ERO 10 Chopda

ERO 10 Chopda निवडणूक शाखा, चोपडा चे अधिकृत फेसबुक पेज. Official page of Election Branch, Chopda

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी प्रशासनाने वेग घेतलेला आहे. याचाच एक भाग म्हणून चोपडा ...
09/05/2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी प्रशासनाने वेग घेतलेला आहे. याचाच एक भाग म्हणून चोपडा तहसील कार्यालयात क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे तथा अति .सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, निवडणूक प्रशिक्षक नरेंद्र सोनवणे, सर्व नोडल आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर देण्यासाठी ईव्हीएम मशीन ची सिलिंग सेटिंग प्रक्रिया प्रशासनाने यशस्वीपणे पार पाडली आहे. निवडणुकीदरम्यान चोपडा तालुक्यातील 136 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे तर यावल तालुक्यात 24 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले असून त्याद्वारे मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यानी मतदान केंद्रांची अंतिम तपासणी करून आवश्यक त्या सर्व सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवर कुलर, मंडप, पिण्याचे पाणी व्हिडिओग्राफी आधी आवश्यक बाबी पूर्ण असल्याची खात्री करावी.आदर्श मतदान केंद्र, महिलांसाठी खास पिंक बूथ, मी दिव्यांग मतदान केंद्रांवर सर्व मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन रोखीने मिळणार आहे. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहन क्षेत्रीय अधिकारी आणि उपस्थित तलाठ्यांना करण्यात आले.

28/04/2024
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण संपन्नचोपडा येथील नगर परिषदेच्या नाट्यगृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी...
27/04/2024

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण संपन्न

चोपडा येथील नगर परिषदेच्या नाट्यगृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी कर्मचाऱ्यांना निवडणुकीदरम्यान करावयाची कामे आणि जबाबदारी याबाबत यथोचित प्रशिक्षण दिले. यावेळी मतदारसंघातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लावणे, मतदान केंद्रांवरील पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेले कामे पार पाडणे आदीं बाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. निवडणुकीसाठी नियुक्त मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी त्यांच्याकडून पोस्टल बॅलेट नमुन्यात अर्ज घेण्यात आले.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी निवडणुकीच्या कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले

चहार्डी गावामध्ये महिला बचत गटामार्फत मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम .अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी ...
26/04/2024

चहार्डी गावामध्ये महिला बचत गटामार्फत मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम .अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार साहेब चोपडा यांनी बचत गटातील महिला मतदान नोंदणी व माहिती देण्यात आली .मतदान केंद्राचे तपशील, वोटर हेल्पलाइन ॲप, मतदानासाठी आवश्यक असलेले बारा ओळखीचे पुरावे, मतदान केंद्रावर मतदानाचा दिवसी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, प्रथमोपचार, प्रतीक्षागृह, गरोधर महिला बैठक व्यवस्था, इ.सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. बचत गटामार्फत गावामध्ये मध्ये लोकांना मतदानासाठी प्रेरित करावे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.
“ मतदान पवित्र दान लोकशाही चा सर्वोच्च क्षण मतदान, देशाचे उज्वल भविष्य व विकासासाठी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू “ सर्व मतदारांनी आपले स्वयंस्फूर्तीने मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे आणि लोकशाही गणराज्य बळकट करुया

मा तहसिल कार्यालय चोपडा येथे मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदानाधिकारी यांच्यासाठी ईव्हीएम हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्...
13/04/2024

मा तहसिल कार्यालय चोपडा येथे मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदानाधिकारी यांच्यासाठी ईव्हीएम हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण नंतर प्रमाणपत्र वाटप करताना

मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदानाधिकारी यांच्यासाठी ईव्हीएम हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दरम्यान मा तहसीलदार साहेब ...
13/04/2024

मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदानाधिकारी यांच्यासाठी ईव्हीएम हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दरम्यान मा तहसीलदार साहेब चोपडा video shooting करतांना

मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदानाधिकारी यांच्यासाठी ईव्हीएम हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न चोपडा प्रतिनिधी राव...
13/04/2024

मतदान केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदानाधिकारी यांच्यासाठी ईव्हीएम हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न

चोपडा प्रतिनिधी

रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील चोपडा तहसील कार्यालयात निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष तथा निवडणूक अधिकारी क्रमांक एक यांच्यासाठी ईव्हीएम यंत्र जोडणी हाताळणी प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी यंत्र जोडणी आणि मॉक पोल करण्यात आले. प्रशिक्षणासोबतच कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी,प्रपत्र क्रमांक 17 सी आणि इतर आवश्यक ती सर्व प्रपत्रे भरण्याचा प्रत्यक्ष अनुभव देऊन सराव करून घेण्यात आला.
दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात एकूण ..... केंद्राध्यक्ष आणि प्रथम मतदानाधिकारी यांनी प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षण यशस्वीतेसाठी मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, नायब तहसीलदार आर आर महाजन, मास्टर ट्रेनर नरेंद्र सोनवणे तथा नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 04 रावेर मतदार संघातर्गत 10 चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदार संघ निवडणूक संबधित  कक्षाची पाहणी...
02/04/2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
04 रावेर मतदार संघातर्गत 10 चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदार संघ निवडणूक संबधित कक्षाची पाहणी करतांना मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा नगर परिषदेचे परीक्षाविधीन मुख्याधिकारी अर्पित चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठकप्रतिनिधी  :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व...
02/04/2024

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक
प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांनी ०४ रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व सेक्टर अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसोबत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा नगर परिषदेचे परीक्षाविधीन मुख्याधिकारी अर्पित चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, विभागांचे सेक्टर अधिकारी तथा नोडल अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सुचना दिल्यात.
१. शंभर वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदाराना शोधून काढण्याचे आवाहन केले. या मतदारांना प्रपत्र क्रमांक 12 ड चे वाटप करून मतदानाचा अधिकार प्राप्त करून द्यावा अशा सूचना संबंधितांना दिल्या.
२. मतदान जनजागृती संबंधात काम करणाऱ्या स्वीप विभागातील नोडल अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी निवडणुकीपर्यंत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. आणि ज्येष्ठ नागरिक,महिला, दिव्यांग मतदार यांना मतदानासाठी प्रेरित करावे. मतदानासाठी त्यांना मतदान कक्षा पर्यंत पोहोचवण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
३. निवडणुकीसाठी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. त्यासाठी आवश्यक पुस्तके, पीपीटी, टीटोरियल आदी साहित्य तयार ठेवावे.
४. प्रत्यक्ष इव्हीएम मशीन हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात यावे.प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांची लेखी, तोंडी परीक्षा घेऊन त्यांना प्रशिक्षण कितपत कळलेले आहे याचा आढावा घ्यावा.
५. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमेवर चेक पोस्ट असून येथील नियुक्त कर्मचाऱ्यांनी सेक्टर अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे. चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी.
६. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर तसेच लहान बाळ असणाऱ्या महिलांसाठी मतदान केंद्रातच पाळणाघर आणि पिण्याचे पाणी , प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा,वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधा असल्याबाबतची खात्री सर्व सेक्टर अधिकाऱ्यांनी करावी.
७. संवेदनशील मतदान केंद्रांच्या परिसरातील दंगलीची ठिकाणे ,घरे यांचे मॅपिंग करणे. पोलिसांना, गावातील पोलीस पाटील यांना आवश्यक त्या सूचना देणे.
८. हद्दपार केलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून निवडणूक काळात अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.
९. भारतीय निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
१०. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शांतता समितीची बैठक घेऊन सलोख्याचे वातावरण टिकून राहील यासाठी काळजी घ्यावी.

पं.ज.नेहरू प्राथ. वा माध्य. विद्यालय अकुलखेडा शाळेत मतदार जनजागृती अभियानचोपडा : पंडित जवाहरलाल नेहरू प्राथ. वा माध्य. व...
29/03/2024

पं.ज.नेहरू प्राथ. वा माध्य. विद्यालय अकुलखेडा शाळेत
मतदार जनजागृती अभियान
चोपडा : पंडित जवाहरलाल नेहरू प्राथ. वा माध्य. विद्यालय अकुलखेडा येथे मतदान जनजागृती अभियान अंतर्गत शाळांचे विद्यार्थी व शिक्षक आणि मान्यवर ने शपथ घेतली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते. कार्यक्रम दरम्यान शिक्षकांनी तसेच विध्यार्थ्यानी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याची वा जनजागृती करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीचे प्रकियेत मतदान करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे आणि त्यासाठी लोकांच्या आवाज असणे आवश्यक आहे प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. मतदान करून तुम्ही बदल घडवू शकता आणि तुमच्या समाजात बदल घडवू शकता. तसेच मतदान विषयी विद्यार्थी संवाद साधून मतदानाचे महत्व पटवून सांगितले मतदान जागृती करण्यासाठी असे प्रतिपादन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले.

Address

Tahsil Office Chopda
Chopda
425107

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am

Telephone

+912586220076

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 10 Chopda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ERO 10 Chopda:

Share