शिवसेना युवासेना - चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ

  • Home
  • India
  • Chiplun
  • शिवसेना युवासेना - चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ

शिवसेना युवासेना - चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ चिपळूणच्या प्रत्येक कडवट मूळ शिवसैनिकाचे हक्काचे पेज..!

चिपळूण हा शिवसेनेचा कायमस्वरूपी बालेकिल्ला राहिला आहे..
चिपळूण करांच्या हाकेला कायम धावून जाणारी आपली संघटना... शिवसैनिकांच्या मासाहेबांचा माहेरघर...आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आवडत.. चिपळूण..!

*“भीतीचा रिमोट कोणाच्या हातात?”*देश पुन्हा एका परिचित वाक्याशी सामना करत आहे “परिस्थिती कोविडसारखी होऊ शकते.” हे वाक्य ऐ...
26/03/2026

*“भीतीचा रिमोट कोणाच्या हातात?”*

देश पुन्हा एका परिचित वाक्याशी सामना करत आहे “परिस्थिती कोविडसारखी होऊ शकते.” हे वाक्य ऐकलं की मनात पहिली प्रतिक्रिया भीतीची नसते… तर एक जुना अनुभव जागा होतो अनिश्चिततेचा आणि “काय चाललंय?” या कायम अनुत्तरित प्रश्नाचा.

संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी सध्याच्या इंधन/ऊर्जा संकटाची तुलना कोविड काळाशी केली त्यांनी सुचवलं की, जसं कोविडच्या काळात देशाने एकत्रित प्रयत्न केले, तसंच आता करावं लागेल तसेच त्यांनी इशारा दिला की जागतिक युद्ध/तणावामुळे दीर्घकालीन अडचणी येऊ शकतात. जागतिक युद्ध/ऊर्जा संकटामुळे पुरवठा साखळी बिघडू शकते, अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे कोविडसारखी समन्वयित तयारी आवश्यक आहे असा त्या विधानाचा अर्थ.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जेव्हा असे संकेत दिले जातात, तेव्हा प्रश्न “काय होणार?” हा नसतो… प्रश्न असतो“ आपण पुन्हा इथे कसे आलो?”

*आत्मनिर्भरतेचा नारा… की भीतीची तयारी?*

गेल्या दशकभरात आपण “आत्मनिर्भर भारत” ऐकलं, “मेक इन इंडिया” ऐकलं… जागतिक मंचावर भारत उभा राहत असल्याचं चित्र रंगवलं गेलं.

पण जरा जागतिक तणाव वाढला, की आपली अर्थव्यवस्था अजूनही डळमळते, पुरवठा साखळी विस्कळीत होते, आणि सरकार पुन्हा जनतेला “मानसिक तयारी” करून घेण्याचा सल्ला देतं.

म्हणजे नेमकं काय चाललंय? आत्मनिर्भर भारत… की ‘सिच्युएशन-डिपेंडंट’ भारत?

*इंधन संकटाचा ‘कोविडीकरण’- एक मास्टर स्ट्रोक?*

अलीकडच्या संकेतांमधील सर्वात उपरोधिक गोष्ट म्हणजे इंधन संकटाची तुलना कोरोना संकटाशी करणं.

हा खरंच एक “मास्टर स्ट्रोक” आहे कारण संकट नैसर्गिक वाटू लागतं, जबाबदारी आपोआप धूसर होते आणि परराष्ट्र धोरण, ऊर्जा नियोजन यांसारखे कठीण प्रश्न पार्श्वभूमीत ढकलले जातात.

म्हणजेच संदेश स्पष्ट “हे टाळता येणार नव्हतं”, “सगळ्यांनाच सहन करावं लागेल” आणि त्याच वेळी एक न बोललेला इशारा “तुमचं तुम्हीच बघा.”

उद्या कदाचित पुन्हा पेट्रोलसाठी रांगा, सिलिंडरसाठी प्रतीक्षा आणि रोजच्या जगण्यासाठी तडजोड.

मग सरकारचं काम काय?
भीतीची पूर्वसूचना देणं… की संकट टाळणं?

*१२ वर्षे सत्तेत… आणि अजूनही ‘भूतकाळ’च जबाबदार?*

सत्तेत १२ वर्षे म्हणजे एक पिढी तयार होते. नीती, निर्णय, दिशा सगळं तुमचं. पण अजूनही एखादा प्रश्न विचारला की उत्तर तयार “जवाहरलाल नेहरू… काँग्रेस… ७० वर्षं…”

हा इतिहासाचा अभ्यास नाही, हा जबाबदारी टाळण्याचा सवयीचा रिफ्लेक्स आहे.

नेतृत्व म्हणजे चुकांची कबुली देणं आणि उपाय मांडणं. पण इथे समीकरण उलटं दिसतं चुका तुमच्या, कारणं भूतकाळाची, आणि परिणाम जनतेच्या नशिबात.

*भीतीचं व्यवस्थापन की व्यवस्थापनाची भीती?*

जर खरंच परिस्थिती गंभीर असेल, तर सरळ प्रश्न आहेत तयारी काय आहे? अर्थव्यवस्थेचं संरक्षण कसं होणार? रोजगार, उद्योग, पुरवठा यासाठी ठोस आराखडा आहे का?

की पुन्हा एकदा… “घरात बसा”, “टीव्हीवर भाषण ऐका”, “टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा” आणि दरम्यान खरे प्रश्न शांतपणे साइडला.

ही रणनीती नाही… हा भावनिक व्यवस्थापनाचा ‘इव्हेंट’ आहे.

*WhatsApp राष्ट्रवाद vs वास्तव*

आज एक वेगळीच अर्थव्यवस्था उभी राहिली आहे “फॉरवर्डेड मेसेज इकॉनॉमी”.

इथे डेटा लागत नाही, तथ्य लागत नाही, फक्त विश्वास लागतो... आंधळा.

पण वास्तव वेगळं असतं उद्योग WhatsApp वर चालत नाहीत, GDP ‘जयघोष’ने वाढत नाही आणि संकटं “फॉरवर्डेड” करून दूर जात नाहीत

*नागरिक की प्रेक्षक?*

सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपण नागरिक राहिलो नाही,
आपण प्रेक्षक झालो.

नेते बोलतात, आपण टाळ्या वाजवतो.
ते इशारे देतात, आपण घाबरतो.
ते दिशा बदलतात, आपण प्रश्न न विचारता वळतो.

आणि मग… संकट कोणाचंही असो,
भूमिका मात्र एकच “गर्दी”.

*प्रश्न… जो विचारायलाच हवा*

जर पुन्हा “कोविडसारखी परिस्थिती” येणार असेल, तर त्यासाठी जनतेला तयार करण्यापूर्वी, सरकारने स्वतःला तयार केलं आहे का?

की पुन्हा एकदा भीतीचं वातावरण,
भावनिक भाषणं, आणि टाळ्यांचा गजर?

लोकशाहीत सर्वात मोठा धोका संकट नसतो, तर प्रश्न विचारणं थांबणं असतं.

जोपर्यंत नागरिक नेत्याला देव मानतो,
तोपर्यंत त्याला उत्तरं मिळत नाहीत फक्त फतवे मिळतात. आणि त्या फतव्यांत एकच ओळ असते “घाबरा… आणि स्वतःच निभवा.”

जय महाराष्ट्र.

२६ मार्च २०२६

✍🏻सचिन नंदकुमार चोरगे.
तालुका प्रसिद्धीप्रमुख,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण.

*“चुकून नाही झालं… मनातलं बाहेर आलं!”*कधी कधी सत्य इतकं उघडपणे समोर येतं की त्याला पुरावे लागत नाहीत फक्त एक शिक्का पुरे...
26/03/2026

*“चुकून नाही झालं… मनातलं बाहेर आलं!”*

कधी कधी सत्य इतकं उघडपणे समोर येतं की त्याला पुरावे लागत नाहीत फक्त एक शिक्का पुरेसा असतो. आणि या वेळी तो शिक्का होता भारतीय जनता पक्षा चा… आणि कागद होता निवडणूक आयोग चा.

आता याला चूक म्हणायचं का चुकून झालेलं सत्योद्घाटन?
कारण चूक ही एकदाच होते, पण विश्वासघात हा सवयीचा भाग असतो.

निवडणूक आयोग ज्याच्यावर लोकशाहीचा पाया उभा आहे तोच जर एखाद्या पक्षाच्या शिक्क्याखाली दिसू लागला, तर ही केवळ प्रशासकीय गफलत नाही… ही लोकशाहीच्या आत्म्याला लागलेली ठिणगी आहे.

लोकशाहीत संस्था या निष्पक्ष असतात, असे आपण बालपणापासून शिकलेलो. पण आता प्रश्न असा पडतोय निष्पक्षतेचा अर्थ बदललाय का? की निष्पक्ष म्हणजे फक्त एका पक्षाच्या बाजूने ठाम उभं राहणं?

आज प्रश्न फक्त एका शिक्क्याचा नाही, प्रश्न आहे त्या शिक्क्यामागे लपलेल्या मानसिकतेचा.

दरम्यान, निवडणूक आयोग याने यावर ‘लिपिकीय चूक’ अशी सफाई दिली. कारणही तितकंच रंजक भारतीय जनता पक्ष च्या केरळ युनिटने २०१९ च्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत स्पष्टीकरण मागताना स्वतःचाच शिक्का असलेली प्रत जोडली, आणि तीच प्रत आयोगाच्या कार्यालयातून इतर पक्षांना पाठवली गेली.

म्हणजे आता निष्पक्षते ची नवी व्याख्या तयार झाली आहे पक्ष विचारतो, आयोग उत्तर देतो… आणि उत्तर देताना पक्षाचाच शिक्का वापरतो.

ही चूक इतकी निरागस आहे की ती ऐकून प्रश्न पडतो कार्यालयात लक्ष कुणाचं नव्हतं, की लक्ष जाणीवपूर्वक दुसरीकडे वळवलं होतं?

उगाच म्हणतात का… “भाजपा निवडणूक देणारा आयोग!”

हे सगळं इतकं उघडपणे घडतंय की आता षड्यंत्र सिद्ध करण्याचीही गरज उरलेली नाही. जणू काही सगळ्यांनी ठरवलंय होय, आम्हीच करतो… काय करायचं ते करा?

पत्र आयोगाचं… मुद्रांक पक्षाचा… आणि विश्वास कुणाचा?

जर आयोगाची पत्रं पक्षाच्या शिक्क्याखाली निघत असतील, तर उद्या निकालही मुद्रांकित होणार नाहीत याची खात्री कोण देणार?

हे सगळं बघून एक उपरोधिक कल्पना डोक्यात येते कदाचित आता नवीन बोर्ड लावण्याची वेळ आली आहे “Election Commission of India (Powered by BJP)”

आणि आपण, सामान्य नागरिक?
आपण अजूनही मतदानाच्या रांगेत उभे राहून माझा मताचा अधिकार जपतोय, जणू काही तो अजूनही आपल्या हातात आहे…

ही घटना एक इशारा आहे लोकशाही एका दिवशी संपत नाही, ती हळूहळू शिक्क्यांमध्ये बदलत जाते.

आणि जेव्हा सत्यावर पक्षाचा शिक्का बसतो, तेव्हा लोकशाही फक्त कागदावर उरते… आणि कागदावर काय असतं, हे तर आपण पाहिलंच आहे.

चुकून नाही झालं… मनातलं बाहेर आलं.

जय महाराष्ट्र.

२६ मार्च २०२६

✍🏻सचिन नंदकुमार चोरगे.
तालुका प्रसिद्धीप्रमुख,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण.

मित्र कोण आणि शत्रू कोणगणित साधे कळले नाही ,नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही ,रुजून राहीले माझ्या अंगणी जवळचेचपण...
26/03/2026

मित्र कोण आणि शत्रू कोण
गणित साधे कळले नाही ,
नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही ,
रुजून राहीले माझ्या अंगणी जवळचेच
पण
मला कळलेच नाही !

कवी सुरेश भटांच्या या कवितेतून माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख , श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज विधिमंडळामधील भाषणाचा समारोप केला . साहेब , कोरोना महामारीत तुमच्या सारखा संवेदनशील , कुटूंबप्रमुख मुख्यमंत्री लाभला म्हणूनच आम्ही आज जिवंत आहोत , संघर्ष शिवसेनेला व तुम्हाला नवीन नाही , पुन्हा एकदा आपण सगळे मिळून फिनिक्स भरारी घेऊया , जय महाराष्ट्र !!

कुटुंबप्रमुख /पक्षप्रमुख
उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

सर्व देशबांधवांना प्रभू श्री राम नवमी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!*राम - एक नैतिक मूल्य*आज रामनवमी शुभेच्छा देताना आपण न...
26/03/2026

सर्व देशबांधवांना प्रभू श्री राम नवमी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!

*राम - एक नैतिक मूल्य*

आज रामनवमी शुभेच्छा देताना आपण नेहमी म्हणतो “जय श्रीराम”. पण क्षणभर थांबून विचार केला का राम म्हणजे नेमकं काय?

राम म्हणजे केवळ एका धर्माचा देव नाही. राम म्हणजे नीती, संयम, करुणा, जबाबदारी आणि सत्यासाठी जगणं.

*राम शोधायचा कुठे?*

राम मनातही आहे, राम जनातही आहे… भूक लागता पोटाला, राम भाकरीतही आहे… हे केवळ काव्य नाही, तर जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.

राम मंदिरात आहेच, पण त्याहून अधिक तो कष्टकरीच्या घामात, अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या धैर्यात आणि भुकेल्याला अन्न देणाऱ्या हातात आहे.

*“राम” आणि आजचं वास्तव*

राम ही कोणाची मक्तेदारी नाही, तो कोणाच्या घोषणांमध्ये किंवा प्रतिमांमध्ये मर्यादित राहत नाही.

राम कधीच द्वेष शिकवत नाही, राम कधीच भीती निर्माण करत नाही, राम कधीच माणसाला माणसापासून दूर नेत नाही.

राम जोडतो, तोडत नाही.

*आत्मपरीक्षणाची गरज*

आजच्या काळात आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायला हवी रामाच्या नावाने नव्हे, तर रामाच्या मूल्यांनी जगणं महत्त्वाचं आहे.

श्रद्धा ही वैयक्तिक आणि निर्मळ असते. ती कोणत्याही दिखाव्याची किंवा मध्यस्थाच्या आधीन नसते.

खरी भक्ती म्हणजे आचरणातला राम.

*खरा राम कोणता?*

राम म्हणजे वचन पाळणारा, सत्तेपेक्षा सत्याला मानणारा, स्त्रीचा सन्मान राखणारा, दुर्बलांच्या बाजूने उभा राहणारा राम म्हणजे “मर्यादा पुरुषोत्तम” मर्यादांचा सर्वोच्च आदर्श.

*राम तुमच्यातच आहे*

राम पुढाऱ्यांचा नाही, राम पंडितांचा नाही… राम शोधण्यासाठी घोषणांची गरज नाही, ना बाह्य प्रदर्शनाची.

राम शोधायचा असेल, तर तो आपल्या विचारात, वर्तनात आणि कृतीत शोधा.

*रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा*

जिथे न्यायाचा विजय होतो, जिथे संस्कृतीचा मान राखला जातो, जिथे माणूस माणसाला माणूस म्हणून जगू देतो तेच खरं रामराज्य.

✨ सर्वांना रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा... राम आपल्या सर्वांच्या मनात जागा होवो घोषणांमध्ये नव्हे, तर जीवनात. 🙏🏻

जय महाराष्ट्र.

२६ मार्च २०२६

✍🏻सचिन नंदकुमार चोरगे.
तालुका प्रसिद्धीप्रमुख,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण.

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे पदांमुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या संवेदनशीलतेमुळे, संकटात उभं राहण्याच...
26/03/2026

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे पदांमुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या संवेदनशीलतेमुळे, संकटात उभं राहण्याच्या धैर्यामुळे आणि माणुसकी जपण्याच्या वृत्तीमुळे त्यांची उंची ठरते. उद्धव ठाकरे हे त्याच प्रकारचं व्यक्तिमत्त्व.

*“सत्तेपेक्षा संवेदनशीलता मोठी” - उद्धव ठाकरे यांचं व्यक्तीचित्र*

विधानपरिषदेतील निरोपाच्या भाषणात त्यांनी स्वतःचं जे चित्र उभं केलं, ते एका टिपिकल राजकारण्याचं नव्हतंच. “माझा पिंड राजकारणाचा नाही, कलाकाराचा आहे” ही त्यांची कबुली केवळ वाक्य नव्हती, तर त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाची किल्ली होती. सत्तेच्या केंद्रस्थानी राहूनही सत्तेचा अहंकार न बाळगणारा नेता ही त्यांची ओळख.

२०१९ साली अचानक मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी येणं आणि तितक्याच अनपेक्षितपणे ती सोडणं, या दोन्ही टोकाच्या अनुभवांकडे त्यांनी ज्या अलिप्ततेने पाहिलं, ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वेगळेपण दाखवून जातं. “जे आपलं नसतं ते स्वीकारताना आनंद नाही, आणि सोडताना दुःख नाही” ही त्यांची भूमिका सत्ता आणि वैयक्तिक मूल्य यांच्यातील स्पष्ट सीमारेषा दाखवते.

*कोरोना काळातील ‘संवेदनशील मुख्यमंत्री’*

COVID-19 च्या काळात त्यांचं नेतृत्व खर्‍या अर्थाने उजळून निघालं. तो काळ केवळ प्रशासनाचा नव्हता, तर भावनिक धैर्य देण्याचा होता आणि इथेच उद्धव ठाकरे वेगळे ठरले.

फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधणारा मुख्यमंत्री. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” सारखी लोकसहभागी मोहीम. धारावी मॉडेलसारखी जागतिक स्तरावर दखल घेतली गेलेली कामगिरी. ऑक्सिजन, आरोग्य सुविधा, टास्क फोर्स यांचा समन्वय.

या सर्वांमुळे ते केवळ प्रशासक राहिले नाहीत, तर “महाराष्ट्रासाठी पाठवलेला दूत” अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.

*कोकणापासून मंत्रालयापर्यंत - संकटातील नेतृत्व*

Cyclone Nisarga सारख्या चक्रीवादळाच्या वेळी त्यांनी दाखवलेली पूर्वतयारी, जनतेला दिलेला इशारा आणि त्यानंतरची मदत हे त्यांच्या निर्णयक्षमतेचं उदाहरण.

कोकणासारख्या तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या प्रदेशावर संकट आलं, तेव्हा त्यांनी केवळ प्रशासन चालवलं नाही, तर लोकांमध्ये धीर निर्माण केला.

*निर्णयक्षम पण माणुसकी जपणारा नेता*

उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीचं एक वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा आणि ठाम निर्णय यांचा संगम.

शेतकरी कर्जमुक्तीचा व्यापक निर्णय, संभाजीनगर नामांतरासारखा, भावनिक-राजकीय निर्णय, सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता विशेषतः अजित पवार यांच्याबद्दल व्यक्त केलेली भावना हे सर्व दाखवतात की ते संघर्षातही नातेसंबंध जपणारे नेता आहेत.

*राजकारणात ‘माणूस’ राहिलेला अपवाद*

आजच्या राजकारणात सत्तेसाठी तडजोडी, कटकारस्थानं आणि वैचारिक लवचिकता सामान्य मानली जाते. पण उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व या चौकटीत बसत नाही.

विरोधकांवर टीका करतानाही सभ्य भाषेचा वापर, सत्ता गेल्यानंतरही संतुलित प्रतिक्रिया, राजकारणात असूनही ‘माणूस’ जपण्याची वृत्ती यामुळेच अनेकांना ते राजकारणातील अपवाद वाटतात.

*“निरोप नव्हे… एका नव्या पर्वाची चाहूल”*

विधानपरिषदेतील हा निरोप केवळ एका पदाचा औपचारिक शेवट नाही तर तो एका विचारशैलीचा, एका संवेदनशील राजकारणाच्या प्रवाहाचा आणि जनतेशी नातं जपणाऱ्या नेतृत्वाच्या एका पर्वाचा टप्पा आहे.

आज अनेकांच्या मनात एकच भावना दाटून येते सभागृहातून एक व्यक्ती निवृत्त झाली नाही, तर जनतेच्या अपेक्षा, विश्वास आणि माणुसकीवर आधारलेलं नेतृत्व काही काळासाठी मागे सरकलं आहे.

हा शेवट नाही… ही कदाचित नव्या, अधिक व्यापक आणि अधिक प्रभावी प्रवासाची शांत पण ठाम सुरुवात आहे.

उद्धव ठाकरे यांची राजकीय कहाणी ही सत्तेच्या चढ-उतारांची नाही, तर मूल्यांच्या सातत्याची आहे.
ते मुख्यमंत्री होते, पक्षप्रमुख आहेत पण त्यापलीकडे ते एक संवेदनशील, संयमी आणि माणुसकी जपणारे नेता म्हणून ओळखले जातात.

राजकारणात अशा व्यक्तिमत्त्वांची गरज कधीही संपत नाही… कारण शेवटी, सत्तेपेक्षा माणूसपण जास्त काळ टिकतं.

शेवटी एवढंच म्हणेन काल उद्धव ठाकरे सभागृहातून बाहेर झाले पण जनतेच्या मनात कायम आहेत. हा पदाचा शेवट… विचारांचा नाही.

जय महाराष्ट्र.

२६ मार्च २०२६

✍🏻सचिन नंदकुमार चोरगे.
तालुका प्रसिद्धीप्रमुख,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण.

“कवितेचं उत्तर… की राजकीय विस्मरण?”नीलमताई गोऱ्हे यांचे सभागृहातील निरोपाचे भाषण वरकरणी आक्रमक, भावनिक आणि सत्य बोलण्याच...
26/03/2026

“कवितेचं उत्तर… की राजकीय विस्मरण?”

नीलमताई गोऱ्हे यांचे सभागृहातील निरोपाचे भाषण वरकरणी आक्रमक, भावनिक आणि सत्य बोलण्याचे धाडस दाखवणारे वाटते. पण त्या भाषणाचा बारकाईने विचार केला, तर त्यात तथ्यापेक्षा राजकीय सोय, विस्मरण आणि दुटप्पीपणा अधिक ठळकपणे दिसून येतो.

*“निरोप की नाट्यमय क्लायमॅक्स?”*

निरोप समारंभ म्हणजे आत्मपरीक्षण, कृतज्ञता आणि सभ्यता दाखवण्याची वेळ असते. पण इथे आरोप, राजकीय संदेश आणि निष्ठेची स्टंटबाजी म्हणजेच हा निरोप नव्हता… हा ‘क्लायमॅक्स सीन’ होता.

*“भ्रमनिरास” की उशिरा आठवलेलं सोयीचं सत्य?*

गोऱ्हे म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या शेवटच्या वर्षात त्यांचा भ्रमनिरास झाला. मग तो भ्रमनिरास सत्तेत असताना का व्यक्त झाला नाही? त्या काळात पद, प्रतिष्ठा, अधिकार, निर्णयप्रक्रियेत सहभाग सगळं स्वीकारलं. पण सत्ता गेल्यावरच अचानक भ्रमनिरास आठवतो?

हे सत्य नसून राजकीय टाइमिंग आहे. आणि उशिरा आठवलेलं सत्य बहुतेक वेळा सत्य नसतं ती गरज असते.

*“भेटत नव्हते” - आरोप की परिस्थितीचा विपर्यास?*

उद्धव ठाकरे भेटत नव्हते, दुरावले होते हा गोऱ्हे यांचा मुख्य आरोप पण कोविड काळात संपूर्ण प्रशासनाची पद्धत बदलली होती व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिजिटल मीटिंग्स, सिस्टम-ड्रिव्हन निर्णय. मग त्या काळात काम सुरळीत चालत असताना आज अचानक आपण नकोसे होतो ही भावना कुठून आली?

हा आरोप भावनिक आहे, पण तथ्यात्मक नाही.

*PPE किट - कामाचं मापदंड की प्रतिमा उभारणी?*

शिंदे यांनी PPE किट घालून काम केलं हे खरं... हा उल्लेख गोऱ्हे यांनी अभिमानाने केला. पण प्रश्न असा आहे राज्य चालतं ते PPE किटने की धोरणांनी?

प्रशासन चालतं ते निर्णयक्षमतेने, समन्वयाने आणि जबाबदारीने. PPE किट घालणं हे कामाचं मोजमाप नाही ते प्रतिमा उभारणीचं साधन आहे.

*अंधश्रद्धेचे आरोप - सत्य की निवडक उघड?*

गोऱ्हे म्हणतात, तुम्ही श्रद्धेच्या नावाखाली काय करत होतात, आम्हाला माहीत आहे. मग जर इतकं माहीत होतं, तर तेव्हा का गप्प बसलात? तेव्हा सत्ता होती म्हणून मौन, आता सत्ता बदलली म्हणून आरोप?

हे तत्त्वनिष्ठ नाही हे परिस्थितीनुसार बदलणारं राजकारण आहे.

*“ट्रोल होईल” - धाडस की आधीच तयार केलेलं कवच?*

मला ट्रोल केलं जाईल असं आधीच सांगणं म्हणजे धाडस नाही. ते आहे आधीच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न.

मग नंतर येणारी प्रत्येक टीका सत्यावर हल्ला म्हणून मांडता येते. हा राजकीय बचावाचा जुना फॉर्म्युला आहे.

*कविता - वास्तव कोणावर लागू पडतं?*

गोऱ्हे म्हणतात, उद्धव ठाकरे यांची कविता त्यांनाच लागू पडते. पण जनतेला प्रश्न पडतो भूमिका बदलणाऱ्यांना कविता लागू पडते, की भूमिका टिकवणाऱ्यांना?

जे सोबत होते, तेच दूर गेले. जे लाभ घेत होते, तेच आज टीकाकार झाले. मग कविता कोणावर लागू होते, हे जनतेला सांगावं लागत नाही ती स्वतः समजते.

*निष्ठा की संधी?*

ज्या नेतृत्वाखाली गोऱ्हे यांना ओळख, पद, प्रतिष्ठा मिळाली त्याच नेतृत्वावर आज कठोर टीका? हा विचारसरणीचा बदल नाही हा राजकीय संधीचा बदल आहे. ज्या उद्धव ठाकरे यांनी राजकारणात संधी दिली, उपसभापतीसारखं मोठं पद दिलं त्यांच्यावरच निरोपाच्या दिवशी टीका?

हा विरोधाभास नाही... ही राजकीय कृतघ्नतेची क्लासिक केस स्टडी आहे. कारण साधा प्रश्न आहे जर नेतृत्व इतकं चुकीचं होतं, तर त्या पदावर बसताना का आठवलं नाही?

आता पुन्हा आमदारकीचे डोहाळे लागलेत म्हणून निष्ठा दाखवायची आहे. म्हणून टीका उद्या समीकरण बदललं तर भूमिका बदलणार नाही याची खात्री कोण देणार?

*सत्य की स्वतःचं समर्थन?*

संपूर्ण भाषणाचा गाभा पाहिला, तर एक गोष्ट स्पष्ट दिसते ही टीका उद्धव ठाकरे यांच्यावर कमी आणि स्वतःच्या बदललेल्या भूमिकेचं समर्थन जास्त आहे.

कारण आरोप उशिरा आठवले, प्रश्न निवडक विचारले आणि सत्य परिस्थितीनुसार वाकवलं.

*अंतिम प्रश्न जनतेचा आहे…*

राजकारणात पक्षांतर नवीन नाही. पण त्याला सत्य बोलण्याचं धाडस म्हणून विकणं हा खरा दुटप्पीपणा आहे.

जनतेला सगळं आठवतं कोण कुणामुळे उभं राहिलं आणि कोण कधी कोणत्या बाजूला गेलं. नीलम गोऱ्हे यांचं भाषण हे सत्याचा आवाज नसून, राजकीय विस्मरणाचं प्रदर्शन आहे.

जेव्हा भूमिका बदलते तेव्हा भूतकाळावर प्रश्न उपस्थित करणं सोपं असतं… पण त्या भूतकाळात आपणही होतो ही जाणीव जाणीवपूर्वक विसरणं हेच खरं ढोंग आणि दुटप्पीपणा आहे.

थोडक्यात खाल्ल्या घरचे वासे मोजणे हा शब्दप्रयोग ज्या महान व्यक्तींना शोभून दिसतो त्यातल्या नीलमताई गोऱ्हे या फार वरच्या स्थानी आहेत.

जय महाराष्ट्र.

२६ मार्च २०२६

✍🏻सचिन नंदकुमार चोरगे.
तालुका प्रसिद्धीप्रमुख,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण.

शब्दांच्या पलीकडले..!  #विश्वविजेता  #भारत 🇮🇳❤️मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!
08/03/2026

शब्दांच्या पलीकडले..!

#विश्वविजेता
#भारत 🇮🇳❤️
मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडनाका शाखा व चिपळूणचा महाराजा  तर्फे सालाबाद प्रमाणे उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आल...
06/03/2026

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडनाका शाखा व चिपळूणचा महाराजा तर्फे सालाबाद प्रमाणे उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त शाखा वडनाका (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित
मोफत हाडांची कॅल्शीयम व घनता (BMD) तपासणी शिबीर घेण्यात आले.
हे शिबीर एकविरा देवी मंदिर, वडनाका, चिपळूण येथे पार पडले. या शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला. गरजू नागरीक व रुग्णांनी शिबीरात भाग घेतला.

यावेळी उपस्थीत नवनिर्वाचीत नगरसेवक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तसेच आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले.

यावेळी नगरसेवक निहार कोवळे म्हणाले की, मी लहानाचा मोठा वडनाक्यातच झालो. इथल्या शाखेची शिवजयंती ही माझ्या जन्मा अगोदरपासून आहे. लहानपणापासूनच शाखेची ओढ आणि मंडळाचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम यांचा माझ्या जीवनाच्या घडामोडीवर खूप मोठा परिणाम झाला आणि ह्याच संस्कारात वाढलो. आता हाच वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू.

नगरसेविका नसरीन खडस म्हणाल्या, रयतेचा राजा, शिवाजी महाराज यांची आपण जयंती साजरी करत आहोत. मी गेली चाळीस वर्षे आपली शिवजयंती जवळून पाहत आहे. आपण सर्व एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येवून आनंदात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करत आहात. शिवाजी महाराजांचे धैर्य, शोर्य, नितिमत्ता आणि निर्णयक्षमता हे गुण आपण आत्मसात करून पुढे जावूया. महाराजांची सर्व धर्मसमभाव ही शिकवण आपण सर्वांनी जोपासूया. मंडळाच्या कोणत्याही सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमास माझे नेहमीच पाठबळ असेल, गुण्यागोविंदाने आपण असे उपक्रम नेहमीच घेत रहा.

नगरसेवक अजय भालेकर म्हनाले की, शिवसेना (उध्दव बाबासाहेब ठाकरे) पक्षाकडून नेहमीच तिथीनुसार कछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. त्यानिमितीने घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा सामान्य जनतेला फायदा होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वडनाका शाखेचे व चिपळूणचा महाराजा सार्वजनिक मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक. तसेच संघटना महत्वाची असून, सातत्य देखील महत्वाचे आहे. हे सातत्य राखण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येता हे कौतुकास्पद आहे. बाळा कदम यांचे मार्गदर्शनाखाली मंड‌ळाचे कार्य उत्तमरित्या चालू आहे. मी जरी नगसेवक झालो असलो तरी ती तुम्हां सर्वसारखाच एक सामान्य शिवसैनिक आहे. मला शिवजयंती निमित्ताने बोलविले आपले सर्वांचे आभार.

नगरसेवक संजय गोताड म्हणाले की, गेली अनेक वर्षे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वडनाका शाखेमार्फत ही शिवजयंती साजरी होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या आयुष्याची सुरवात वडनाका येथूनच झाली आहे. वडनाका हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच बालेकिल्ला आहे. शिवसेनेची ८०% समाजकारण आणि २०% राजकारण ही शिकवण आम्ही आत्मसात केली. जयंती, उत्सवा निम्तित्त विविध उपक्रम घेणे, विविध आरोग्य शिबीरे घेणे हा सामाजिक कार्याचाच भाग. अशी शिबीरे मोफत घेवून खऱ्या अर्थाने समाजसेवा होय. एक सामान्य शिवसैनिक एक नगसेवक बनला ही शिवसेनीची ताकत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख
श्री. महादेव उर्फ ​​बाळा कदम म्हणाले. की, चिपळूणचा महाराजा सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष बंड्याशेठ पेडनेकर, संजय रेडीज, बंधू कदम, पिंट्या पवार आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते याचे आभार मानले. वडनाक्यातील शिवजयंती आम्ही लहानपासून पहात आलो आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी विविध उपक्रम साजरे केले जातात. तसेच महाराज मंडळाची टिम ही चिपळूणमध्ये डिझास्टर मॅनेजमेर मध्ये सध्या एक नंबरला आहे. याची दखल खुद्द चिपळूण प्रांत सोहबानी घेतली व कौतुक केले. पूर परिस्थिती असो किंवा कोणत्याही नैसर्गिक अडचणींमध्ये आपल्या मंडलाळाने नेहमीच मदतीचा हात देन्यात पुढाकार घेतला आहे.

बंधू कदम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना चिपळूण शहर अधिकारी श्री पार्थ जागुष्टे यांना देखील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी चिपळूणचा महाराजा अध्यक्ष प्रवीण पेंडणेकर, बंधू कदम, संजय रेडीज, राहुल गुरव, पिंट्या कोवळे, पिंट्या पवार, मंदार शिंदे, बाळा गुरव, पार्थ जागुष्टे, समीर राऊत, किशोर राऊत, निकु रतवा, नारकर साहेब, सिद्धेश गुरव, सुशांत गुरव, राजेश कदम, आयुष कुबडे, प्रणव कदम, आदित्य पेडणेकर, शुभम शिंदे, पियुष गुरव, पार्थ गुरव, चंद्रकांत कोवळे,अथर्व चव्हाण, रतन कोवळे आणि श्री सचिन चोरगे उपस्थित होते.

03/03/2026
सर्व कट्टर शिवसैनिक आणि तमाम हिंदू बंधू भगिनींना तसेच देशप्रेमी नागरिकांना होळी निमित्ताने मनापासून शुभेच्छा! जय महाराष्...
03/03/2026

सर्व कट्टर शिवसैनिक आणि तमाम हिंदू बंधू भगिनींना तसेच देशप्रेमी नागरिकांना होळी निमित्ताने मनापासून शुभेच्छा!

जय महाराष्ट्र!

27/02/2026
मराठी भाषा गौरव दिवस निमित्त सर्व मराठी बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज ( वि वा शिर...
27/02/2026

मराठी भाषा गौरव दिवस निमित्त सर्व मराठी बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज ( वि वा शिरवाडकर) यांचा जन्मदिवस. कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्या साहित्यातील अमूल्य योगदानाचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

Address

कोणतीही शिवसेना शाखा.
Chiplun
415605

Telephone

+917744971066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना युवासेना - चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवसेना युवासेना - चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ:

Share