Prayogbhumi- Shramik Sahayog

Prayogbhumi- Shramik Sahayog Prayogbhumi is an experimental learning centre started by Shramik Sahayog

A residential learning centre for children belonging from two tribal communities- Katkari and Dhangar.

आज जागतिक पर्यावरण दिनी प्रयोगभूमीच्या जंगलात वृक्षारोपण केले. वड, पिंपळ आंबा , बेहडा,फणस व रिठा या झाडांची रोपं लावली. ...
05/06/2025

आज जागतिक पर्यावरण दिनी प्रयोगभूमीच्या जंगलात वृक्षारोपण केले. वड, पिंपळ आंबा , बेहडा,फणस व रिठा या झाडांची रोपं लावली. तसेच आंबा बाटा, फणस बिया टाकल्या.

01/03/2025

आय टी आय च्या एन एस एस शिबिराचा अनुभव असा की मुले शारीरिक श्रमास लाजत, घाबरत नाहीत. असे संस्कार खरं तर सर्वच शिक्षण क्षेत्रातील मुलांवर व्हावेत. प्रयोगभूमीत झालेल्या शिबिराची बातमी लिंक मध्ये जोडली आहे.

प्रयोगभूमीत काल, परवा आणि तेरवा *क्रिएटिव्ह वॉल पेंटिंग वर्कशॉप* साजरा झाला. हा एक कृतीयुक्त आनंद सोहळा होता. तीन वर्षाप...
22/02/2024

प्रयोगभूमीत काल, परवा आणि तेरवा *क्रिएटिव्ह वॉल पेंटिंग वर्कशॉप* साजरा झाला. हा एक कृतीयुक्त आनंद सोहळा होता. तीन वर्षापासून सत्तर वर्षापर्यंतचे सारेजण या सोहळ्यात सहभागी झाले होते. भिंतीवर चित्रे काढण्यापासून शैक्षणिक साहित्य निर्मिती अशी अनेक कामे सर्वांनी केली. प्रख्यात चित्रकार, सह्याद्री कला विद्यालयाचे संस्थापक प्रकाश तथा पप्पादा राजेशिर्के आणि त्यांचे विद्यार्थी, कराड येथिल चित्रकार रियाझ शिकलगार तसेच शाहीन आणि स्नेहा यांनी आपल्या ब्रशद्वारे भिंतीना सजविले. छोट्या मुलांना देखिल सामिल करुन घेतले. ही कामे रात्री तीन तीन वाजेपर्यंत करतांना पप्पादांचा लाभलेला सहवास ऊबदार आणि प्रेरक होता. आमची भूमिका मदतनिसाची होती.

या वर्षीचा प्रयोगभूमी उत्सव आगळ्या-वेगळ्या स्वरूपात साजरा होत आहे. यावेळी हा कार्यक्रम तब्बल पाच दिवसांचा असेल. आपल्या स...
16/02/2024

या वर्षीचा प्रयोगभूमी उत्सव आगळ्या-वेगळ्या स्वरूपात साजरा होत आहे. यावेळी हा कार्यक्रम तब्बल पाच दिवसांचा असेल. आपल्या सोयीप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे अत्यंत प्रेमाचे आवाहन..

कुमारी साक्षी खरात विद्यार्थिनी मोहन विद्यालय व ज्युनियर कॉलेज आकले , तालुकास्तरीय वैयक्तिक स्पर्धा  19 वर्ष वयोगटात 100...
09/10/2023

कुमारी साक्षी खरात विद्यार्थिनी मोहन विद्यालय व ज्युनियर कॉलेज आकले , तालुकास्तरीय वैयक्तिक स्पर्धा 19 वर्ष वयोगटात 100 मीटर , 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. जरी मोहन विद्यालय व ज्युनियर कनिष्ठ महाविद्यालयात ती सध्या शिकत असली तरी ती प्रथम प्रयोगभूमीची विद्यार्थीनी आहे. खरच जेव्हा एखादा विद्यार्थी, विद्यार्थीनी असे नाव कमावतो तेव्हा मात्र आपले ज्या संस्थेने , शिक्षकानी शिकवलं त्यांचे डोळे पाणावून हृदय भरुन येइल हे मात्र खरे...
विठ्ठल निकम, वाडी केंद्र, कादवड

30/08/2023
श्रमिक सहयोगच्या अध्यक्ष पदी श्रुती सुर्वे(रेखा राणे) यांची निवड*'श्रमिक सहयोग' संस्थेच्या दि. १३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्य...
17/08/2023

श्रमिक सहयोगच्या अध्यक्ष पदी श्रुती सुर्वे(रेखा राणे) यांची निवड*

'श्रमिक सहयोग' संस्थेच्या दि. १३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड झाली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी श्रुती सुर्वे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी भार्गव पवार, कार्यवाह म्हणून सुषमा इंदुलकर आणि रवींद्र लवेकर, खजिनदार पदी प्रज्ञा जाधव तर सदस्य म्हणून डॉ. गुलाबराव राजे, दादासाहेब रोंगे, प्रकाश स. ग., जाफर गोठे यांची निवड करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या श्रुती सुर्वे या संस्थेच्या संस्थापक गटातील सदस्य आहेत. एक विदयार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांनी एस पी एम एज्युकेशन सोसायटी लोटे परशुराम आणि जी जी पी एस रत्नागिरी या शाळांमध्ये सेवा केली. इंग्लीश, मराठी या भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. चिपळूण मधील राष्ट्र सेवा दलामध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले. सन १९८४ मध्ये श्रमिक सहयोगची स्थापना करणाऱ्या युवा गटामध्ये त्यांचा समावेश होता. संस्थेच्या गेल्या ४० वर्षांच्या वाटचालीत त्या हिरीरीने व सातत्याने सहभागी आहेत.

श्रुती सुर्वे आणि इतर सर्व पदाधिकऱ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

11/07/2023

'चला वीज बनवूया'

दरवर्षी प्रमाणे प्रयोगभूमीतील पावसाळी संमेलन *शनिवार-रविवार दि. १२-१३ ऑगस्ट* २०२३ रोजी होणार आहे.
पाण्यावरील वीजनिर्मिती, मानव निर्मित व नैसर्गिक उर्जा स्त्रोतांचा परिचय, खेळ, गाणी, निसर्ग व जल विहार असा भरगच्च कार्यक्रम यावेळी असेल. यात साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असेल.
आपण सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन करीत आहोत.
कृपया त्वरित नावनोंदणी करावी.
संपर्क -अभिषेक तटकरी ९१३०५१५०४५,
मंगेश मोहिते ७७९६४४६५३५

*प्रयोगभूमी*
*श्रमिक सहयोग*, चिपळूण

08/06/2023

ह्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त BBC Marathi ने काही अशा व्यक्तींचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न केला ज्यांचा मार्ग महात्मा गांधींच्या 'खेड्याकडे चला' ह्या प्रेरणेतून येतो.

विषय होता, "Changemakers, Mahatma Gandhi यांच्या विचारांनी बदल घडवणारी माणसं."
जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आणि गांधीजींचे प्रयोग सत्यात उतरवणारी माणसं.

आपल्या 'प्रयोगभूमीची' नोंद ह्या मालिकेत घेतली गेली.

जरूर पहा आणि वाचा.
https://www.bbc.com/marathi/articles/cd173ek0lyjo


08/04/2023

*श्रमानुभव शिबीर*
( हात पाय आणि बुद्धी यांचं सहजीवन)

*नाव नोंदणीचे आवाहन*

चिपळूण येथील श्रमिक सहयोग संचलित *प्रयोगभूमी मध्ये* या अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तारखा: *दि. २९ एप्रिल ते १ मे* २०२३ (३ दिवस)
वयोगट: *वयाची कोणतीही अट नाही*
सहभाग मूल्य: मोठ्यांना ₹ १५००/-, लहानग्यांना ₹ ८००/-
काय काय असेल?:
* *रोज ३ तास शारीरिक काम*
* *रोज ३ तास बौद्धिक काम*
* *गाणी, नृत्य, खेळ, वनविहार आणि मौज मस्ती*

टीप:
* प्रवेश मर्यादित असल्याने त्वरित नाव नोंदणी करा.
* संपर्क -
शाहीन ९९६७३१४०८४
हृषिकेश ९४०३४५६४७६
अभिषेक ९१३०५१५०४५
Rajan Indulkar Shahin Indulkar Abhishek Tatkari Dadasaheb RongeLata PramaBhaskar Bhargaorao PawarSneha Bolade

Prayogbhumi - Shramik Sahayog has come up with this unique concept of "Shramanubhava Shibir" - a 3-day camp where you ca...
21/03/2023

Prayogbhumi - Shramik Sahayog has come up with this unique concept of "Shramanubhava Shibir" - a 3-day camp where you can learn and explore together how to compliment muscle power with creativity of the mind and intellectual capability of the brain. So let's come together, learn, work, exchange ideas and have fun!
Shahin Indulkar Rajan Indulkar Abhishek Tatkari Bhaskar Bhargaorao Pawar Dadasaheb Ronge Lata Prama Sneha Bolade

Address

Prayogbhumi, Near TRT, Kolkewadi
Chiplun
415604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prayogbhumi- Shramik Sahayog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prayogbhumi- Shramik Sahayog:

Share