धरणगाव नगरपरिषद,ता.धरणगाव जि. जळगाव

  • Home
  • India
  • Dharangaon
  • धरणगाव नगरपरिषद,ता.धरणगाव जि. जळगाव

धरणगाव नगरपरिषद,ता.धरणगाव जि. जळगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from धरणगाव नगरपरिषद,ता.धरणगाव जि. जळगाव, Government Organization, Dharangaon.

22/02/2021

🔴 *धरणगाव नगरपरिषद मार्फत*🔴
🔴🚨🎤 *जाहीर सूचना*🎤🚨🔴

मा.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे आदेशानुसार कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी *दि. २२/०२/२०२१ ते ०६/०३/२०२१* पावेतो *धरणगाव* शहरात पुढील प्रमाणे आदेश लागू करण्यात आलेले आहे.

*१. सर्व प्रकारच्या शाळा, शिकवणी, खाजगी क्लासेस बंद राहतील. (ऑनलाईन शिक्षण वगळून)*
*२.सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, दिंडी ई.कार्यक्रमांना बंदी असेल.*
*३. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे एका वेळेस केवळ १० व्यक्तींच्या उपस्थित पूजा अर्चा करणेसाठी खुली राहतील.*
*४.सर्व व्यायामशाळा, जिम बंद राहतील.*
*५. दि. २५/०२/२०२१ व ०४/०३/२०२१ रोजिचे आठवडेबाजार बंद राहतील.*
*६. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक कार्यमक्रमाना बंदी असेल.*
*७. लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रमांना केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल. तथापि नगरपालिका, तहसील, पोलीस स्टेशन ची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.*

*सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतः ची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे*
😷😷

21/02/2021

🎤🚨🔴🔈 *जाहीर आवाहन* 🎤🚨🔴🔈

*धरणगाव शहरात मा.जिल्हाधिकारी सो यांचे आदेशानुसार नगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन तसेच पोलीस स्टेशन यांचेमार्फत विनामास्क फिरणाऱ्या व्यक्ती, तसेच सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करून गर्दी करणाऱ्या दुकाने, आस्थापना इत्यादी वर ५००/- प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच लग्न समारंभ तसेच इतर गर्दीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या व्यक्ती , मंगल कार्यालय यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजक तसेच मंगल कार्यालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.*
*तरी नागरिकांनी तोंडाला मास्क 😷 लावूनच घराबाहेर पडावे तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे हि विनंती.*

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषद कार्यालय आवारात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हरी...
26/01/2021

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त धरणगाव नगरपरिषद कार्यालय आवारात स्वच्छ सर्वेक्षण २०२१ आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हरीत शपथ घेण्यात आली तसेच घेणाऱ्यांना माझी वसुंधरा मित्र प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. Majhi Vasundhara
#स्वच्छ_सर्वेक्षण_२०२१

*नगरपरिषद धरणगाव आयोजित *“भव्य चित्रकला स्पर्धा"* 🎙️🎙️🎙️🎙️🌳🌳🪴🖼️🏝️🥇🏆🎨🎨🎨☘️🪴महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने ...
22/01/2021

*नगरपरिषद धरणगाव आयोजित *“भव्य चित्रकला स्पर्धा"*
🎙️🎙️🎙️🎙️
🌳🌳🪴🖼️🏝️🥇🏆🎨🎨🎨☘️🪴

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच पर्यावरणाची होणारी हानी थांबवून *पृथ्वी, जल, वायु, अग्नि, आकाश* या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी *“माझी वसुंधरा”* या अभियानाची सुरुवात केलेली आहे.तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चा उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर अभियानाअंतर्गत *धरणगाव नगरपरिषदेतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून सहभागी स्पर्धकांच्या चित्रांचे/पोस्टर्स चे नगरपरिषद कार्यालयामध्ये दि. २७ जानेवारी २०२१ रोजी भव्य प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे तसेच विविध सामजिक माध्यमामध्ये सर्व स्पर्धकांचे चित्र/पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात येईल.*
सदर स्पर्धा शालेय विद्यार्थी व इतरांसाठी खुला गट अशा दोन गटात राबविण्यात येईल.शालेय विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी शाळेत करावी व इतर स्पर्धकांनी आपली नावनोंदणी ९५६१५७५८९४ क्रमांकावर WhatsApp द्वारे करावी.

*नाव नोंदणी करण्याची अंतिम दिनांक: २५/०१/२०२१ संध्या.६.०० वाजेपर्यंत*

*चित्र/पोस्टर्स जमा करण्याची अंतिम मुदत: २६/०१/२०२१ दु. १२.०० वाजेपर्यंत.*

*स्पर्धेचे विषय*
१.माझी वसुंधरा
२. प्लॅस्टिक बंदी
३. हागणदारीमुक्त शहर
४. स्वच्छ शहर, हरीत शहर
५. स्वच्छ सर्वेक्षण २०२१
६.जल संवर्धन

*टीप: सदर स्पर्धेसाठी स्पर्धकांना A-2/A-3 साईजचे कागद नगर परिषदेतर्फे देण्यात येतील. तसेच इतर आवश्यक साहित्य जसे की रंग, ब्रश, रंग पेन्सिल, खडू इ. स्पर्धकांनी स्वतःचे वापरावे.*

*स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येईल तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*
निलेश वाणी : ९६३७४२६३७४
तुषार सोनार : ९५६१५७५८९४

🌳🌳🪴🖼️🏝️🥇🏆🎨🎨🎨☘️🪴
*विनीत*
मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष, मुख्याधिकारी,उपनगराध्यक्ष सर्व सन्मा. नगरसेवक,नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचारी वृंद, नगरपरिषद धरणगाव.

#माझी_वसुंधरा_अभियान #स्वच्छ_सर्वेक्षण_२०२१

दि. ०१ जानेवारी २०२१ रोजी धरणगाव नगरपरिषद व विकल्प ऑर्गनाझेशन धरणगाव यांचे संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान तसेच स्...
02/01/2021

दि. ०१ जानेवारी २०२१ रोजी धरणगाव नगरपरिषद व विकल्प ऑर्गनाझेशन धरणगाव यांचे संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पर्यावरण जनजागृती सायकल रॅली आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये शहरातील ३०० सायकलस्वार सहभागी झालेले होते. रॅली मध्ये नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी जनार्दन पवार, नगराध्यक्ष निलेश चौधरी, स्वच्छतादूत गुलाबराव वाघ, उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, नगरसेवक कैलास माळी सर विकल्प ऑर्गनाझेशन चे अध्यक्ष रवींद्र मराठे, सचिव नरेंद्र पाटील आदी मान्यवरांनी स्वतः सायकल चालवत सहभाग नोंदविला.
#माझी_वसुंधरा #स्वच्छ_सर्वेक्षण_२०२१ Gulabrao Wagh - गुलाबरावजी वाघ

*धरणगाव नगरपरिषद धरणगाव व विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव* यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित *“पर्यावरण जनजागृती सायकल रॅली"* 🌳🌳🌳...
30/12/2020

*धरणगाव नगरपरिषद धरणगाव व विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव* यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित *“पर्यावरण जनजागृती सायकल रॅली"*

🌳🌳🌳🎙️🎙️🎙️🚴‍♂️🚲🚲🚲🚴‍♀️

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच पर्यावरणाचा होणारी हानी थांबवून *पृथ्वी, जल, वायु, अग्नि, आकाश* या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी *“माझी वसुंधरा”* या अभियानाची सुरुवात केलेली आहे. सदर अभियानाअंतर्गत *धरणगाव नगरपरिषद धरणगाव व विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव* यांचे संयुक्त विद्यमाने दि. 01 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7:30 वाजता *“पर्यावरण जनजागृती सायकल रॅली"* आयोजित करण्यात आलेली आहे.
*ठिकाण:- धरणगाव नगरपरिषद कार्यालय, धरणगाव*

१ जानेवारी या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला आपण *No Vehicle Day* चे पालन करावे, ही नम्र विनंती🙏

*सदर रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी आपण खालील👇👇👇 लिंकवर नाव नोंदणी करता येईल.*

https://forms.gle/YQWqHJ2YUeXTCKwa6

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdamOJxpSFgRpYY-OPLlyCms9kG4egG3Nzstx_GArC7K7NPVg/viewform?usp=sf_linkधरणगाव शह...
24/03/2020

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdamOJxpSFgRpYY-OPLlyCms9kG4egG3Nzstx_GArC7K7NPVg/viewform?usp=sf_link

धरणगाव शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की वरील लिंक वर क्लिक करून ..धरणगाव शहरातील..प्रवासी history असणाऱ्या, मुंबई,पुणे किंवा बाहेरील राज्यातून किंवा परदेशातून आलेल्या प्रवासी/व्यक्तींची माहिती वरील फॉर्म द्वारे आपणास देता येईल...👆जेणेकरून नगरपरिषद कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येईल.
*टीप: सदर फॉर्म द्वारे संकलित करण्यात आलेली माहिती नगरपरिषद कडे गोपनीय ठेवण्यात येईल.*
तरी नागरिकांनी सदर फॉर्म भरून नगरपालिकेला सहकार्य करावे.

धरणगाव नगरपरिषद प्रशासनामार्फत शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदर फॉर्म मध्ये पुणे, मुंबई किंवा ...

11/11/2019

धरणगाव शहरात महात्मा गांधी जयंती निमित्त “स्वच्छता ही सेवा “ उपक्रम.  महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती तसेच माजी पंत...
02/10/2019

धरणगाव शहरात महात्मा गांधी जयंती निमित्त “स्वच्छता ही सेवा “ उपक्रम. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती तसेच माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या 114 व्या जयंतीचे अवचित्य साधुन धरणगाव शहरात गेल्या 11 सप्टेबर पासुन स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येत असुन त्याद्वारे शहरातील नागररिकांमध्ये प्लॅस्टीक बंदी बाबत जनजागृती करण्यात येत आहे. दिनांक 02 ऑक्टोबर 2019 रोजी नगरपरिषद व बालकवी ठोबरे विद्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजना कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव यांच्या संयुक्त विद्यामाने स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. सर्व प्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ स्वच्छता व प्लास्टीक मुक्ती ची सामुहिक शपथ घेण्यात आली. यामध्ये शहरातील बहुसंख्य नागरीक, न.पा. कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर बालकवी ठोंबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा या अंतर्गत स्वच्छतेचे महत्व, प्लास्टीक मुक्ती, मतदान जागृती या विषयांवर सुंदर असे पथनाट्य सादर केले. त्यानंतर सदर विद्यार्थ्यांनी व न.पा. कर्मचारी यांनी शहरात स्वच्छता फेरी काढत शहरातील बाजोट चौक, रामलीला चौक, गबानंद चौक आदी ठिकाणी पथनाट्य सादर केले व त्यात नागरींकांनी सुध्दा हिररीने सहभाग नोंदविला. त्यानंतर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख ठिकाणांवरील प्लास्टीकचा कचरा गोळा करुन स्वच्छता ही सेवा उपक्रमामध्ये श्रमदान केले तसेच विद्यार्थींनी प्रत्येक दुकानामध्ये जाउन प्लास्टीक मुक्ती बाबत जनजागृती करुन न. पा. मार्फत देण्यात आलेले स्टीकर्स, पोस्टर्स चिटकविले.
दरम्यान दि. 01 ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी द्वार स्तरावर जावुन प्लॅस्टीक मुक्ती बाबत जनजागृती केली व प्लॅस्टीकचा वापर करु नका या बाबत अवाहन केले. या अवाहनाला नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत स्वतःहुन एकुण 35 किलो प्लॅस्टीक न.पा. च्या पथकांकडे दिले. तसेच नागरींकांनी सुध्दा प्लॅस्टीकचा वापर करु नये व आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री जनार्दन पवार यांनी केले. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी नगरपरिषदेचे कार्यालयिन अधिक्षक श्री संजय मिसर, आरोग्य निरिक्षक श्री रविद्र गांगुर्डे, शहर समन्वयक श्री निलेश वाणी, मुकादम शमशोद्दीन शेख व सर्व सफाई कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

एक पाऊल प्लॅस्टिक मुक्ती कडे..!! #स्वच्छता_ही_सेवा Swachh Bharat Mission - Urban Swachh Survekshan
01/10/2019

एक पाऊल प्लॅस्टिक मुक्ती कडे..!!
#स्वच्छता_ही_सेवा Swachh Bharat Mission - Urban Swachh Survekshan

16/09/2019

धरणगाव शहरात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी पणे अमलबजावणी सुरू असताना शहरात स्वच्छतेबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच धरणगाव नगरपरिषद शासनाच्या निर्देशानुसार *स्वच्छता ही सेवा* हा उपक्रम राबवित आहे. त्या अंतर्गत दि.१६ सप्टेंबर रोजी प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये विविध दुकानदार, व्यापारी,विक्रेते यांचेकडून जवळपास ३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.तसेच बंदी असलेले प्लॅस्टिकचा साठा असल्यास संबंधितांनी सदर प्लास्टिक नगरपरिषदेच्या प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये त्वरित जमा करावे अन्यथा प्लास्टिकचा साठा किंवा वापर करताना आढळल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांची नोंद घ्यावी असे आवाहन नगरपरिषद मार्फत करण्यात आले. तसेच मुख्याधिकारी यांच्या कक्षात व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीमध्ये प्लास्टिक बंदी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच सदर मोहीम दररोज राबविण्यात येणारा असून व्यापाऱ्यांनी तसेच दुकानदारांनी सुध्दा न.पा. प्रशासनास सहकार्य करावे असे अशी अपेक्षा मुख्याधिकारी यांनी व्यक्त केली. सदर मोहीम मुख्याधिकारी श्री.जनार्दन पवार यांचे मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्य निरीक्षक श्री रवींद्र गांगुर्डे यांचे टीम ने राबविली.

Address

Dharangaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धरणगाव नगरपरिषद,ता.धरणगाव जि. जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share