22/01/2024
भगवान श्रीरामचंद्र परमात्मा तसेच सद्गुरू माऊली माँ च्या आशीर्वादाने ५०० वर्षानंतर आलेल्या अत्यंत दुर्लभ योगाचा म्हणजेच श्रीरामचंद्र परिवार यांच्या प्राणप्रतिष्ठा श्री क्षेत्र मनोर येथील सर्व भाविक भक्तांच्या तसेच श्री संतोशजी जनाठे आणि त्यांच्या सर्व अत्यंत सश्रद्ध सेवेकर्यांच्या सहकार्याने त्री दिवसीय श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा एक भाग होता आला याचा खूप आनंद आणि अभिमान देखील आहे.... ज्यावेळेस अयोध्येत भगवान श्रीराम लल्ला बाल स्वरूपात विराजमान होतात आहेत त्याचवेळेस , त्याच मुहूर्तावर आमच्या सर्वांच्या आयुष्यात हा क्षण यावा हे आमचे सर्वांचे महद्भाग्य च आहे..... भगवान श्रीरामचंद्र यांच्या चरणी एकच नम्र प्रार्थना आहे की,
सर्वांच्या जीवनात भगवान श्रीराम यांचे आदर्श, मर्यादा, प्रेम , समता, सौहार्दाचे, मित्रतेचे निर्माण प्रत्येक सनातनी च न्हवे तर प्रत्येक मानवाच्या हृदयात स्थापित व्हावेत....
सर्वत्र सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्भवेत्।।
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर !
वर्म सर्वेश्वर पूजनाचे..... !!