29/12/2025
काल दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी आदर्श शैक्षणिक समूह संचलित आदर्श शिक्षक प्रशिक्षण केंद्र न्यू पनवेल नवी मुंबई यांच्या अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमा च्या उद्घाटन प्रसंगी आदर्श शैक्षणिक समूह चेअरमन तसेच भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्टचे प्रदेश संयोजक सन्माननीय श्री धनराज जी विसपुते यांची मुख्य उपस्थिती लाभली तसेच चिपळूण केंद्राच्या केंद्र संचालिका श्रीमती निशा बांदेकर मॅडम या अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
आदर्श शैक्षणिक समूहाचे प्रेरणास्थान श्री धनराज जी विसपुते तसेच संस्थेच्या सचिव सौ संगीता विसपुते यांच्या माध्यमातून नेहमीच संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते . यामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्यापना व्यतिरिक्त इतर कलागुणांना वाव देण्यासाठी कला महोत्सव, क्रीडा महोत्सव याद्वारे एक अत्यंत सुंदर असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना योग्य पद्धतीने ज्ञानार्जन केले जावे यासाठी आग्रही असणाऱ्या सौ संगीता विसपुते मॅडम या विद्यार्थ्यांच्या क्रीडा महोत्सवासाठीही आग्रही असतात. संस्थेच्या प्राचार्या सौ जाई जगताप यांच्या प्रेरणेतून विद्यार्थिनी अति उत्साहाने या क्रीडा महोत्सवात सहभागी झाल्या. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी, मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन, दिपप्रज्वलन आणि मशाल प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर क्रीडा प्रतिज्ञा घेऊन क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. क्रीडा शिक्षक श्री. शिवाजी डोंगर दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व विद्यार्थिनींनी क्रीडा महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. दूर दुरून निघून भल्या पहाटे आलेल्या विद्यार्थिनींनी प्रसन्न अशा वातावरणात, रम्य सकाळी अतिशय उत्साहात कार्यक्रमातील आपला सहभाग नोंदविला. खोखो, रस्सीखेच, धावणे, गोळा फेक, थाळी फेक, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, रिले रेस, अशा विविध प्रकारच्या खेळाच्या माध्यमातून आजचा हा क्रीडा महोत्सव संपन्न झाला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. ऍड. ऋजुता पाटील, प्रा. मरियम लोखंडवाला, लक्ष्मी भोईर, आतिश गायकवाड, मयूर सोनार या सर्वांचे सहकार्य लाभले.
पारितोषिक वितरण समारंभावेळी विजेत्यांना, सुवर्ण व रोप्य पदक आणि प्रशास्ती पत्रक देऊन या क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली.