18/12/2016
By chandrakant katkar आज आम्ही उपकृत झालो .
गझलरंगची सम्पूर्ण टीम वृक्षरोपणात सहभागी झाल्याने .
श्री प्रितेश संचेती याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा होत असतानाच बुलडाणा येथे काल #गझलरंग साठी आलेली पूर्ण टीम आम्हाला वृक्षारोपनासाठी लाभली हे आम्ही आमच्या पर्यावरण मित्र बुलडाणा चे आहोभाग्यच म्हणायचे .
झाले असे कि आम्ही प्रितेश च्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करीत असताना श्री आनंद संचेती यांच्या घरी चहासाठी गझलरंग ची सम्पूर्ण टीम आली होती . आम्ही लगेच त्यांचे स्वागत करून त्यांना उपक्रमात सहभागी होण्याची विंनती केली असता क्षणाचाही विलंब न लावता सगळे जण आमच्या उपक्रमात सहभागी होऊन झाड लावले . बुलडाणा येथे दि 17 /12/2016 रोजी गझलरंग कार्यक्रमात ज्यांनी उत्कृष्ट संचालन केले ते शाहीर श्री सुरेशकुमार वैराळकर , साहित्यिक श्री नरेंद्र लांजेवार सर , कवयित्री सुप्रिया जाधव , स्वाती शुक्ल , योगिता पाटील ,मनीषा नाईक ,क्रांती साडेकर ,पूजा फाटे ह्या उपस्थित होत्या .आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद व आभार कि आपण आमच्या विन्नतीस वेळेवर मान देऊन अगदी वेळेवर बोलावले असतानाही आमच्या उपक्रमात सहभागी झालात .
आम्ही उपकृत झालो .
त्यातच आमच्या देवेंद्र खोत यांनी तेथील झाडांची फुले तोडून पुष्प गुच्छ तयार केला त्यावर मी चटकन दोन ओळी तयार केल्या त्या अशा
#किती #निर्दयी #तू , #तोडले #फुलांना
#आता #हृदयी #तू , #जपशील #फुलांना ?
सर्वानी वाहवा करून दाद मिळाली .
प्रितेश ,तुलाही तुझा हा वाढदिवस सतत आठवणीत राहील .