17/11/2025
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री. अमितभाई शाह यांच्या अचूक रणनीतीमुळे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डाजींच्या प्रभावी संघटन सामर्थ्यामुळे भारतीय जनता पक्षाने देशभरात अपूर्व आणि अभूतपूर्व असा विस्तार साधला आहे. या ऐतिहासिक प्रवासात माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्य, समर्पण आणि नेतृत्व देखील तितकेच मोलाचे आहे.
२०१४ मध्ये १०३५ आमदारांपासून सुरू झालेली ही यात्रा, आज २०२५ मध्ये १६५४ आमदारांपर्यंत पोहोचली आहे!
ही केवळ आकड्यांची वाढ नाही, तर जनतेने विश्वासाने दिलेल्या जबाबदारीची शिक्कामोर्तब आहे. विकास, सुशासन आणि राष्ट्रप्रथम या तत्त्वांवर उभ्या असलेल्या भाजप सरकारने देशाच्या कोटी नागरिकांच्या मनात आपले स्थान अधिक दृढ केले आहे.
गरीब कल्याण, सामाजिक न्याय, पायाभूत सुविधा, राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सर्वसमावेशक विकास यांच्या आधारावर भाजपाने हरियाणा, बिहार, असम, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र यांसह अनेक राज्यांत कोट्यवधी जनतेचा विश्वास जिंकत सलग विजय संपादन केले.
हा प्रवास पुढेही विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार…
भाजप सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याच्या तत्त्वांवर सदैव ठाम!