08/04/2026
आ. सुधीर मुनगंटीवार यांचा संसदीय आयुधांचा प्रखर दणका यशस्वी
नवीन चंद्रपूरसाठी १४४ कोटींचा भरीव विकासनिधी मंजूर
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण, दूरदृष्टीपूर्ण आणि नियोजनबद्ध विकासासाठी अहोरात्र झटणारे, ठाम नेतृत्व आणि अभ्यासपूर्ण मांडणीसाठी ओळखले जाणारे आमदार श सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि परिणामकारक प्रयत्नांना अखेर मोठे यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या संसदीय आयुधांच्या अचूक, प्रभावी आणि धारदार वापरामुळे नवीन चंद्रपूर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल रु. १४४,३८,३४,५७९/- इतक्या भरीव निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
गृहनिर्माण विभागाने दि. ३१ मार्च २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करून केवळ मंजुरीच नव्हे तर निधी वितरणाची प्रक्रिया देखील पूर्ण केल्याने आता नवीन चंद्रपूरच्या विकासाला प्रत्यक्ष गती मिळणार आहे. हा निर्णय म्हणजे केवळ आर्थिक मंजुरी नसून चंद्रपूरच्या भविष्याचा नवा आराखडा ठरणारा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
नवीन चंद्रपूर शहराचा विकास हा केवळ एक प्रकल्प नसून चंद्रपूरच्या वाढत्या शहरीकरणाला योग्य दिशा देणारी, नियोजनबद्ध विस्ताराची आणि आधुनिक पायाभूत सुविधांची पायाभरणी करणारी महत्त्वाकांक्षी संकल्पना आहे. या संकल्पनेला प्रत्यक्ष आकार देण्यासाठी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा, प्रभावी पत्रव्यवहार, तसेच ठोस आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत हा विषय जिवंत ठेवला.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच नगर विकास विभागाच्या दि. ३० जून १९९८ च्या आदेशान्वये नवीन चंद्रपूरसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयानेच पुढील विकासाची पायाभरणी झाली.
म्हाडामार्फत १३९१.७१ हेक्टर क्षेत्रात नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करून ४०.४१२ कि.मी. लांबीचे रस्ते, इरई नदीवरील पूल, सक्षम पाणीपुरवठा योजना, बाह्य विद्युतीकरण, सुसज्ज मलनिःसारण व्यवस्था आणि भूसंपादन यांसारखी मूलभूत व अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, या कामांना कालांतराने १४ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने रस्त्यांची दुरवस्था, पायाभूत सुविधांची झीज आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांचा प्रश्न गंभीर बनला होता.
याच पार्श्वभूमीवर आ. मुनगंटीवार यांनी या विषयाला केवळ प्रशासकीय चौकटीत न ठेवता थेट विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या प्रभावी आणि आक्रमक माध्यमातून उचलून धरले.
Sudhir Mungantiwar