आदर्श आपले सरकार सेवा केंद्र डोणगाव

  • Home
  • India
  • Dongaon
  • आदर्श आपले सरकार सेवा केंद्र डोणगाव

आदर्श आपले सरकार सेवा केंद्र डोणगाव महा ई सेवा केंद्र तथा आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, डोणगाव

02/06/2026
एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त डोणगाव येथे अधिकृत NCMC स्मार्ट कार्ड केंद्राचे उद्घाटनडोणगाव : महाराष्ट्र...
02/06/2026

एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त डोणगाव येथे अधिकृत NCMC स्मार्ट कार्ड केंद्राचे उद्घाटन

डोणगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, डोणगाव येथे एसटी महामंडळाच्या अधिकृत NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या उपक्रमामुळे डोणगाव व परिसरातील नागरिकांना स्मार्ट कार्डसंदर्भातील सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

या केंद्राचे उद्घाटन डोणगाव बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक श्री. भोसले साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. पंचायत समिती सभापती श्री. निंबाजी पांडव हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी एसटी महामंडळाच्या प्रवासी सुविधांमध्ये होत असलेल्या आधुनिकीकरणाचे कौतुक करत NCMC स्मार्ट कार्ड ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला ॲड. सदार, श्री. दीपक गायकवाड, जेष्ठ नागरिक श्री. नागोजी आखरे, श्री. गजानन आखाडे, श्री. धनंजय वाघ, श्री. गजानन बोंद्रे, श्री. रामेश्वर पाटील यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी नागरिकांना NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली. या कार्डामुळे प्रवाशांना रोख रकमेचा वापर कमी करून डिजिटल पद्धतीने प्रवास भाडे भरणे शक्य होणार आहे. तसेच भविष्यात विविध सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये एकाच कार्डचा वापर करता येणार असल्याने नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

यावेळी आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, डोणगावचे संचालक अमोल ठाकरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी आपले केंद्र सातत्याने कार्यरत आहे. एसटी महामंडळाच्या अधिकृत NCMC स्मार्ट कार्ड केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना कार्ड काढणे, नूतनीकरण करणे तसेच संबंधित सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामीण भागात अशा प्रकारच्या आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनी सुरू झालेल्या या नवीन सुविधेमुळे डोणगाव व परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून डिजिटल व्यवहारांना चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

डोणगावमध्ये सुरू झालेले हे अधिकृत NCMC स्मार्ट कार्ड केंद्र नागरिकांसाठी आधुनिक, सुलभ आणि डिजिटल सेवांचे नवे दालन ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

१ जून २०२६ रोजी एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन आहे. त्याचे औचित्य साधत आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, डोणगाव येथे ST म...
30/05/2026

१ जून २०२६ रोजी एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन आहे. त्याचे औचित्य साधत आदर्श आपले सरकार सेवा केंद्र, डोणगाव येथे ST महामंडळाचे अधिकृत स्मार्ट कार्ड वितरण केंद्र सुरू होत आहे. तरी परिसरातील सर्व सन्माननीय ग्राहकांना विनंती आहे की, गल्लो गल्ली फिरून स्मार्ट कार्ड काढून देणाऱ्या एजंट च्या भूल थापांना बळी न पडता याचा विचार करा की, त्याच्या कडून काढलेल्या कार्ड ला उद्या काही अडचण आल्यास त्यांना आपण कुठे शोधणार, म्हणूनच अधिकृत केंद्रावरच आपले स्मार्ट कार्ड काढा आणि ST महामंडळाच्या सेवेचा फायदा घ्या.
संपर्क अमोल ठाकरे:- 098817 46233
गोपाल मेटांगळे:- 9322787178

11/04/2026

Address

Bajad Complex, Opp. Balanand Computer Institute
Dongaon
443303

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 4pm
Sunday 12pm - 4pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आदर्श आपले सरकार सेवा केंद्र डोणगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share