12/11/2024
दिनांक : 12/11/24 रोजी दुपारी 12: 00 वा. 173 चेंबूर विधानसभा मतदार संघाच्या द्वारे SVEEP च्या माध्यमातून 10 BOOTH एकत्र असणाऱ्या ठिकाणी तेथील B L O च्या माध्यमातून त्या यादीतील 20 दुकानदार, सोशल वर्कर, पत्रकार, सायकल दुकानदार, सलून वाले , इस्त्री वाले,मेडिकल अशा लोकांपर्यंत पोचून त्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती झाली पाहिजे व जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचता येईलव मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे या उद्देशाने व या वर्षाचे ग्रीन इलेक्शन झाले पाहिजे ही संकल्पना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली
या मीटिंगला मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीस्तरीय निरीक्षक डॉ. हिरा लाल पटेल I A S साहेब यांनी उत्तम मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम घाटला म न पा शाळेत मुख्याध्यापक श्री. सुरेंद्र वाघ सर , मुख्याध्यापिका व नोडल ऑफिसर श्री. मदने साहेब, नोडल ऑफिसर श्रीम. गुरव मॅडम व SVEEP टीम उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रमात संपन्न करण्यात आला.