Sagaon , Dombivli

Sagaon , Dombivli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sagaon , Dombivli, Manpadaroad, Dombivli (East), Dombivli.

लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणणारे थोर समाजसुधारक, साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विन...
01/08/2024

लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणणारे थोर समाजसुधारक, साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन... 💐🙏

#लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे #लोकशाहीर_अण्णाभाऊ_साठे #जयंती #विनम्र #अभिवादन

01/08/2024
मराठी उद्योग जगताचे शिलेदार, महाराष्ट्राचे हेन्रीफोर्ड, प्रसिद्ध किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्क...
26/09/2023

मराठी उद्योग जगताचे शिलेदार, महाराष्ट्राचे हेन्रीफोर्ड, प्रसिद्ध किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन... 💐🙏
शेतकऱ्यांचे जगणे सुखकर व्हावे हा लक्ष्मणरावांचा ध्यास होता. त्यातूनच त्यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाची स्थापना केली. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते.

#लक्ष्मणराव_किर्लोस्कर #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन

महान समाजसुधारक, बंगाली व संस्कृत विद्वान ईश्वर चंद्र विद्यासागर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏 #ईश्वर_चंद्र_व...
26/09/2023

महान समाजसुधारक, बंगाली व संस्कृत विद्वान ईश्वर चंद्र विद्यासागर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏

#ईश्वर_चंद्र_विद्यासागर #ईश्वरचंद्र_विद्यासागर #जयंती #विनम्र #अभिवादन

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏  #राष्ट्रीय_सेवा_योजना_स्थापना_दिवस  #हार्दिक ...
24/09/2023

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏

#राष्ट्रीय_सेवा_योजना_स्थापना_दिवस #हार्दिक #शुभेच्छा

विदेशात सर्वप्रथम भारतीय ध्वज फडकावून इतिहास घडविणारी क्रांतिकारक महिला मॅडम भिकाजी कामा यांना जयंती निमित्त विनम्र अभिव...
24/09/2023

विदेशात सर्वप्रथम भारतीय ध्वज फडकावून इतिहास घडविणारी क्रांतिकारक महिला मॅडम भिकाजी कामा यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏

#मॅडम_भिकाजी_कामा #मॅडम_कामा #भिकाजी_कामा #जयंती #विनम्र #अभिवादन

व्यक्ती, संघटना आणि वेगवेगळ्या देशांनी शांततेच्या दृष्टीनं योग्य पावलं उचलून जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूनं स...
21/09/2023

व्यक्ती, संघटना आणि वेगवेगळ्या देशांनी शांततेच्या दृष्टीनं योग्य पावलं उचलून जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूनं संयुक्त राष्ट्रसंघानं २१ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून घोषित केला आहे.
समृद्ध मानवी जीवनासाठी शांतता गरजेची आहे. शांततेच्या माध्यमातूनच मानवी संस्कृती विकास साधू शकते.
भारताने जगात नेहमीच शांततेत सहजीवनाला चालना दिली आहे. शांतता आणि सौहार्द ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
आंतरराष्ट्रीय शांतता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏

#आंतरराष्ट्रीय_शांतता_दिन #जागतिक_शांतता_दिन #हार्दिक #शुभेच्छा

प्रेम टिकवून ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे चहा☕...☕"चहा" ची "चाह" असणाऱ्या सर्वांना राष्ट्रीय चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छ...
21/09/2023

प्रेम टिकवून ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे चहा☕...
☕"चहा" ची "चाह" असणाऱ्या सर्वांना राष्ट्रीय चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... ☕🌹🙏

#राष्ट्रीय_चहा_दिवस #चहा_दिवस #चहा #हार्दिक #शुभेच्छा

भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या व होमरुल चळवळीच्या संस्थापक डाॅ. अ‍ॅनी बेझंट यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन... ...
20/09/2023

भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या व होमरुल चळवळीच्या संस्थापक डाॅ. अ‍ॅनी बेझंट यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन... 💐🙏
जन्माने ब्रिटिश असूनही भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारतीय समाजाच्या उत्थानासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी समरस होऊन लढा दिला. होमरूल लीगच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारत पिंजून काढला व लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांच्या वेक अप इंडिया या भाषणातून त्यांनी भारताच्या भविष्याचे रेखाचित्र रेखाटले होते.

#अॅनी_बेझंट #पुण्यतिथी #स्मृतिदिन #विनम्र #अभिवादन

ओझोन वायूचा थर पर्यावरणाच्या दृष्टीने आणि त्याचप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्यास अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक आहे. हा थर ...
16/09/2023

ओझोन वायूचा थर पर्यावरणाच्या दृष्टीने आणि त्याचप्रमाणे निसर्गाचा समतोल राखण्यास अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक आहे. हा थर पृथ्वीच्या वातावरणात पसरलेला असून सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. या ओझोनची रक्षा करणे हि आपली जबाबदारी असून त्या माध्यमातून आपण येणाऱ्या पिढीला एक सुरक्षित पृथ्वी हस्तांतरित करू शकू.
ओझोन हा जीवनावश्यक वायू आहे, झाडांची संख्या वाढली तरच ओझोनचा थर वाढू शकतो.
चला प्रत्येकाने किमान एक झाड लावून ओझोन वायूचे संरक्षण करूया... 🌳🙏

#जागतिक_ओझोन_दिन #जागतिक_ओझोन_दिवस #ओझोन_दिन

१५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून जगभर ओळखला जातो. नागरिकांना त्यांच्या लोकशाही हक्क व अधिकार यांची ज...
15/09/2023

१५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून जगभर ओळखला जातो. नागरिकांना त्यांच्या लोकशाही हक्क व अधिकार यांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने, आजचा हा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो.
लोकशाही म्हणजे जनतेला मिळालेली अशी ताकद आहे, ज्याने विकास आणि परिवर्तन नक्कीच घडू शकते. मात्र आपल्या हक्कांबाबत जागृत असताना कर्तव्याचीही जाणीव ठेवलेली लोकशाही अधिक समृद्ध ठरते.
लोकशाही व्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोकशाही मूल्ये जपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏

#आंतरराष्ट्रीय_लोकशाही_दिन #लोकशाही_दिन #हार्दिक #शुभेच्छा

दुष्काळ असो वा पूर... आपला शेतकरी बांधव त्याच्या सर्जा - राजासाठी जीव ओवाळून टाकत असतो. काळ्या मातीची सेवा करताना आपल्या...
14/09/2023

दुष्काळ असो वा पूर... आपला शेतकरी बांधव त्याच्या सर्जा - राजासाठी जीव ओवाळून टाकत असतो. काळ्या मातीची सेवा करताना आपल्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या या सवंगड्यालाही मायेने जपत असतो.
आज बैलपोळा... कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव ! शेतकरी राजाला नेहमी साथ देणाऱ्या बैलाचे आज पूजन केले जाते. ग्रामीण भागात मोठ्या थाटात हा दिवस उत्सव म्हणून साजरा केला जातो...
बैलपोळा या आपल्या पारंपारिक सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा... 🌹🙏

#बैलपोळा #पोळा #हार्दिक #शुभेच्छा

Address

Manpadaroad, Dombivli (East)
Dombivli
421204

Telephone

9821473253

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sagaon , Dombivli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share