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

कोरोनामुळे अनेकांची प्रतिकारशक्ती कमी होते. असे लोक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे तसेच जीवनसत्त्वे असणार्‍या गोळ्या घेतात; पण ज्यांना कोरोना झाला नाही, असे लोकही प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना होईल या भीतीने स्वत:हून औषधाच्या दुकानात जाऊन अ, ब, क, ड, ई आदी प्रकारची जीवनसत्त्वे असणार्‍या गोळ्या घेतात. मात्र हे जर डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेतले तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात.

व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी
व्हिटॅमिन डीच्या ओव्हरडोसमुळे हायपर कॅल्सेमिया होतो. रक्तात कॅल्शियमचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. भूक न लागणे, मानसिक तणाव, डोकेदुखी, थकवा, वारंवार तहान लागणे, बद्धकोष्ठता ही लक्षणे त्यांच्यात दिसतात. किडनीवरही परिणाम होतो. हाडांच्या तक्रारी उद्भवतात. याला व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी म्हणतात.

‘व्हिटॅमिन डी’चे स्रोत
अंडी, दही, ताक, ज्यूस, चीज, मासे यातून आपल्याला व्हिटॅमिन डी जीवनसत्त्व मिळते. त्यामुळे आपला मूळचा नैसर्गिक आहार चांगला असेल तर या गोळ्या घेणे कटाक्षाने टाळावे.

‘व्हिटॅमिन बी’चे स्रोत
मटण, अंडी, दूध, चिकन, दही, डाळी, कडधान्य, सूर्यफूल तेल आदी.

‘व्हिटॅमिन बी’चे दुष्परिणाम
अंगावर पुरळ येणे, अपचन, उलटी, सौम्य जुलाब होणे, पायाला मुंग्या येणे, उच्च रक्तदाब, सतत मूड बदलणे.

‘व्हिटॅमिन ई’चे स्रोत
गहू, सूर्यफूल सोयाबीन तेल, बदाम, शेंगदाणे, बिट, भोपळा, हिरव्या भाज्या.

‘व्हिटॅमिन ई’चे दुष्परिणाम
रक्त पातळ होणे, मेंदूत रक्तस्राव, डोकेदुखी, उलटी, मळमळ, थकवा आदी लक्षणे दिसतात.

‘व्हिटॅमिन ए’चे स्रोत
मासे व माशाचे तेल, दूध, अंडी, फळे, पालेभाज्या, गाजर, रताळे, टोमॅटो, डाळी यातून व्हिटॅमिन ए मिळते.

‘व्हिटॅमिन ए’चे दुष्परिणाम
व्हिटॅमिन एची मात्रा जास्त झाली तर द़ृष्टीमध्ये बदल होणे, हाडे दुखणे, यकृताला इजा होणे, मेंदूवरील ताण वाढणे ही लक्षणे दिसतात. रक्त तपासणी केल्यावरच त्याचे प्रमाण कळते.

‘व्हिटॅमिन सी’चे दुष्परिणाम
पाण्यात विद्राव्य आहे. ते शरीरात साचून राहत नाही. ते लगेच बाहेर पडते. व्हिटॅमिन सी वरून घेतले तरीही पचनक्रिया बिघडणे, मुतखडा, हगवण, मळमळ अशी लक्षणे दिसू शकतात.

‘व्हिटॅमिन सी’चे स्रोत
लिंबूवर्गीय फळे, संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, अननस, आंबा, पपई, स्ट्रॉबेरी, पेरू यातून व्हिटॅमिन सी मिळते. याचा आहारात वापर करावा..

शक्य असेल तर बघा...
29/05/2021

शक्य असेल तर बघा...

ज्यांना सामाजिक भान आहे, सामाजिक जाणिवेतून राष्ट्रीय आपत्ती मध्ये इतरांना मदत करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांनी नक्की ...
28/05/2021

ज्यांना सामाजिक भान आहे, सामाजिक जाणिवेतून राष्ट्रीय आपत्ती मध्ये इतरांना मदत करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांनी नक्की वाचा व शेअर करा...😊🙏🏻
सध्या एखादी व्यक्ती Positive आली... की काही गावांमध्ये त्या व्यक्तीला व कुटुंबाला, चुकीची वागणूक मिळताना दिसत आहे...
ज्यावेळी फक्त "भावनिक आधाराचीच" गरज असते, तेव्हाच सगळे पाठ फिरवत आहेत...😔
मान्य आहे या काळात सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे... पण आपल्या चुकीच्या वागण्यामुळे भावनिक अंतर वाढत आहे त्याचं काय..??🥺
सध्या पेशंटला बरं करण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो 😊 "भावनिक आधाराचा" 😊... आणि तो आधार देण्यासाठी आम्ही " #निस्वार्थ_सेवा " मोहेमे अंतर्गत काही स्वयंसेवक 📲 "टेली कॅलर्स" 📲 (शक्यतो मुली - Female voice) नेमणार आहोत.. ज्यांना रोज 10 ते 15 Positive पेशंटना कॉल करून त्यांच्या तबेतीची विचारपूस करावी लागेल... यासाठी रोज तुमचा अर्धा तास द्यावा लागेल... काय बोलायचं कसं बोलायचं याचं ट्रेनिंग गडहिंग्लज विभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर मॅडम व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब देतील (Zoom Meeting द्वारे)..
त्यामुळे... आपले आपुलकीचे 4 शब्द एखाद्याचं मनोबल वाढवून, त्याचा जीव वाचवू शकतात आसं ज्यांना वाटतं, त्या महिलांनी पुढील नंबरवर संपर्क करावा... तुम्ही जर कलाकार असाल तर Most Welcome, आणि संवाद कौशल्य चांगलं असल्यास, पुरुषांनीही सहभाग घ्यायला हरकत नाही..😊🙏🏻
📲 सपर्क : 9890161532 अमोल देसाई ( अभिनेता )
FUSION Media Company & Drama School.

गडहिंग्लज - आजरा - चंदगड व भुदरगड भागातील कुठल्याही मदतीसाठी संपर्क करा...
📲 संपर्क : "निस्वार्थ सेवा"
👉🏻 8007436555 (सारथी फाउंडेशन)
👉🏻 8446212166 (जय शहा)
Join Us @ - https://www.facebook.com/GadhinglajDYSP/

23/05/2021

तारीख हज़ार साल में बस इतनी सी बदली है,
तब दौर पत्थर का था, अब लोग पत्थर के हैं... 🥺😔

#निस्वार्थ_सेवा

हे करून बघा....
21/05/2021

हे करून बघा....

Essential contact numbers 😊👍🏻😊
19/05/2021

Essential contact numbers 😊👍🏻😊

मदतीसाठी लगेच संपर्क करा...📲 संपर्क : 🛡️ "निस्वार्थ सेवा" 🛡️👉🏻 8007436555 ( सारथी फाउंडेशन )👉🏻 8446212166 ( जय शहा )👉🏻 9...
18/05/2021

मदतीसाठी लगेच संपर्क करा...
📲 संपर्क : 🛡️ "निस्वार्थ सेवा" 🛡️
👉🏻 8007436555 ( सारथी फाउंडेशन )
👉🏻 8446212166 ( जय शहा )
👉🏻 9890161532 ( अमोल देसाई )

आपल्या भागातील कुणी कोल्हापुरात admit असेल तर त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा...
16/05/2021

आपल्या भागातील कुणी कोल्हापुरात admit असेल तर त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा...

📲 मदतीसाठी संपर्क : "निस्वार्थ सेवा"👉🏻 8007436555 (सारथी फाउंडेशन)👉🏻 8446212166 (जय शहा)👉🏻 9890161532 (अमोल देसाई)गडहिंग...
16/05/2021

📲 मदतीसाठी संपर्क : "निस्वार्थ सेवा"
👉🏻 8007436555 (सारथी फाउंडेशन)
👉🏻 8446212166 (जय शहा)
👉🏻 9890161532 (अमोल देसाई)

गडहिंग्लज - आजरा - चंदगड व भुदरगड भागातील सगळ्यांपर्यंत हे नंबर्स पोहोचवा या मोहिमेत सहभागी व्हा... 🙏🏻

गडहिंग्लज - आजरा - चंदगड व भुदरगड भागातील प्रत्येकासाठी... वाचा विचार करा व जो या Page ला Add होईल त्याने कमीत कमी 100 ल...
15/05/2021

गडहिंग्लज - आजरा - चंदगड व भुदरगड भागातील प्रत्येकासाठी... वाचा विचार करा व जो या Page ला Add होईल त्याने कमीत कमी 100 लोकांना add करा...🙏🏻
मित्रहो... गेल्या वर्षभरापासून आपण सर्व कोरोना महामारीशी लढतो आहोत. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.. दिनांक 16 मे पासून पुन्हा एकदा कडकडीत लोक डाऊन सुरू झाला आहे. या दहा दिवसात जर आपण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखला नाही, तर नंतरचा काळ आपल्या सर्वांसाठी खूप वेदनादायी असेल...🥺
आता वेळ आलेली आहे सर्वांनी एक होऊन डोक्याने लढा देण्याची, एकमेकांना मदतीचा हात देण्याची, "निस्वार्थपणे सेवा* करण्याची... आणि म्हणूनच आपल्या भागाचे "उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब" यांच्या संकल्पनेतून व "सारथी फाउंडेशन" यांच्या सहकार्याने, जय शहा (उद्योजक), अमोल देसाई (अभिनेता) यांच्या मदतीने... "पोलीस खात्यामार्फत" आम्ही गडहिंग्लज - आजरा - चंदगड व भुदरगड भागातील सर्व गावांमध्ये "निस्वार्थ सेवा" नावाची मोहीम सुरू करत आहोत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अंध, अपंग, असहाय्य व्यक्तींना तसेच ग्रामीण भागातील वृद्ध लोकांना, ज्यांची मुलं लष्कर सेवेत आहेत, बाहेर गावी कामाला आहेत अशा लोकांची खूप गैरसोय होताना दिसत आहे.. त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी, त्यांच्यावरील उपचाराला हात भार लावण्यासाठी, त्यांना आवश्यक सेवा पुरवण्यासाठी... आम्ही प्रत्येक गावांमध्ये काही स्वयंसेवक नेमले आहेत... ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी पुढील नंबर वर संपर्क करा व "आपलं नाव, गाव, आणि पत्ता पाठवा" तुमच्या भागातून जर आम्हाला मदतीसाठी कुणी संपर्क केला तर आम्ही तुमच्या करावी त्यांना मदत पोहोचवू... पुढील फोन नंबर्स तुमच्या मोबाईल मध्ये save करा व, "Niswarth Seva - निस्वार्थ सेवा" हे "page Join" करा व भागातील सगळ्यांना तशी विनंती करा... तुमच्या भागातल्या ज्या काही अडचणी असतील तर तिथे टाका... आमची टीम तेथे मदत पोहोचवेल... लक्ष्यात ठेवा, सगळे एक झालो तरच या कोरोनाच्या संकटातून वाचू शकतो...

📲 संपर्क : "निस्वार्थ सेवा"
👉🏻 8007436555 (सारथी फाउंडेशन)
👉🏻 8446212166 (जय शहा)
👉🏻 9890161532 (अमोल देसाई)

हा संदेश गडहिंग्लज - आजरा - चंदगड व भुदरगड भागातील सगळ्यांपर्यंत पोहोचवा वा या मोहिमेत सहभागी व्हा... 🙏🏻

Address

Gadhinglaj
416502

Telephone

+18007436555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niswarth Seva - निस्वार्थ सेवा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Niswarth Seva - निस्वार्थ सेवा:

Share

Category