रविंद्र मनोहरे

रविंद्र मनोहरे My Official Page

01/07/2025
आज दि.15-6-2016 चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदूर्गम अश्या जिवती तालुक्यातील परम्परागत कृषि विकास योजना (सेंद्रीय शेती) मध्ये ...
15/06/2016

आज दि.15-6-2016 चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदूर्गम अश्या जिवती तालुक्यातील परम्परागत कृषि विकास योजना (सेंद्रीय शेती) मध्ये समाविष्ट येरमीयेसापूर या क्लस्टर मध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण पार पडले. या प्रसंगी श्री एम जी चौहान, ताकृअ, जिवती, श्री तुकाराम धुर्वे, सरपंच, श्री माणिकराव कन्नाके, पोलीस पाटील, श्री सोनवणे, बीटीएम, श्री पाटील, कृस आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकरी बंधूंना सेंद्रीय शेती, पाणी व्यवस्थापन, खरीप हंगामात राबवावयाची उत्पादकता वाढीचे तंत्र इ विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. - रविंद्र मनोहरे, प्रकल्प कृषि उपसंचालक, आत्मा, चंद्रपूर.

आज दि. ९-६-२०१६ रोजी बोथली, ता. सावली, जि. चंद्रपूर येथे सेंद्रिय शेती कार्यक्रमाची पाहणी करण्याकरिता भेट दिली. याप्रसंग...
09/06/2016

आज दि. ९-६-२०१६ रोजी बोथली, ता. सावली, जि. चंद्रपूर येथे सेंद्रिय शेती कार्यक्रमाची पाहणी करण्याकरिता भेट दिली. याप्रसंगी श्री कन्नाके , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सावली, कु. पी.एम. सोनटक्के, स.तं.व्य., मुल, बोथली गावचे श्री रामविजय गड्डमवार, सेंद्रिय शेती गट मार्गदर्शक, बोथली आणि सामदा गावातील योजनेतील सहभागी शेतकरी उपस्थित होते.
- रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, चंद्रपूर

आज दि. ९-६-२०१६ रोजी ग्रा.पं. बोरचांदली, ता. मुल, जि. चंद्रपूर येथे सेंद्रिय शेती कार्यक्रमाची पाहणी करण्याकरिता भेट दिल...
09/06/2016

आज दि. ९-६-२०१६ रोजी ग्रा.पं. बोरचांदली, ता. मुल, जि. चंद्रपूर येथे सेंद्रिय शेती कार्यक्रमाची पाहणी करण्याकरिता भेट दिली. याप्रसंगी कु. पी.एम.सोनटक्के, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, मुल, बोरचांदली गावचे शेतकरी मित्र श्री महेश कट्टमवार आणि योजनेतील सहभागी शेतकरी पुरुष व महिला उपस्थित होत्या.
- रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, चंद्रपूर

आज दि. ९-६-२०१६ रोजी ग्रा.पं. काटवन, ता. मुल, जि. चंद्रपूर येथे सेंद्रिय शेती कार्यक्रमाची पाहणी करण्याकरिता भेट दिली. य...
09/06/2016

आज दि. ९-६-२०१६ रोजी ग्रा.पं. काटवन, ता. मुल, जि. चंद्रपूर येथे सेंद्रिय शेती कार्यक्रमाची पाहणी करण्याकरिता भेट दिली. याप्रसंगी कु. पी.एम.सोनटक्के, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक, मुल, काटवन गावच्या शेतकरी मित्र श्रीमती उषा सिडाम आणि योजनेतील सहभागी शेतकरी पुरुष व महिला उपस्थित होत्या.
- रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, चंद्रपूर

आज दि. 8-6-2016 रोजी ता. राजुरा येथे तालुका स्तरीय खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री ...
09/06/2016

आज दि. 8-6-2016 रोजी ता. राजुरा येथे तालुका स्तरीय खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री घोडमारे, उविकृअ, श्री चिमलवार, ताकृअ, श्री वरभे, श्री पवार, सतंव्य, व मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

- रविंद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, चंद्रपुर.

आज दि. 8-6-2016 रोजी बोरडा ता. चंद्रपुर येथे आत्मा यंत्रणेमार्फत  प्रधानमंत्री कृषि सिंचन कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशि...
09/06/2016

आज दि. 8-6-2016 रोजी बोरडा ता. चंद्रपुर येथे आत्मा यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री कृषि सिंचन कार्यक्रम अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आणि हळद लागवड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी श्री येरगुडे, ताकृअ, डाँ विजय पाटील, कृषि शास्त्रज्ञ, प्रा. राहूल बघेले, कृषि शास्त्रज्ञ, उदयानविद्या शाखा, आ नि कृ म वरोरा, श्री काकडे, मंकृअ, श्री पांडुरंग आगलावे, प्रगतिशील शेतकरी, सौ. सरपंचा, श्री कामडी, सतंव्य, व बोरडा, निबाळा, चोरगाव, पिपळखुट, चेकनिबाळा ,दुधाळा , वलनी येथील मोठ्या प्रमाणात गावातील शेतकरी उपस्थित होते.

- रविंद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, चंद्रपुर

दि. १३-०५-२०१६ रोजी सायघाटा, त. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथील सेंद्रिय शेती कृषीभूषण शेतकरी श्री. शिवदास दाजीबाजी कोरे ...
14/05/2016

दि. १३-०५-२०१६ रोजी सायघाटा, त. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथील सेंद्रिय शेती कृषीभूषण शेतकरी श्री. शिवदास दाजीबाजी कोरे यांचे शेतास भेट दिली. केवळ ४ एकर शेती असूनही श्री कोरे यांनी आपल्या शेतावर संपूर्ण सेंद्रिय शेती पध्दतीचा अवलंब करून ते महिन्याला दिड लाख रुपयाचे निव्वळ उत्पन्न वर्षभर घेत आहेत. सेंद्रिय तूर डाळ, लाखोळी, ऊस, मिरची, हळद, भाजीपाला, फळे - आवळा, आंबा, इ. बहुविध पिके ते घेत असून त्यांचा पिक उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी आहे. शेतमालावर घरीच प्रक्रिया करून ते उत्पादनांची विक्री करीत आहेत. सोबतच त्यांचेकडे एक बैलजोडी आणि दोन गाई असून शेणापासून गांडूळ खत, व्हर्मीवाश, कंपोस्ट खत इ. चे उत्पादन करून ते परिसरातील शेतकऱ्यांना विक्री करीत आहे. तसेच त्यांच्याशेतावर भेट देणा-या शेतकऱ्यांना तेसेंद्रियशेतीबाबत मार्गदर्शन करीतआहे. कोरडवाहू, अल्प भूधारक शेतकऱ्यासाठी श्री शिवदासजी कोरे सारखे शेतकरी आदर्श आहेत.
~ Ravindra J. Manohare

खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन 'श्री अरविंदबाबू देशमुख सभागृह', काटोल येथे दि. २९-५-२०१५ रोजी करण्यात आले. या...
30/05/2015

खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन 'श्री अरविंदबाबू देशमुख सभागृह', काटोल येथे दि. २९-५-२०१५ रोजी करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. आशिषजी देशमुख, आमदार, काटोल विधानसभा निर्वाचन क्षेत्र यांचे हस्ते पार पडले. माजी कृषि मंत्री श्री रणजीतबाबू देशमुख यांच्या ६९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही कार्यशाळा मा. आमदार महोदयांच्या प्रेरणेतून आणि उत्स्फूर्त सहभागातून यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. लीलाताई चौरे, सभापती, पंचायत समिती, काटोल आणि प्रमुख मार्गदर्शक नागपूर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री विजय घावटे, माजी नगराध्यक्ष, काटोल श्री चरणसिंग ठाकूर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री दिनेश ठाकरे, राष्ट्रीय बागवानी मंडळाचे संचालक तथा महा-ऑरेंज चे अध्यक्ष श्री श्रीधर ठाकरे, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश धापके, डॉ. विनोद राऊत, डॉ. जोगदंड, डॉ. सतीश मून, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या डॉ. विनिता गोतमारे, डॉ, संध्या क्रांती, केंद्रीय निंबू वर्गीय फळ संशोधन केंद्राचे डॉ. आशुतोष बोरकुटे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत काटोल आणि नरखेड तालुक्यातील अंदाजे एक हजार शेतकरी सहभागी झालेत. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन द्वारे कापूस, सोयाबिन आणि संत्रा या पिकांचे लागवड तंत्र आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दि. १० एप्रिल २०१५ शुक्रवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता 'आमची माती आमची माणसं" या कार्यक्रमात "...
27/03/2015

दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दि. १० एप्रिल २०१५ शुक्रवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता 'आमची माती आमची माणसं" या कार्यक्रमात "महिलांसाठी कृषि क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी'' या विषयावर माझी मुलाखत प्रसारित होत आहे. कृपया अवश्य कार्यक्रम पाहून आपले अभिप्राय कळवावे, हि विनंती.
~ रवींद्र मनोहरे,
कृषि उपसंचालक, नागपूर
०९४२०९७१६३० (मो.)

आज दि २७-२-२०१५ शुक्रवार रोजी सायंकाळी ६:३० ते ७:०० वाजता दूरदर्शन सहयाद्री राष्ट्रीय वाहिनीवर "आमची माती, आमची माणसं" य...
27/02/2015

आज दि २७-२-२०१५ शुक्रवार रोजी सायंकाळी ६:३० ते ७:०० वाजता दूरदर्शन सहयाद्री राष्ट्रीय वाहिनीवर "आमची माती, आमची माणसं" या कृषि विषयक कार्यक्रमात "उन्हाळी पिकाचे पाणी व्यवस्थापन आणि शासनाच्या योजना" या विषयावर मुलाखत प्रसारित झाली. या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण उद्या दि. २८-२-२०१५ शनिवार रोजी सकाळी ६:०० वाजता याच वाहिनीवर होणार आहे. कृपया कार्यक्रम पाहून आपले अभिप्राय अवश्य द्यावेत, हि विनंती.
-
रविंद्र मनोहरे,
कृषि उपसंचालक, नागपूर
09420971630 (M)

दि.१६ फेब्रुवारी २०१५ सोमवार रोजी हिंगणा तालुक्यातील मांडवा (मारवाडी) या गावात शेतीनिष्ठ शेतकरी श्री बळवंत दडमल यांचे शे...
17/02/2015

दि.१६ फेब्रुवारी २०१५ सोमवार रोजी हिंगणा तालुक्यातील मांडवा (मारवाडी) या गावात शेतीनिष्ठ शेतकरी श्री बळवंत दडमल यांचे शेतात 'उन्हाळी पिकांचे पाणी व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजना' या विषयावर दूरदर्शन, नागपूर यांचे चमुद्वारे कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग पार पडले. याचे प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दि. २७-२-२०१५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता 'आमची माती, आमची माणसं' या कार्यक्रमात होईल.

Address

Chandrapur
442401,442402,442403,442404

Alerts

Be the first to know and let us send you an email when रविंद्र मनोहरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to रविंद्र मनोहरे:

Share