Chandrapur Municipal Corporation

Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर शहर महानगरपालिका The Chandrapur Municipal Corporation has been established on 25th October 2011.

To make this city Clean and Magnificent and provide all facilities to the citizen", is the prime aspiration of Chandrapur Municipal Corporation. Chandrapur district comprises 15 talukas, namely Chandrapur, Ballarpur, Rajura, Bhadravati, Warora, Chimur, Nagbhid, Bramhapuri, Sindewahi, Mul, Sawali, Gondpipri, Korpana, Pombhurna and Jiwati. The Chandrapur Municipal Corporation provides great industri

al support and hence many cement factories like L&T (now UltraTech Cement), Gujarat Ambuja (Maratha Cement Works), Manikgarh, and ACC have been established in the district. The Chandrapur Municipal Corporation has the most efficient staff which are present 24X7 for the civil service.

 #ठोसअपशिष्टप्रबंधननियमावली2026चलिए जानते हैं कि ठोस अपशिष्ट प्रबंधन नियमावली, 2026 के अनुसार बड़े कूड़ा उत्पादक (Bulk W...
03/06/2026

#ठोसअपशिष्टप्रबंधननियमावली2026
चलिए जानते हैं कि ठोस अपशिष्ट प्रबंधन नियमावली, 2026 के अनुसार बड़े कूड़ा उत्पादक (Bulk Waste Generator) कौन होते हैं और इनके क्या मापदंड निर्धारित किए गए हैं।


💧 चंद्रपूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी महानगरपालिका प्रशासनाची विविध स्तरांवर प्रभावी उपाययोजना सुरू 💧उन्हाळ्याच्या पा...
26/05/2026

💧 चंद्रपूर शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी महानगरपालिका प्रशासनाची विविध स्तरांवर प्रभावी उपाययोजना सुरू 💧

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

✅ अमृत २.० अभियानांतर्गत ५३ MLD क्षमतेचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र व ०५ नवीन उंच पाणी टाक्यांचे बांधकाम प्रगतीपथावर

✅ शहरात ४४ नवीन हातपंप व ०१ नवीन ट्युबवेल कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू

✅ बंद पडलेल्या ३३२ हातपंपांची दुरुस्ती पूर्ण

✅ टंचाईग्रस्त भागांमध्ये १०७ सिंटेक्स टाक्यांची व्यवस्था

✅ महानगरपालिकेचे ११ व खासगी ०८ असे एकूण १९ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा

✅ विविध भागांत पाणपोई सुरू

नागरिकांना नियमित, स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

🚫 अवैध गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी पुढे या!💰 माहिती द्या, १ लाख रुपयांचे बक्षीस मिळवा!गर्भलिंग निदान करणे, सांगणे ...
26/05/2026

🚫 अवैध गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी पुढे या!
💰 माहिती द्या, १ लाख रुपयांचे बक्षीस मिळवा!

गर्भलिंग निदान करणे, सांगणे किंवा त्यासाठी प्रोत्साहन देणे हा कायद्याने दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा आहे. मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.

🔍 अवैध सोनोग्राफी केंद्राची माहिती पुराव्यासह दिल्यास:
✅ शासनातर्फे १ लाख रुपये बक्षीस
✅ चंद्रपूर मनपातर्फे २५ हजार रुपये बक्षीस

🤰 “डीकॉय” मोहिमेत सहभागी होणाऱ्या गर्भवती महिलांनाही शासनाकडून १ लाख व मनपाकडून २५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते.

📢 तक्रार कुठे कराल?
☎️ टोल फ्री : 104
☎️ हेल्पलाईन : 18002334475
🌐 www.amchimulgimaha.in
☎️ मनपा टोल फ्री : 18002574010
📱 WhatsApp : 8530006063

👧 “मुलगी वाचवा, समाज वाचवा”
अवैध गर्भलिंग निदानाविरोधात सजग नागरिक म्हणून पुढे या.

स्वच्छ परिसर, सुरक्षित आरोग्य आणि शाश्वत भविष्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाचे नियम पाळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.      ...
25/05/2026

स्वच्छ परिसर, सुरक्षित आरोग्य आणि शाश्वत भविष्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाचे नियम पाळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

♻️ स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत चंद्रपूरच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल…आज दिनांक २२ /०५/२०२६ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिक...
22/05/2026

♻️ स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत चंद्रपूरच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल…

आज दिनांक २२ /०५/२०२६ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये मा. आयुक्त महोदय श्री.अकुनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली Solid Waste Management Rules २०२६ संदर्भात विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीमध्ये नवीन SWM Rules २०२६ अंतर्गत शहरामध्ये प्रभावी कचरा व्यवस्थापन, स्त्रोत स्तरावर कचरा वर्गीकरण (Source Segregation), Bulk Waste Generators ची जबाबदारी, प्लास्टिक व विशेष कचऱ्याचे व्यवस्थापन तसेच स्वच्छ सर्वेक्षण अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नवीन नियमांनुसार आता प्रत्येक नागरिकाने घरगुती कचरा खालील 4 प्रकारांमध्ये वेगळा करणे आवश्यक आहे –
🟢 ओला कचरा
🔵 सुका कचरा
🔴 सॅनिटरी कचरा
⚫ विशेष / घातक कचरा

तसेच “No Segregation – No Collection” या संकल्पनेनुसार मिश्रित कचरा न देण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. नवीन नियमांमध्ये Polluter Pays Principle, डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम, Bulk Waste Generators साठी ऑन-साईट वेस्ट प्रोसेसिंग आणि पुनर्वापर (Recycling) यावर विशेष भर देण्यात आला आहे.

मा. आयुक्त यांनी नागरिकांना आवाहन केले की,
“प्रत्येक नागरिकाने घरातूनच कचरा वर्गीकरण करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. स्वच्छता ही केवळ महानगरपालिकेची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.”

♻️ “घराघरातून कचरा वर्गीकरण — स्वच्छ चंद्रपूरचे मजबूत पाऊल”
♻️ “Source Segregation करा, पर्यावरण वाचवा”

रामाळा तलाव परिसराची मान. आयुक्तांकडून पाहणीरामाळा तलाव येथे मृत जलचर (मासे) आढळून आल्याने संभाव्य आरोग्यविषयक समस्या नि...
22/05/2026

रामाळा तलाव परिसराची मान. आयुक्तांकडून पाहणी

रामाळा तलाव येथे मृत जलचर (मासे) आढळून आल्याने संभाव्य आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी चंद्रपूर मनपा आयुक्त श्री.अकुनुरी नरेश तथा उपायुक्त श्री. संदीप चिद्रवार यांनी तातडीने पाहणी केली.
यावेळी तलाव परिसरातील मृत जलचर (मासे) त्वरित काढुन संपूर्ण साफसफाई करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना स्वच्छता विभाग व अग्निशमन विभागाला देण्यात आल्या.

 #आला_उन्हाळा_आरोग्य_सांभाळाउष्माघातापासून बचाव करा...
01/05/2026

#आला_उन्हाळा_आरोग्य_सांभाळा
उष्माघातापासून बचाव करा...

शांती, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांना अभिवादन !बुध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…
01/05/2026

शांती, करुणा आणि प्रज्ञेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांना अभिवादन !
बुध्द पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
01/05/2026

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

Chandrapur Municipal Corporation Building
Chandrapur
442401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrapur Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrapur Municipal Corporation:

Share