जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली

  • Home
  • India
  • Gadchiroli
  • जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली

जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली Official Page of District Information Office GADCHIROLI, DGIPR Dept., Govt of Maharashtra.

03/06/2026

जागतिक सायकल दिन...!

सायकल चालवा, आरोग्य मिळवा!
पर्यावरण वाचवा!
खर्च कमी करा!

चला, निरोगी जीवनशैली आणि स्वच्छ पर्यावरणासाठी सायकलचा अधिकाधिक वापर करूया.

#जागतिकसायकलदिन

03/06/2026

🏆📢 **जिल्हास्तरीय युवा पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव आमंत्रित**

⏳ **प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 12 जून**

📍 **गडचिरोली, दि. 3 :** महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण 2012 अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन 2025-26 साठी पात्र युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी यापूर्वी 1 जून 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अपेक्षित संख्येने प्रस्ताव प्राप्त न झाल्याने प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत आता 12 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

🌱 जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांनी समाजहित, राष्ट्रनिर्माण, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, क्रीडा, सांस्कृतिक विकास, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येते.

📝 पुरस्कारासाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रे, कार्याची पुरावे, पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणारे दस्तऐवज, पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र तसेच शासन निर्णयानुसार आवश्यक हमीपत्रांसह आपले प्रस्ताव दोन प्रतींमध्ये बंद लिफाफ्यात 12 जून 2026 पर्यंत सादर करावेत.

🎯 युवक व युवतींसाठी अर्जदाराचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी किमान 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी कमाल 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे संबंधित जिल्ह्यात सलग पाच वर्षे वास्तव्य असावे. तसेच अर्जदाराने स्वयंस्फूर्तीने सामाजिक कार्य केलेले असावे आणि पुरस्कार प्राप्तीनंतर किमान दोन वर्षे सक्रिय राहण्याचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

🏢 संस्थांसाठी सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणी असणे बंधनकारक असून संस्था किमान पाच वर्षे कार्यरत असावी.

📊 पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2025 या तीन वर्षांच्या कालावधीत केलेल्या कार्याचा विचार करण्यात येणार आहे.

📢 अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील युवक, युवती आणि युवा विकासासाठी कार्यरत संस्थांनी या पुरस्कारासाठी मोठ्या संख्येने प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. भास्कर घटाळे यांनी केले आहे.

#गडचिरोली 🌟

03/06/2026
03/06/2026

मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी संपर्क साधावा,असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था,भोजन, मासिक निर्वाह भत्ता १५०० रुपये, स्टेशनरी रक्कम, ग्रंथालय सुविधा, दैनंदिनी वर्तमानपत्र इत्यादी मोफत सोयी-सुविधा दिल्या जातात. या शैक्षणिक वर्षाचे प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असून, वसतिगृह प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे. तरी विदयार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर आपला अर्ज करावा.

या वसतिगृहात ११ वी व आय. टी. आय. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी ५५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. विद्यार्थीनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. या वसतिगृहाचा पत्ता गृहपाल मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डी-१० पार्श्वनाथ कॉ. हौसिंग सोसायटी, सर्वोदय नगर मुलुंड, मुंबई-४०००८० असा आहे.

03/06/2026

‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन’ प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू…

याबाबतचे सविस्तर वृत्त पाहण्यासाठी महासंवादच्या पुढील लिंकला भेट द्या - https://mahasamvad.in/202801/

#प्रशिक्षण
#प्रवेशप्रक्रिया

03/06/2026

‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत पर्यटन’ उपक्रमांतर्गत #पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक तसेच इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यासंदर्भातील अधिक माहितीसाठी ९११२२२८७७३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल.
#अमृत

03/06/2026

🌾📢 **कडधान्य काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचे आवाहन**

💰 **पॅकिंग युनिट्स स्थापनेसाठी ३३ टक्के अनुदान; १५ जूनपर्यंत अर्ज सादर करा**

📍 **गडचिरोली, दि. ०३ :** सन २०२६-२७ कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य पिकांचा मूल्यवर्धनासाठी काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया व पॅकिंग युनिट्स घटकासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेतून शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, प्राथमिक कृषी पतसंस्था, वैयक्तिक अर्जदार आदींना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

🌱 कडधान्य पिकांचे स्थानिक पातळीवर प्रक्रिया, पॅकिंग व साठवणूक होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. पात्र घटकांना प्रकल्प खर्चाच्या ३३ टक्के किंवा रुपये १५ लाख, यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय राहील.

📝 सदर योजनेसाठी अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात १५ जून २०२६ पर्यंत सादर करावेत. प्राप्त अर्जांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांची निवड शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आहे.

📂 अर्जासोबत बँक कर्ज मंजुरी प्रस्ताव, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, मागील दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल, बँक पासबुक, आधार कार्ड, तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. वैयक्तिक अर्जदारांनी ७/१२, ८-अ उतारा आणि हमीपत्र सादर करणे आवश्यक राहील.

👩‍🌾 महिला अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार असून, अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.

#गडचिरोली Maharashtra DGIPR

Address

District Information Office
Gadchiroli
442605

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली:

Share