07/05/2026
"थॅलेसिमिया संकल्प सप्ताह” निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन:
बुलढाणा, दि. ७ मे २०२६ :
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते सर व मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे जिल्हा परिचारिका प्रशिक्षण केंद्र बुलढाणा तथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने “थॅलेसिमिया संकल्प सप्ताह” निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीद्वारे थॅलेसिमिया / हिमोग्लोबिनोपॅथी या आजाराबाबत विविध घोषणांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. नागरिकांना या आजाराची माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच वेळेवर तपासणीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. थॅलेसिमिया प्रतिबंधासाठी विवाहपूर्व व गर्भधारणापूर्व तपासणीचे महत्त्व देखील उपस्थितांना सांगण्यात आले.
सदर कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, डॉ. मयुरी टेकाळे, डॉ. विश्वास खर्चे, डॉ. महेश गोरे, डॉ. आशिष गायकवाड, अध्यापिका शेळके मॅडम, अर्चना आराख, ज्ञानेश्वर गाडेकर, अमोल गिरी, गणेश गायकवाड तसेच परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे” या संकल्पनेतून जिल्हाभर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी थॅलेसिमिया प्रतिबंधासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.