खोणी म्हाडा कॉलनी - Khoni Mhada

कल्याण तालुक्यातील  #खोणी येथे बुधवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी  #मुख्यमंत्री_समृद्ध_पंचायतराज_अभियान याचा शुभारंभ राज्या...
20/09/2025

कल्याण तालुक्यातील #खोणी येथे बुधवार, दिनांक १७ सप्टेंबर रोजी #मुख्यमंत्री_समृद्ध_पंचायतराज_अभियान याचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते आणि संसदरत्न खासदार Dr Shrikant Eknath Shinde साहेबांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला. या अभियानात उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते विविध #शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना #लाभ वितरित करण्यात आले.
यावेळी स्थानिक आमदार Rajesh Govardhan More, खासदार Naresh Mhaske, आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह ठाण्याचे #जिल्हाधिकारी डॉ. #श्रीकृष्ण_पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे #मुख्य_कार्यकारी_अधिकारी श्री #रोहन_घुगे तसेच खोणी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच श्री #हनुमान_ठोंबरे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

 #खोणी गावात  #प्राथमिक_आरोग्य_केंद्र व्हावे यासाठी  #सरपंच  #हनुमान_ठोंबरे_शेठ यांचे उपोषण..!!         समाजसेवक Kunal P...
17/08/2025

#खोणी गावात #प्राथमिक_आरोग्य_केंद्र व्हावे यासाठी #सरपंच #हनुमान_ठोंबरे_शेठ यांचे उपोषण..!!
समाजसेवक Kunal Patil आणि Anan Fulore यांच्या नेतृत्वाखाली #खोणी_म्हाडा_रहिवासी_संघटना यांनी #सरपंच Hanuman Thombre साहेबांना आणि #खोणी_ग्रामस्थांना उपोषण स्थळी भेट देऊन #म्हाडा_कॉलनीचा पाठिंबा जाहीर केला.
#आमदार Rajesh Govardhan More साहेब आणि #तालुकाप्रमुख Mahesh patil-नगरसेवक महेश बा पाटील भाई यांच्या उपस्थितीत #तहसीलदार #सचिनजी_शेलार यांनी #आरोग्यकेंद्र साठी शासनाकडून म्हाडा कॉलनीसमोर मुख्य रस्त्यावरील खोणी गावाच्या प्रवेशद्वारशेजारी असलेली शासकीय जागा उपलब्ध करून देत असल्याचे लेखी पत्र दिले.

 #आमदार_अशोक_पाटील यांच्या वतीने मेंटेनन्स वाढवू नये यासाठी शिफारस         खोणी म्हाडा कॉलनीतील मासिक सेवाशुल्क ₹१६४९ सर...
16/08/2025

#आमदार_अशोक_पाटील यांच्या वतीने मेंटेनन्स वाढवू नये यासाठी शिफारस
खोणी म्हाडा कॉलनीतील मासिक सेवाशुल्क ₹१६४९ सर्वांना कायमस्वरूपी लागू करावा यासाठी आमदार श्री #अशोक_धर्मराज_पाटील साहेब यांचे म्हाडा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष श्री #संजीव_जयस्वाल साहेब यांच्या नावे शिफारसपत्र आपले रहिवासी Siddesh Madhuri Manohar Nakti यांच्या पुढाकाराने #खोणी_म्हाडा_रहिवासी_संघटना यांना प्राप्त झाले.
सदर पत्र मिळण्यासाठी समाजसेवक Kunal Patil आणि समाजसेवक Anan Fulore तसेच Sambhaji Mandave, Ajay Dalvi, Ravindra Bhosale यांच्या सहकार्याने मिळाले.

 #खोणी_म्हाडा_कॉलनीतील सर्वच सदनिकाधारकांना पूर्वी घरांचा ताबा घेताना मासिक सेवाशुल्क ₹२६०२/- भरावे लागत होते. सन-२०२३ म...
01/08/2025

#खोणी_म्हाडा_कॉलनीतील सर्वच सदनिकाधारकांना पूर्वी घरांचा ताबा घेताना मासिक सेवाशुल्क ₹२६०२/- भरावे लागत होते. सन-२०२३ मध्ये #खोणी_म्हाडा_रहिवासी_संघटना यांच्या वतीने मासिक सेवाशुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न चालू केले तेव्हा #आमदार Kisan Kathore , #माजी_आमदार Raju Patil - Pramod Ratan Patil आणि #माजी_आमदार Ganpat Gaikwad - गणपत गायकवाड यांनी शिफारसपत्रे दिली होती. या तत्कालीन आमदारांच्या पाठिंब्याने सर्वांना #मेंटेनन्स ₹१६४९/- झाला होता. परंतु आता ऑक्टोबर-२०२५ नंतर सेवाशुल्कात वाढ होणार आहे.
MHADA मधील सर्वच सदनिकांना यापुढेही मेंटेनन्स ₹१६४९ कायम ठेवावे यासाठी Kunal Patil आणि Anan Fulore यांच्या मार्गदर्शनाने Rajesh Thakare, Sambhaji Mandave, Ajay Dalvi आणि Ravindra Bhosale यांनी आमदार श्री किसन कथोरे साहेब निवासस्थान येथे आमदार साहेबांची भेट घेतली. #आर्थिक_दुर्बल घटकांतील घरांसाठी #म्हाडा_कॉलनी मधील नागरिकांना #सेवाशुल्क कमी असावे आणि सर्व #नागरी_सुविधा मिळाव्यात यासाठी शिफारसपत्र मिळाले.

खोणी गावचे भूमिपुत्र श्री  #हनुमंत_ठोंबरे ( #दादा) यांची  #खोणी_ग्रामपंचायत  #सरपंच पदी निवड झाल्याबद्दल म्हाडा कॉलनीच्य...
13/07/2025

खोणी गावचे भूमिपुत्र श्री #हनुमंत_ठोंबरे ( #दादा) यांची #खोणी_ग्रामपंचायत #सरपंच पदी निवड झाल्याबद्दल म्हाडा कॉलनीच्या वतीने #नागरी_सत्कार करण्यात आला.

खोणी म्हाडामधील रहिवासीयांना लोकप्रतिनिधी पाठींबा..!!       आपल्या म्हाडा कॉलनीतील सर्वच सदनिकाधारकांना मासिक सेवाशुल्क ...
08/07/2025

खोणी म्हाडामधील रहिवासीयांना लोकप्रतिनिधी पाठींबा..!!
आपल्या म्हाडा कॉलनीतील सर्वच सदनिकाधारकांना मासिक सेवाशुल्क ₹१६४९ असावे यासाठी आमदार आणि खासदार यांनी पाठींबा दयावा म्हणून समाजसेवक #कुणाल_पाटील आणि #आनंद_फुलोरे यांच्या नेतृत्वाखाली आपली #खोणी_म्हाडा_रहिवासी_संघटना प्रयत्न करत आहे.
म्हाडा कॉलनीत नागरी सुविधा (Amenities) मिळाव्यात आणि ऑक्टोबर २०२५ नंतरही सेवाशुल्क कमीच रहावा यासाठी सन्माननीय आमदार #तुकाराम_काते_साहेब आणि सन्माननीय मा. खासदार #राहुल_शेवाळे_साहेब या दोघांचेही शिफारसपत्रे आपले सहकारी #बिरूदेव_मस्के यांना प्राप्त झाली आहेत. या कामात रहिवासी संघटनेला आपल्या चारही पॉकेट (इमारत क्रं १, २, ३, ४) मधील सर्व कमिटी सदस्यांचे सहकार्य लाभले.

Sanjeev Jaiswal I.A.S MHADA Rahul Shewale - राहुल शेवाळे Tushar Tukaram Kate Birudev Maske Anan Fulore Kunal Patil Tukaram Kate

Address

Dombivli
421204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when खोणी म्हाडा कॉलनी - Khoni Mhada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share