Mahalaxmi Dahanu | डहाणू ची महालक्ष्मि

  • Home
  • India
  • Dahanu
  • Mahalaxmi Dahanu | डहाणू ची महालक्ष्मि

Mahalaxmi Dahanu | डहाणू ची महालक्ष्मि Dahanu's Mahalaxmi

aayi mahalaxmi



डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे. तेथील छोट्या बंदरातून लाकडांचा व्यापार चालतो. निसर्गसौंदर्यांने नटलेल्या या शहराजवळ, अठरा मैलांवर विवळवेढे नावाचे गाव आहे. त्या गावी महालक्ष्मीचे स्थान असून ते जागृत मानले जाते. देवीला या भागात ‘आई’ म्हणून ओळखण्यात येते

|| *निमंत्रण @विवळवेढे कला केंद्र* || महालक्ष्मी येथे येणाऱ्या पर्यटक/भाविकांसाठी आदिवासी हस्तकला, वारली चित्रकला वस्तू ...
09/10/2021

|| *निमंत्रण @विवळवेढे कला केंद्र* ||

महालक्ष्मी येथे येणाऱ्या पर्यटक/भाविकांसाठी आदिवासी हस्तकला, वारली चित्रकला वस्तू आयुश कला केंद्र माध्यमातून उपलब्ध करून देत आहोत.
सदर *केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.* [कोविड विषयक नियम पाळून] https://local.google.com/place?id=3336730625970784693&use=posts&lpsid=6389989124655149845

▪️ *उदघाटक* :
सोयीन, सवासिन,धवलेरी, भगत, तारपकरी

▪️ *ठिकाण* : आयुश कला केंद्र, विवळवेढे, कला जगन सातवी यांचा गाळा क्र.२, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८, ता.डहाणू, जि. पालघर
नकाशा : https://g.page/r/CbXJJ1jTck4uEAE

▪️ *उदघाटन वेळ* :
१० ऑक्टोबर२०२१, सकाळी ११:०० वाजता

▪️ *निमंत्रक* :
आयुश | आदिवासी युवा शक्ती
आदिवासी युवा सेवा संघ

▪️ *समन्वयक* : पूनम चौरे, स्वप्निल दिवे, सुचिता कामडी, बबिता वरठा, नरेश भगत, अजय बीज, सुरेंद्र वसावले

*संपर्क* : ८०८७९७२५६१ , ९८३४४८६९८४

_पारंपारिक ज्ञानातून आदिवासी समाजात आर्थिक स्वावलंबनाच्या पर्यायांना व्यापक स्वरूप देण्यासाठी समाज, स्वयंसेवक,CSR, शासन योजना इ. सहकार्याने सामाजिक उद्यामितेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत.Let's do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!_

__________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
आयुश युट्युब चॅनेल सबस्क्राईब्स साठी
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1

28/06/2018

|| *आयुश उपक्रम माहिती २७ जून २०१८* ||

Participation as resource person at
“Capacity Building Workshops on *Intellectual Property Rights (IPR) Protection* through GI Act” at Nagpur on 26th June 2018.

नागपूर येथे आयुश तर्फे सचिन सातवी *वारली चित्रकला उपक्रम चे अनुभव कथन* साठी रिसोर्स पर्सन म्हणून सहभागी झाले होते.

बौद्धिक संपदा कायद्या आणि भौगोलिक उपदर्शनी संदर्भात केंद्र तसेच राज्य अधिकाऱ्यांना जागरूकता व्हावी या साठी एक दिवशीय कार्यशाळा ठेवण्यात आली होती. यात विविध विभागातून अंदाजे १५० अधिकारी, आणि इत्तर प्रतिनिधी सहभागी झाले होते. बौद्धिक संपदा कायदा आणि त्या संदर्भात नियमावलीचे मार्गदर्शन डेप्युटी डायरेक्टर टेक्सटाईल कमिटी श्री रोऊट यांनी केले. चंदेरी भौगोलिक उपदर्शनी आणि त्याचे रिझल्ट संदर्भातील केस स्टडी मध्य प्रदेश हॅन्डलूम संचालक महेश घुलाटी यांनी प्रेझेन्टेशन दिले. *नेदरलँड येथील कंपनीने वारली पेंटिंग डिझाईन चे ट्रेडमार्क विरोधात आयुश च्या केस स्टडी बद्दल सचिन यांनी सविस्तर माहिती दिली (४५ मिनिटे)*. डॉ अमित सातवी नागपूर येथेच असल्याने ते पण सोबत सहभागी झाले होते.

आयुश तर्फे सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये पुढील प्रमाणे विषय मांडले होते.

*१) वारली चित्रकला म्हणजे काय* : सांस्कृतिक महत्व, पारंपारिक ज्ञान

*२) वारली चित्रकला उपक्रम* :

*३) वारली चित्रकला भौगोलिक उपदर्शनी नोंदणी* : २००९ पासून सुरु केलेले कार्य, २०१४ ला नोंदणी पूर्ण. आदिवासी युवकांनी २०,००० तास मेहनत आणि ७.५ लाख रुपये पदर चे खर्च करून सामाजिक दायित्व म्हणून हि बौद्धिक संपदा नोंदणीकृत व्हावी या साठी अथक प्रयत्न केले. (शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत नाही)

*४) उपदर्शनी नोंदणी नंतर चे उपक्रम* : हि नोंदणी प्रत्येक्ष समाज हितासाठी कमी यावी साठी आयुश सदैव प्रयत्नशील आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक कलाकार आणि युवकांना यातून रोजगार निर्मिती व्हावी समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत व्हावे या साठी कलाकार, स्वयंसेवक, समाज, शासन, खाजगी कंपनी या मार्फत एकत्रित मॉडेल विषयी प्रपोजल विषयी माहिती दिली

*५) इंफ्रिजमेण्ट केस बद्दल* : सध्या वारली चित्र विविध स्वरूपात बघायला मिळतात ड्रेस, भिंतीवर, इत्यादी यातील बहुतेक वेळेस आदिवासी कलाकारांना डावलले जाने. शर्ट/साडी/चप्पल कंपनींना आदिवासी देवता आणि सांस्कृतिक आदरस्थाने काढल्या बद्दल आपण आयुश तर्फे नोटीस आणि नेदरलँड कंपनी च्या वारली पैंटिंग लोगो ट्रेडमार्क विरोधात प्रकरणा बद्दल सविस्तर माहिती दिली

*६) शासनाकडून अपेक्षा* : अनेक योजना प्रत्येक्ष ग्राउंड वर लोकांना लाभ आणि स्वावलंबीपणे उपक्रम सुरु असलेली उदाहरणे सापडत नाही. वारली पेंटिंग चे हे एक उदाहरण म्हणून ठळकपणे अधिकाऱ्यांसमोर मांडले. योजना असून सुद्धा वारली चित्रकलेच्या भौगोलिक उपदर्शनी नोंदणीला कोणतीही शासकीय मदतीशिवाय आदिवासी युवकांना स्वतःच्या खिशातून यासाठी खर्च करावा लागणे हे नक्कीच डोळे उघडण्यासाठी पुरेसे आहे.

आदिवासी समाजात असलेले बौद्धिक संपदा आणि पारंपरिक ज्ञान यांचे योग्य डॉक्युमेंटेशन करून सोशियल इंटरेप्रेनरशिप चे मॉडेल्स तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून *स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्वावलंबन करण्यात महत्वाची भूमिका जल जंगल जमीन जीव पर्यावरण जतन करण्यासाठी हातभार लावेल*

या पुढे इन्फ्रा, कपॅसिटी बिल्डिंग, मॅनुफॅक्चरिंग, क्वालिटी, रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट, मार्केट लिंकेजेस साठी लागणारी गुंतवणुकीसाठी ग्राऊंड कंडिशन लक्षात घेऊन योजना आणि त्याचा लाभ प्रत्येक्ष कार्य करणाऱ्यांना मिळावा या साठी शासनाचा पुढाकार अपेक्षित आहे

*७) आयुश चा परिचय* : १९९९ ते २००६ निरीक्षण आणि दिशा आकलन, २००७ पासून उपक्रमांची सुरवात, २०११ मध्ये नोंदणी नंतर चे उपक्रम, सध्याचा विस्तार आणि दिशा

*८) प्रश्न उत्तर* : विविध प्रश्न उत्तरे आणि शंका निरसन केले.

प्रेसेंटेशन झाल्यावर कार्यशाळेचे मुख्य आणि डेप्युटी डायरेक्टर श्री राऊट यांनी स्टेजवरून *आयुश च्या उपक्रमांचे कौतुक केले, आणि निस्वार्थपणे समाजासाठी काम करणाऱ्या अश्या प्लॅटफॉर्म ची गरज असल्याचे नमूद केले. आणि आयुश तर्फे प्रपोज केलेल्या वारली चित्रकला संदर्भात उपक्रमांना त्यांच्या पातळीवरून त्यांच्या खात्या मार्फत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले*. तसेच सगळ्या सहभागींनी टाळ्या वाजवून आयुश उपक्रमांना प्रोत्साहन दिले.

(माहितीसाठी प्रेझेन्टेशन वाचायचे असल्यास संपर्क करावा)

गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या नॅशनल लेवल GI अवेअरनेस कॉन्फेरंस साठी दिल्ली येथे डॉ. सुनिल पऱ्हाड व सचिन सातवी सहभागी झाले होते.

का कुणास ठाऊक, पण मनात एक समाधान वाटत होते. ११ वर्षानंतर का होईना पण हळू हळू आयुश च्या उपक्रमांचे महत्व सगळ्यांना कळते आहे. प्रशासनात पण या संदर्भात चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. डहाणू प्रकल्पात कलाकार गट निर्मिती, नेदरल्यंड च्या ट्रेडमार्क केस संदर्भात, तसेच काळाघोडा/मलेशिया प्रदर्शन, केंद्रीय अर्थसहाय्य योजनेसाठी प्रपोजल प्रेझेन्टेशन ची संधी मिळाली आणि या सगळ्या साठी आदिवासी विकास विभागा कडून चांगले सहकार्य मिळाले. तसेच इत्तर खात्यातून पण चांगला रिस्पॉन्स येतो आहे.

असो आपले *प्रामाणिक प्रयत्न सुरुच राहतील. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन आणि सहभाग हे उपक्रम अधिक प्रभावी करतील याची खात्री आहे*.

आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण प्रयत्न करतो आहोत. *आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे*. आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया.
Lets do it together!

जोहार !

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 0 9246 361 249 | [email protected]

https://www.youtube.com/watch?v=dzjDmrqAJsA
01/04/2015

https://www.youtube.com/watch?v=dzjDmrqAJsA

Dahanu darshan a part of tribal tourism, organised by AYUSH. Brings you virtual tour with help of images from Mahalaxmi mountain (called musalya in local lan...

01/04/2015

डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी आईची प्रसिध्द याञा 3 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे.ही याञा १५ दिवस चालते.
मंदिरातील पूजेचा आणि गडावर ध्वज लावण्याचा मान वर्षानुवर्षे आदिवासी बांधवाचा आहे . जव्हार च्या संस्थाना कडून ध्वज वाघाडी मार्गे विवळवेढे गावात आणला जातो. आणि चैञशुध्द पौर्णिमेला रात्री मुसळ सारख्या दिसणाऱ्या डोंगरावर (मुसल्या डोंगर - महालक्ष्मी गड) ध्वजारोहण होते आणि याञेला सुरूवात होते. जिल्हयातील आदिवासींची आदिमाता म्हणून ओळखली जाते.
यात्रेत येणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत !

29/11/2014
आदिवासी दिन कसा साजरा करणार? TSP  परिसरातील  रोजगाराच्या संधी स्थानिक आदिवासींना देण्यात याव्या हा राज्यापाल्यांची अधिसू...
15/07/2014

आदिवासी दिन कसा साजरा करणार?

TSP परिसरातील रोजगाराच्या संधी स्थानिक आदिवासींना देण्यात याव्या हा राज्यापाल्यांची अधिसूचना आदिवासी विकासात मोलाची भूमिका पार पडू शकते. तयार आहात आपल्या भावंडाना दिशा देण्या साठी ?

गाव आणि तालुका पातळीवर आयोजित करिण्या करिता

१ ऑगस्ट पर्यंत
➀ सामाजिक जागरुकता करूयात
शिक्षणा विषयी जागरुकता
नोकरीच्या संधी विषयी जागरुकता
कौशल्य विकास जागरुकता

५ ऑगस्ट पर्यंत
➁आदिवासी एकात्मता वाढवूया
गावातील सुशिक्षितांची यादी बनवणे
तालुका पातळीवर यादी संकलित करणे
यादीची प्रत आणि अर्ज तयार करणे

९ ऑगस्ट
➂आदिवासी दिन साजरा करूया
मोठया संखेने एकत्रित येउन संकलित केलेले अर्ज एकत्रित PO/ATC यांना सुपूर्द करणे
उपलब्ध असलेल्या उर्जेचा सामाजिक कार्यात सकारात्मकतेने रचनात्मक उपयोग करणे

राज्यपालांच्या अधिसूचने नुसार निर्देशित केलेली पदे : तलाठी, सर्वेक्षक, ग्राम सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहायक, पशुधन सहायक , परिचारिका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी

सेवा योजन नाव नोंदणी किवा ओनलायीन नाव नोंदवा ! www.maharojgar.gov.in


जास्तीत जास्त बेरोजगारांनी नोंदणी करून उपलब्ध रोजगाराच्या संधी चा उपयोग करावा.
आपण सगळ्यांनी ठरवले तर, ह्या वेळेस चा आदिवासी दिन एक नवी दिशा देणारा ठरेल

for tribal  future ! I just signed "Make Independent TSP area District in Thane, as per PESA & 5th Schedule of Constitut...
04/07/2014

for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
Make Independent TSP area District in Thane, as per PESA
Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq share with friends

Maharashtra State Government has announced bifurcation of Thane District (Largest District in Country & Largest Tribal Population District of...

19/04/2014
महालक्ष्मी माता ही आदिवासी समाजाची कुलदेवता आहे. तिच्‍याप्रती आभार व्‍यक्‍त करण्यासाठी दरवर्षी वारसी उत्सवाचे आयोजन केले...
14/04/2014

महालक्ष्मी माता ही आदिवासी समाजाची कुलदेवता आहे. तिच्‍याप्रती आभार व्‍यक्‍त करण्यासाठी दरवर्षी वारसी उत्सवाचे आयोजन केले जाते. भाद्रपदातील पितृपक्षात पितृबारस साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात एक दिवसाची यात्रा भरते. सर्व आदिवासी बांधव आपल्या शेतात, माळात पिकणारी पिके, तांदूळ, काकड्या, डांगर, चवळी, खुरासन आदी देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात. त्याआधी हे सगळे खुल्या परसात असूनही कुणी भक्षण करत नाही. पृथ्‍वीमाता ही आदिवासींची मुख्‍य देवता. त्‍यामुळे कुठलेही पिकवलेले नवीन धान्‍य, भाजीपाला देवीच्‍या नावाने वाहिल्याशिवाय तिचे भक्षण केले जात नाही. या खाण्‍यास ‘नवखाणे’ असेही म्‍हणतात.
त्या दिवशी 'तारपा' हे आदिवासींचे वाद्य पूजले जाते. त्यांच्या तालावर नाचत नृत्यपूजा बांधली जाते. त्याआधी एकही आदिवासी कलाकार तारपा वाजवत नाही. दिवाळीनंतर तारपा बंद होतो. मग केवळ देवीच्‍या कार्यक्रमांनाच तारपानृत्‍य केले जाते. परंपरेनुसार सर्वप्रथम आदिवासी समाजातील सातवी कुटुंबीय महालक्ष्मी मातेची पूजा करते. त्या दिवशी महालक्ष्मी मातेचे मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले असते. नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेली आदिवासी मंडळी वारसी उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात.
त्‍यानंतर येणारे ‘वाघबारस’ आणि ‘माहिबारस’ हे उत्‍सव पुजार्‍याच्‍या घरी साजरे केले जातात. दिवाळीनंतर 'वाघबारस' साजरी केली जाते.

05/04/2014

महालक्ष्मी माता ही आदिवासी समाजाची कुलदेवता आहे. तिच्‍याप्रती आभार व्‍यक्‍त करण्यासाठी दरवर्षी वारसी उत्सवाचे आयोजन केले जाते. भाद्रपदातील पितृपक्षात पितृबारस साजरी केली जाते. त्या दिवशी मंदिरात एक दिवसाची यात्रा भरते. सर्व आदिवासी बांधव आपल्या शेतात, माळात पिकणारी पिके, तांदूळ, काकड्या, डांगर, चवळी, खुरासन आदी देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात. त्याआधी हे सगळे खुल्या परसात असूनही कुणी भक्षण करत नाही. पृथ्‍वीमाता ही आदिवासींची मुख्‍य देवता. त्‍यामुळे कुठलेही पिकवलेले नवीन धान्‍य, भाजीपाला देवीच्‍या नावाने वाहिल्याशिवाय तिचे भक्षण केले जात नाही. या खाण्‍यास ‘नवखाणे’ असेही म्‍हणतात.
त्या दिवशी 'तारपा' हे आदिवासींचे वाद्य पूजले जाते. त्यांच्या तालावर नाचत नृत्यपूजा बांधली जाते. त्याआधी एकही आदिवासी कलाकार तारपा वाजवत नाही. दिवाळीनंतर तारपा बंद होतो. मग केवळ देवीच्‍या कार्यक्रमांनाच तारपानृत्‍य केले जाते. परंपरेनुसार सर्वप्रथम आदिवासी समाजातील सातवी कुटुंबीय महालक्ष्मी मातेची पूजा करते. त्या दिवशी महालक्ष्मी मातेचे मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले असते. नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेली आदिवासी मंडळी वारसी उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात.
त्‍यानंतर येणारे ‘वाघबारस’ आणि ‘माहिबारस’ हे उत्‍सव पुजार्‍याच्‍या घरी साजरे केले जातात. दिवाळीनंतर 'वाघबारस' साजरी केली जाते.

Address

NH 8, Vival Vedhe
Dahanu
401607

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahalaxmi Dahanu | डहाणू ची महालक्ष्मि posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share