पुस्तक घर

पुस्तक घर 📖 We Read वाचन चळवळ
📦पुस्तक वितरण
📚वैचारिक व दर्जेदार पुस्तके
🚪भारतभर घरपोच सेवा
WhatsApp On – https://wa.me/7066495828

https://wa.me/c/917066495828

सत्तांतर नि बनगरवाडी वाचल्यानंतर मला अनेकांनी व्यंकटेश माडगूळकर यांची आणखी कोणती पुस्तकं वाचावीत असा प्रश्न विचारला. खरं...
04/06/2026

सत्तांतर नि बनगरवाडी वाचल्यानंतर मला अनेकांनी व्यंकटेश माडगूळकर यांची आणखी कोणती पुस्तकं वाचावीत असा प्रश्न विचारला.

खरं सांगायचं तर माडगूळकर हे फक्त लेखक नाहीत तर ग्रामीण महाराष्ट्र, माणदेश, निसर्ग नि सामान्य माणसांचं जग शब्दांत जिवंत करणारे कलावंत आहेत. त्यांच्या लेखनात कृत्रिमता नाही, दिखाऊपणा नाही; आहे ती मातीची ओल, माणसांचं दुःख-सुख नि जीवनाकडे पाहण्याची एक विलक्षण दृष्टी.

We read मध्ये सवललतीत उपलब्ध आहेत….😌

https://wa.me/7066495828

सुरुवातीला ही 5 पुस्तकं नक्की वाचा. 😌📚

1.नागझिरा
वन्यजीवन, जंगल आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे. नागझिराच्या जंगलात वास्तव्यास असताना माडगूळकरांनी केलेली निरीक्षणं, पक्षी-प्राणी आणि जंगलाचं सूक्ष्म चित्रण इतकं जिवंत आहे की आपणही त्यांच्यासोबत जंगलात फिरत असल्याचा भास होतो. शिकाऱ्यापासून निसर्गप्रेमीकडे झालेला त्यांचा प्रवासही यात दिसून येतो.

2.माणदेशी माणसं
मराठी साहित्यातील अजरामर पुस्तकांपैकी एक. माणदेशातील सामान्य, गरीब, संघर्षमय आयुष्य जगणाऱ्या लोकांची व्यक्तिचित्रं यात आहेत. ही पात्रं काल्पनिक वाटत नाहीत; ती आपल्या आसपासचीच वाटतात. मानवी स्वभाव, दुःख, आशा आणि जगण्याची धडपड यांचं अत्यंत संवेदनशील चित्रण या पुस्तकात आढळतं.

3.उंबरठा
माडगूळकरांच्या लेखनातील मानवी नातेसंबंध, ग्रामीण जीवन आणि बदलत्या समाजाचं वास्तव अनुभवायचं असेल तर हे पुस्तक वाचायला हवं. त्यांच्या कथनशैलीतील साधेपणा आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी या पुस्तकात विशेष जाणवते.

4.वाघाच्या मागावर
हे फक्त जंगलातील साहसांचं पुस्तक नाही. वन्यजीवन, माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं समजून घेणारं पुस्तक आहे. प्राण्यांकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टिकोन, जंगलातील अनुभव आणि निसर्गाबद्दलची संवेदनशीलता वाचकाला विचार करायला भाग पाडते.

5. गावाकडच्या गोष्टी

ग्रामीण महाराष्ट्राचं खरंखुरं दर्शन घडवणाऱ्या कथा. गाव, तिथली माणसं, त्यांचे संघर्ष, त्यांचं हसू-आसू आणि जगण्याची तत्त्वज्ञानं या कथांमधून समोर येतात. गावाकडच्या जीवनाचा आत्मा समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचावं.

व्यंकटेश माडगूळकर यांना वाचणं म्हणजे नुसती कथा वाचणं नाही, तर एका काळाला, एका प्रदेशाला नि अस्सल माणुसकीला भेटणं आहे. सत्तांतर आणि बनगरवाडी आवडली असेल तर ही पाच पुस्तकं तुमच्या वाचनयादीत नक्की असली पाहिजेत. ❤️📖

मुळ किंमत-970₹
We Read- 795₹ घरपोच (शिपिंग फ्री)

सुटे सुद्धा बोलावू शकता ❤️

©️We Read ✍️

We Read सदर : Moin’s Recommendations 🌼📚मनाला भिडलेली, विचार करायला लावणारी आणि आवर्जून वाचावी अशी पुस्तकं. या सदरामध्ये ...
03/06/2026

We Read सदर : Moin’s Recommendations 🌼📚
मनाला भिडलेली, विचार करायला लावणारी आणि आवर्जून वाचावी अशी पुस्तकं.

या सदरामध्ये मला फार आवडलेली, प्रभाव टाकणारी नि इतरांनीही नक्की वाचावी अशी निवडक पुस्तकं सुचवली जातील. समाज, मानसशास्त्र, आत्मकथन, कादंबरी, विचार, विज्ञान अशा विविध विषयांमधील पुस्तकांचा यात समावेश असेल. फक्त लोकप्रिय पुस्तकं नाही, तर मनात घर करून राहणाऱ्या नि विचार बदलण्याची ताकद असलेल्या पुस्तकांची ही खास शिफारस असेल. 🌸

पुस्तक : पाचूचे बेट 🌸

We Read मध्ये उपलब्ध….❤️

225₹ घरपोच (शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828

कालखंड कोणताही असो, एखाद्या दर्यावर्दी खलाशाचं जीवन हे नेहमीच रोमांचकारी घटनांनी भरलेले असतं. दर्यावरच्या मोहिमेत प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठीचा एक नवीनच अनुभव असतो. आजच्या विज्ञानयुगात माहिती मिळवण्याची अनेक साधने हाताशी आहेत. अनेकानेक गोष्टींविषीच ज्ञान सहजपणे मिळू शकतं. त्यामुळे कदाचित या सागरी मोहीमा थोड्याफार सुकर झालेयत, अस आपण नक्कीच म्हणू शकतो. पण जर समजा , हा कालखंड अठराव्या शतकातील असेल तर? ज्यावेळेस माहिती मिळवण्याची साधनं तुटपुंजी होती. अगदी समुद्राच्या एखाद्या भागाची, एखाद्या बेटाची माहिती मिळवायची असेल तर त्या भागात भेट देऊन आलेल्या व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून राहावं लागायचं. त्या व्यक्तीने दिलेली माहिती ही परीपूर्ण असेलच अस ही नव्हतं.पुढे ती माहिती एकमेकांना सांगताना तिखटमीठ लावून सांगितली जायची. आणि मग त्या माहितीच्या गुढरम्य कहाण्याच बनून जायच्या.

` Typee ` ही पण एक गुढरम्य कहाणीच आहे. १८४२ मध्ये हर्मन मेलव्हिल हा खलाशी एका सागरी मोहिमेत सहभागी झाला. या प्रवासातील घटनांचे शब्दचित्र म्हणजे हे पुस्तक, ` Typee ` या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केलाय भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. पँसिफिक महासागरात मासेमारीच्या मोहीमेसाठी जहाजे उतरत. या मोहिमा अगदी चार - पाच वर्षे सतत चालत. या मुदतीचं वर्णन करताना लेखक म्हणतो, या मोहिमेत सहभागी झालेले कोवळे तरुण आपल्या आईचा निरोप घेऊन रवाना झाले ते पुन्हा परत आपल्या बंदरात आले त्यावेळी अर्धम्हातारे झाले होते. जहाजावरील सोयी- सुविधांच्या अभावी निर्माण झालेली गचाळ परिस्थिती, कधीकधी जहाजाला मिळालेला विक्षिप्त, हट्टी कप्तान आणि महिनोनमहिने दुर्लभ झालेल जमिनीच दर्शन यामुळे या सागरी मोहिमा म्हणजे एक नाईटमेर असत. लेखक हर्मन मेलव्हिल ` डॉली ` नावाच्या जहाजावर खलाशी म्हणून सहभागी होतो. ही मोहिम एवढी लांबते की जहाजावरील अन्नधान्य संपत येऊ लागतं, जहाजावरील खलाशांच मनोधैर्य डळमळू लागत. आणि अशा परिस्थितीत लेखक जहाजावरुन फरार होण्याचा निर्णय घेतो, जो फार धोकादायक निर्णय असतो. नुकूहेवा नावाच्या बेटावर त्यांचे जहाज थोड्या काळासाठी थांबले असताना लेखक त्या जहाजावरुन फरार होण्यात यशस्वी होतो. यात त्याला जहाजावरचा आणखी एक खलाशी ही सामील होतो, ज्याचं नाव असतं, टॉबी. आणि इथून सुरु होते ,त्यांची थरारक, ` फरार - सफर `. या प्रवासाच वर्णन लेखकाने बहारदार केलयं. समुद्राच्या लगत असणाऱ्या बेटावरचं हवामान, वातावरण, उंचच उंच टोकदार डोंगर, खोल दऱ्या, घनदाट जंगलाने व्यापलेला परीसर अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर साकारतो.

या बेटावरील रहिवासी तर खासचं. त्यांची पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारी जीवनशैली, त्यांची अगम्य भाषा आणि हो, त्यांच्या नरभक्षी असण्याच्या अफवा (?) शेवटी कितीही भिती वाटत असली , जीवघेणा धोका वाटत असला तरी या दोन फरार लोकांना या बेटावरच्या आदीम लोकांनाच धरून राहावं लागणार असतं. त्याप्रमाणे हे दोन फरार खलाशी त्यांच्या कल्पनेतही नसणारा असा अनपेक्षित धोकादायक प्रवास करून अखेरीस एका खोऱ्यात उतरतात....टैपी जमातीच्या खोऱ्यात. आणि ही टैपी जमात नरभक्षी म्हणून कुप्रसिद्ध असते. मग या दोन खलाशांना त्यांचा काय अनुभव येतो? ही सगळी कहाणी सांगण्यासाठी ते जिवंत कसे राहतात?सर्व दर्यावर्दी लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे हे टैपी लोक खरचं का नरभक्षी असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.

Typee हे पुस्तक म्हणजे लेखक हर्मन मेलव्हिल चा पोलिनीशीनय बेटावर घालवलेल्या चार महिन्यांचा ऐतिहासिक लेखाजोखा आहे की ज्यामध्ये हर्मन मेलव्हिल ने या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी वास्तवात घडल्या आहेत, असा दावा केलाय. १८४६ मध्ये पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकात वर्णन केलेल्या घटनांच्या सत्यतेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. हे पुस्तक म्हणजे कल्पनाविलास की वास्तविकता , यावर चर्चा घडू लागल्या होत्या. अगदी हर्मन मेलव्हिल नावाची व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे का? यावरही संशय घेतला जाऊ लागला होता. या वादळी चर्चा शिगेला पोहोचल्यावर ज्यावेळेस हर्मन मेलव्हिलची इतिहासकार म्हणून कारकीर्द धोक्यात येतीय अस वाटल्यावर , त्याने स्वतः त्याच्या डिफेन्स मध्ये एक निनावी लेख प्रकाशित करण्याचे ठरवले पण त्या आधीच या कथेची सत्यता सिद्ध करण्यासाठी लेखकाचा, त्याच्या फरार- मोहीमेतील दुसरा साथीदार, टोबी त्याच्या मदतीला आला. आणि त्याच्या साहाय्याने हर्मन मेलव्हिल ने Typee चा उत्तरार्ध, The story of Toby, A sequal of Typee लिहीला. त्यामुळे या पुस्तकाच्या सत्यतेविषयीचा उठलेला संशयाचा धुरळा खाली बसला. पुस्तकातील ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या कामाविषयीच्या नकारात्मक वर्णनावर पण काही वाचक नाराज होतेच, पण लेखक आपल्या त्या मतांवर ठाम राहिला.

एकुणच Typee हे एका अज्ञात संस्कृती चे छोटेखानी दर्शन घडवणारं पुस्तक ठरतं. एका आयुष्यात अनेक प्रकारच्या आयुष्याचे अनुभव देण्याची क्षमता पुस्तकात असते , मग ते अनुभव आपल्यासाठी काल्पनिक का असेनात . त्यापैकी Typee हे पुस्तक आहे. अनुवादाविषयी:: Typee या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केला आहे, भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. अनुवाद इतका सुंदर, ओघवता झाला आहे की आपण एक अनुवाद वाचतोय हे लक्षातच येत नाही.✍️❤️

©️ Rashmi Sasane ✍️

We Read सदर : विचारवंत 🧠📚समाज, विचार आणि परिवर्तन घडवणारे विचारवंतया सदरामध्ये समाज, राजकारण, शिक्षण, समता, धर्म, विज्ञा...
30/05/2026

We Read सदर : विचारवंत 🧠📚

समाज, विचार आणि परिवर्तन घडवणारे विचारवंत

या सदरामध्ये समाज, राजकारण, शिक्षण, समता, धर्म, विज्ञान आणि मानवी मूल्यांवर प्रभाव टाकणाऱ्या विचारवंतांच्या पुस्तकांचा आणि विचारांचा परिचय करून दिला जाईल. फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, भगतसिंग, पेरियार, मार्क्स अशा अनेक विचारवंतांच्या लेखनातून समाजाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते. 🌼

ओशो यांची 5 वाचनीय पुस्तके…❤️

मुळ किंमत-1235₹

We Read-995₹ घरपोच (शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828

मला अनेक जण नेहमी विचारतात, ओशो वाचायला सुरुवात कुठून करावी? अशा सर्वांसाठी ही काही महत्त्वाची पुस्तकांची यादी. 📚

ओशो वाचणे नि ऐकणे हा एक वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा अनुभव आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मी ओशो यांना वाचतोय, ऐकतोय नि त्यांच्या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. 🌿

काळाच्या कित्येक पावले पुढे जाऊन विचार करणारा हा माणूस खरोखरच विलक्षण होता. त्यांनी सतत समाजाला प्रश्न विचारायला शिकवलं, रूढ कल्पनांना आव्हान दिलं अन् माणसाला स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. 💙

आजही आपण अंधश्रद्धा, धर्मांधता आणि पूर्वग्रहांच्या विळख्यात अडकलेलो दिसतो. पण

क दशकांपूर्वी ओशोंनी यावर थेट नि धाडसी भाष्य केलं होतं. समाजाला जागृत ठेवण्याचं आणि विचार करायला भाग पाडण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं.

वैयक्तिकरित्या सांगायचं तर, ओशो वाचताना आतून खूप हलकं वाटतं. मनातील अनेक गोंधळ निवळल्यासारखे वाटतात. थोडी अधिक शांतता, थोडी अधिक स्पष्टता आणि स्वतःला समजून घेण्याची नवी प्रेरणा मिळते. ही भावना खूप सुंदर आहे… ⭐

📖 वाचनीय पुस्तके :

• एकेक पाऊल
• मी धार्मिकता शिकवितो, धर्म नाही
• नवी पहाट
• स्वतःचा शोध
• मृत्यू अमृताचे द्वार

तुम्ही ओशोंची कोणती पुस्तके वाचली आहेत?

तुमचा अनुभव नक्की सांगा. ❤️📚

संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारित काही वाचायचं असेल तर हे वाचा….❤️जोहार मायबाप जोहार….☘️285₹ घरपोच (शिपिंग फ्री)https:...
28/05/2026

संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारित काही वाचायचं असेल तर हे वाचा….❤️

जोहार मायबाप जोहार….☘️

285₹ घरपोच (शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828

संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारित “जोहार मायबाप जोहार” ही कादंबरी वाचून वाचली … नि खरं सांगायचं तर मन बराच वेळ शांत बसू शकलं नाही. मंजुश्री गोखले यांनी लिहिलेली ही कादंबरी फक्त एका संताची कथा सांगत नाही, तर त्या काळातील समाजव्यवस्था, अस्पृश्यतेची भीषणता, माणसामाणसांतील भेद आणि त्यामध्येही जिवंत राहिलेली निर्मळ भक्ती यांचा अत्यंत हृदयस्पर्शी प्रवास उभा करते. मला संत चोखामेळा यांच्याबद्दल फारच थोडी माहिती होती. काही अभंग माहिती होते, एवढंच. पण या कादंबरीने त्यांच्या आयुष्याचा इतका जिवंत आणि वेदनादायी पट डोळ्यांसमोर उभा केला की अनेक प्रसंग वाचताना नकळत डोळे पाणावले.

लहानपणी गावात संडास साफ करायला येणाऱ्या माणसांची एक अंधुक आठवण अजूनही मनात आहे. तेव्हा त्या गोष्टींचं गांभीर्य समजत नव्हतं, पण आज विचार केला की अंगावर काटा येतो. एक माणूस दुसऱ्या माणसाला इतकं हीन कसं समजू शकतो? फक्त जन्माच्या आधारावर कुणाला अस्पृश्य ठरवणारी मानसिकता किती क्रूर असेल याची जाणीव ही कादंबरी पुन्हा पुन्हा करून देते. लेखिकेने तो संपूर्ण काळ इतक्या ताकदीने आणि संवेदनशीलतेने उभा केला आहे की आपण त्या काळातच जगतोय असं वाटत राहतं.

चोखोबांचं रोजचं जीवन, समाजाकडून होणारे अपमान, मंदिराबाहेर उभं राहण्याची वेळ, पदोपदी होणारी अवहेलना… हे सगळं वाचताना मन सुन्न होतं. पण या सगळ्यापेक्षाही जास्त थक्क करणारं म्हणजे त्यांच्या मनात कुठेही द्वेष नाही. कटुता नाही. फक्त विठ्ठलावरची निरपेक्ष, निस्सीम भक्ती. विठ्ठलाचा हार चोरल्याचा आरोप असो किंवा समाजाने दिलेल्या असंख्य जखमा चोखामेळा प्रत्येक वेळी भक्तीतूनच उभे राहतात. म्हणूनच कदाचित त्यांचे अभंग आजही थेट मनाला भिडतात.

दलित समाजात जन्म असूनही त्यांच्या अभंगातून दिसणारा विचार, अध्यात्म आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार मोठा वाटतो. “अविनाशी आत्मा” सारखे विषय त्यांनी ज्या सहजतेने मांडले आहेत, ते वाचताना आश्चर्य वाटतं. संत सहवास, नामदेवांसारख्या संतांनी केलेली साथ, सेवा, भक्ती आणि संघर्ष हे सगळं या कादंबरीत अतिशय जिवंतपणे आलं आहे.

ही कादंबरी वाचून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर अन्याय सहन करूनही मनात माणुसकी जिवंत ठेवण्याची ताकद. आणि म्हणूनच चोखामेळा फक्त संत म्हणून नाही, तर माणूस म्हणूनही फार मोठे वाटतात.

नमन… शतशः नमन चोखोबा तुम्हाला. ❤️🌿

Read ☘️

We Read सदर : शिक्षणयात्रा 📚पुस्तक-1 : शिक्षक, पालक नि विद्यार्थ्यांसाठी आज 2 खूप सुंदर नि विचार बदलणारी पुस्तके सुचवतोय...
24/05/2026

We Read सदर : शिक्षणयात्रा 📚

पुस्तक-1 :

शिक्षक, पालक नि विद्यार्थ्यांसाठी आज 2 खूप सुंदर नि विचार बदलणारी पुस्तके सुचवतोय… 🌸📚

ही दोन्ही पुस्तके वाचल्यानंतर शिक्षणाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला.

दोन्ही पुस्तके We Read मध्ये सवलतीत उपलब्ध आहेत 🌸

645₹ घरपोच (Shipping Free)
https://wa.me/7066495828

खरं शिक्षण म्हणजे फक्त गुण, परीक्षा नि पाठांतर नसतं… तर मुलांनी आनंदाने शिकणं, विचार करणं अन् स्वतःला ओळखणं हे जास्त महत्त्वाचं असतं हे या पुस्तकांमधून आपल्याला समजतं. 🥰

पहिलं पुस्तक आहे - खऱ्या शिक्षणाच्या शोधात’ ❤️

या पुस्तकात जगातील वेगवेगळ्या देशांतील खास शाळांची माहिती आहे. काही शाळा मोठ्या शहरांत आहेत, काही निसर्गाच्या कुशीत आहेत, तर काही गरीब मुलांसाठी काम करतात. पण या सगळ्या शाळांमध्ये एक गोष्ट समान आहे — मुलांना प्रेम, स्वातंत्र्य आणि आदर दिला जातो. मुलांवर फक्त अभ्यासाचं ओझं टाकण्याऐवजी त्यांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि आनंदाने शिकायला शिकवलं जातं. हे पुस्तक प्रत्येक शिक्षक आणि पालकांनी नक्की वाचावं असं आहे. 🌿

दुसरं पुस्तक आहे - जे. कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स’
🌼

जे. कृष्णमूर्ती हे जगप्रसिद्ध विचारवंत होते. त्यांना वाटायचं की शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाही, तर चांगला माणूस बनणं आहे. त्यांच्या शाळांमध्ये मुलांना निसर्गात शिकवलं जातं, संगीत, कला, चर्चा आणि आनंदातून शिक्षण दिलं जातं. मुलांना भीती न दाखवता प्रेमाने वाढवलं जातं. या पुस्तकातून भारतातील वेगवेगळ्या कृष्णमूर्ती शाळांची सुंदर ओळख होते आणि शिक्षण किती सुंदर असू शकतं हे जाणवतं. ❤️

ही दोन्ही पुस्तके प्रत्येक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी आयुष्यात एकदा तरी नक्की वाचायला हवीत. 📖✨

दोन्ही पुस्तके We Read मध्ये सवलतीत उपलब्ध आहेत 🌸

645₹ घरपोच (Shipping Free)
https://wa.

©️Moin Humanist । We Read 🌸

We Read मध्ये पुन्हा उपलब्ध….🌼शहीद भगतसिंह : समग्र वाड्मय – संपादक दत्ता देसाई , मूळ दस्तऐवजांचा स्त्रोत प्रा. चमनलाल 🌸भ...
20/05/2026

We Read मध्ये पुन्हा उपलब्ध….🌼

शहीद भगतसिंह : समग्र वाड्मय – संपादक दत्ता देसाई , मूळ दस्तऐवजांचा स्त्रोत प्रा. चमनलाल 🌸

भगतसिंहचे आजवरचे सर्व उपलब्ध लेखन एकत्र आणणारा भारतातील एकमेव ग्रंथ ‘प्रखर देशप्रेम म्हणजे काय?’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे : भगतसिंह!

भारतीय उपखंडातील क्रांतिकारकांचा मेरुमणी : शहीद-ए-आझम भगतसिंह!! सर्व संकुचितपणाच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय ऐक्य व विश्‍वबंधुत्व प्रत्यक्षात साकार करू इच्छिणारा एक द्रष्टा... धर्म आणि धर्मांधता, जात आणि अस्पृश्यता, भाषा आणि साहित्य, प्रेम आणि नैतिकता, नास्तिकता आणि मानवता या सार्‍यांचा अत्यंत प्रगल्भ विचार करणारा एक युवक... स्वातंत्र्य संग्रामातील सर्व प्रवाहांवर आणि तमाम भारतीय जनतेवर प्रभाव टाकणारा आणि भारतीय क्रांतीचा कार्यक्रम मांडणारा कृतिशील विचारवंत... आजच्या समस्यांवर दहशतवाद नव्हे, तर समाजवादी क्रांती हेच खरे उत्तर आहे, असा ठाम विश्‍वास असलेला क्रांतिकारक... अशा भगतसिंहांची विविध रूपे आपल्या समोर येतात या समग्र वाङ्मयातून... आणि त्यांच्या प्रत्येक कृतीला असलेले वैचारिक अधिष्ठान, पाश्‍चात्त्य पार्श्‍वभूमीचे चिंतन आणि भारतीय समाजस्थितीचे मूलगामी विवेचन यांचा अजोड मिलाफ यांचे यातून दर्शन होते...♥️

~We Read 🌸✍️

We Read सदर : Moin’s Recommendations 🌼📚मनाला भिडलेली, विचार करायला लावणारी आणि आवर्जून वाचावी अशी पुस्तकं या सदरामध्ये म...
19/05/2026

We Read सदर : Moin’s Recommendations 🌼📚

मनाला भिडलेली, विचार करायला लावणारी आणि आवर्जून वाचावी अशी पुस्तकं
या सदरामध्ये मला फार आवडलेली, प्रभाव टाकणारी नि इतरांनीही नक्की वाचावी अशी निवडक पुस्तकं सुचवली जातील. समाज, मानसशास्त्र, आत्मकथन, कादंबरी, विचार, विज्ञान अशा विविध विषयांमधील पुस्तकांचा यात समावेश असेल. फक्त लोकप्रिय पुस्तकं नाही, तर मनात घर करून राहणाऱ्या नि विचार बदलण्याची ताकद असलेल्या पुस्तकांची ही खास शिफारस असेल. 🌸

पुस्तक-1 :

उपरे विश्व…..🌸

275₹ घरपोच (शिपिंग फ्री )
https://wa.me/7066495828

साधारणपणे दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच्या दुर्दम्य ईष्र्येपायी मानवी प्राण्याने पहिल्यांदा स्थलांतराची वाट धरली. कालांतराने या मानवाने टोकाच्या विपरित परिस्थितीवर मात करत अवघी पृथ्वी व्यापली. तो स्थलांतराचा सनातन प्रवाह सुरू आहे तो आजतागायत !

या प्रक्रियेतून जसा मानवी व्यथा-वेदनांचा पट विस्तारत गेला, तसाच मानवी संस्कृती-परंपरांचा, कल्पना-संकल्पनांचाही मनोहरी मेळ घडून आला. यातूनच प्रगतीच्या नवनव्या वाटा खुल्या झाल्या. मानवी प्रज्ञेचा अकल्पित विकासही घडून आला. म्हणजेच स्थलांतराने एकाच वेळी प्रगतीबरोबरच वेदनेचेही दान माणसाच्या पदरात टाकले. परंतु ज्या टप्प्यावर हा प्रवाह खंडित झाला, तिथे अधोगतीच्या थांब्याचीही नोंद इतिहासाने घेतली.

आज जग एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकात प्रवेश करत आहे. या टप्प्यावर देशोदेशी उफाळून येणाऱ्या कडव्या राष्ट्रवादाचे, संकुचित व्यापार-उदीम धोरणांचे, परधर्मद्वेषाचे, पर्यावरण बदलाचे, कोरोनासारख्या वैश्विक महासाथीचे, टोळीयुद्ध- दहशतवाद-लष्करी आक्रमणांच्या धोक्याचे मोठे आव्हान स्थलांतराच्या प्रक्रियेपुढे उभे आहे. या साऱ्या उलथापालथीचा साकल्याने मानवकेंद्री वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक होय.🌸

We Read 🌸

We Read सदर : लैंगिक जाणीवा 🌸या सदरामध्ये लैंगिक शिक्षण, सुरक्षितता, शरीरजाण नि जबाबदार समज यासंबंधित दर्जेदार पुस्तकांच...
18/05/2026

We Read सदर : लैंगिक जाणीवा 🌸

या सदरामध्ये लैंगिक शिक्षण, सुरक्षितता, शरीरजाण नि जबाबदार समज यासंबंधित दर्जेदार पुस्तकांचा परिचय करून दिला जाईल. योग्य वाचनातून गैरसमज दूर करून सजग नि निरोगी विचारांची जडणघडण करण्याचा हा प्रयत्न आहे.🌼

पुस्तक - 1 :

प्रेम स्पर्श आणि आकर्षण
लेखक-निरंजन घाटे ✍️

आपण वागतो ते व तसं का वागतो, ह्याचा वेगवेगळ्या शास्त्रशाखांनी आणि समाजशास्त्रज्ञांनी १९७० नंतरच्या काळात सखोल अभ्यास केला आहे. पाश्चात्त्य देशात तो जनताभिमुख करणारी अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. अतिशय सोप्या-सुलभ भाषेत ती मानवी वर्तणुकीचं कोडं उलगडून दाखवतात.

त्यातून ज्या गोष्टी स्पष्ट होतात, त्यावरून जरी प्राण्यांची वर्तणूक ही उत्क्रांती तत्त्वांच्या साहाय्यानं स्पष्ट करून सांगता येत असली, तरी मानवी वर्तणूक पूर्णपणे उत्क्रांतिवादाचा आधार घेऊन उकलता येत नाही. ह्याचं कारण म्हणजे, माणूस हा मूलतः प्राणी असला, तरी त्याच्या वर्तणुकीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक प्राण्यांमध्ये असत नाही. तो म्हणजे संस्कृती. फार थोडे स्त्री-पुरुष संस्कृतीची बंधनं तोडून, सामाजिक दबावाला दाद न देता त्यांचं आयुष्य - विशेषतः सार्वजनिक आयुष्य - जगू शकतात. त्यामुळे मानवी वर्तणुकीचा विचार करताना संस्कृती हा घटक विचारात घ्यावाच लागतो.

मानवी संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे, सर्व माणसं एकच एक संस्कृती पाळत नाहीत. संस्कृती भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून बदलत असते. त्यामुळे एका भौगोलिक परिस्थितीतील मानवी समाजाला लागू पडत नाहीत. हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. प्राणी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीबाहेर जगू शकत नाहीत. त्यामुळे पेंग्विन उष्ण कटिबंधात आढळत नाहीत, तर वाघ-सिंह ध्रुवीय प्रदेशात आढळत नाहीत. ह्याउलट माणूस पृथ्वीवर ध्रुवीय प्रदेशांपासून विषुववृत्तापर्यंत सर्वत्र आढळतो आणि परिस्थितीनुरूप त्याची वर्तणूक बदलत जाते.

मानवी वर्तणुकीच्या मुळाशी प्राण्यांच्या वर्तणुकीचं नियंत्रण ज्यांच्यामुळे

होत असत, त्याच मूलभूत प्रेरणा आहेत. सर्व भावभावनांचा उगम त्या प्रेरणांशी जोडता येतो.

मराठीत एक ग्राम्य म्हण आहे. पोट आणि त्याखाली चार बोटं सरकलं की असलेला अवयव, ह्याभोवती जग फिरतं, असा तिचा अर्थ आहे. आजकाल उत्क्रांतीचा जो अभ्यास झालाय त्यातून हेच सत्य जगापुढे आलं आहे. सर्व प्राण्यांचा जगण्याचा मूळ हेतू वंशसातत्य हाच. केवळ प्राणीच नव्हे, तर सर्वच सजीवांचं जीवन ह्या एका मूळ प्रेरणेभोवती फिरतं. वंशसातत्यासाठी जगणं आवश्यक असतं, म्हणून अन्न मिळवण्याची धडपड, हे जीवनाचं सूत्र आहे. माणूस सोडून इतर सजीवांमध्ये ते उघड-उघड कळून येतं. माणसामध्ये ते संस्कृतीच्या पडद्याआड दडतं.

मराठीमध्ये हे स्पष्ट करून सांगणारी फार थोडी पुस्तकं आहेत. त्यातील बरीच अनुपलब्ध आहेत. विशेषतः १९९५ नंतर ह्यासंबंधी झालेल्या संशोधनाबद्दल मराठीमध्ये फार थोडी माहिती उपलब्ध आहे.

©️निरंजन घाटे ✍️

हे पुस्तक We Read मधून घरपोच बोलण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर Msg करा…❤️

355₹ घरपोच (शिपिंग फ्री)

https://wa.me/7066495828

https://chat.whatsapp.com/GflcupmFOtD5SExk8qsaU8s

We Read उपक्रमांतर्गत - पुस्तक घर…..🌼📚पुस्तकाचे नाव : रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गुढगाथा 🇮🇳 लेखक : रवि आमले पुस्तक घर ...
17/05/2026

We Read उपक्रमांतर्गत - पुस्तक घर…..🌼📚

पुस्तकाचे नाव : रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गुढगाथा 🇮🇳

लेखक : रवि आमले

पुस्तक घर किंमत : 300 (घरपोच – शिपिंग फ्री)

📞 ऑर्डरसाठी : 7066495828
🔗 https://wa.me/7066495828

RAW: भारतीय गुप्तचर संस्थेची गुढगाथा 🇮🇳

मी लॉकडाऊनच्या काळात हे पुस्तक वाचलं नि काय बोलू एकदा हातात घेतलं की सोडवतच नाही असं हे 293 पेजेसच पुस्तक आहे. आता धुरंधर मूव्ही आली तेव्हा या पुस्तकाची पुन्हा आठवण झाली नि म्हटलं लिहावं याबद्दल अन् हे लिहितोय.

तर मुळात का वेगळं आहे हे पुस्तक?

आपण सगळे जेम्स बाँड, मिशन इम्पॉसिबल पाहतो . CIA, Mossad, KGB, MI6 बद्दल शेकडो फिल्म्स, हजारो पुस्तकं आहेत. पण आपल्याच RAW बद्दल? जास्त काही विशेष असं नाही. मराठीत तर वेगळं सांगायला नको. काही हातांच्या बोटांवर मोजता येतील एवढी पुस्तकं. रवि आमले सरांनी हा अन्याय दूर करायचं प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.

हे फक्त कथाकथन नाही तर रवि आमले यांनी खरोखरच मेहनत घेतलीय. असंख्य संदर्भ वापरून हे पुस्तक लिहिलं आहे . प्रत्येक गोष्टीला पुरावे आहेत यामुळे आपल्याला कळतं की हे खरंच घडलं होतं.

1962 मध्ये चीनने आपल्यावर अचानक हल्ला केला. आपल्याला माहितीच नव्हती. Intelligence चा संपूर्ण अभाव होता. त्या लाजिरवाण्या पराभवानंतर समजलं की आपल्याला एक मजबूत परराष्ट्र गुप्तचर संस्था हवी आहे.
1968 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांच्या आदेशाने रामेश्वर नाथ काव यांनी RAW ची स्थापना केली. Intelligence Bureau होतीच पण ती मुख्यत्वे अंतर्गत सुरक्षेसाठी. परदेशात डोळे-कान हवे होते. RAW ही थेट पंतप्रधानांच्या आदेशाखाली काम करते - कोणत्याही मंत्रालयाखाली नाही.

या पुस्तकामध्ये असे ऑपरेशन्स आहेत की वाचताना अंगावर काटा येतो: 1971 बांग्लादेश युद्ध Operation Smash हे प्रकरण वाचून खरंच अभिमान वाटतो. RAW ने मुक्ती बाहिनीला कसं प्रशिक्षित केलं, पाकिस्तानमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी कसे गुप्त ऑपरेशन्स केले, त्यांची communications कशी खंडित केली - सगळं तपशीलवार लिहिलंय. पाकिस्तानला 13 दिवसात धूळ चारली ती फुकटच नव्हती. Operation Kahuta: पाकिस्तान गुपचूप अणुबॉम्ब बनवत होता. आपल्या एजंटांनी कहुता येथल्या अणु प्रकल्पावर कशी नजर ठेवली, कशी माहिती गोळा केली - खरंच धडधडवाणं वाचन होतं हे. काश्मीरमधील गुप्त युद्ध ऑपरेशन चाणक्य दहशतवाद्यांविरुद्ध अंधारात लढणारे आपले योद्धे. ज्यांची नावं कोणाला माहित नाहीत पण ज्यांच्यामुळे आपण रात्री निवांत झोपतो.

श्रीलंकेतील LTTE: 1980 च्या दशकात LTTE ला प्रशिक्षण, नंतर IPKF च्या वेळी गुंतागुंत - भारताच्या श्रीलंकेतल्या भूमिकेची inside story. सर्वात मोठा धक्का म्हणजे RAW मधलाच एक वरिष्ठ अधिकारी CIA साठी काम करत होता. भारताच्या सगळ्या गुप्त माहिती अमेरिकेला देत होता. 2004 मध्ये तो नेपाळमधून अमेरिकेला पळून गेला. हा प्रकार वाचून खरंच फार राग येतो.

काव साहेबांपासून ते नावाहीन एजंट्सपर्यंत - या सगळ्यांच्या कथा आहेत. त्यांना पदकं मिळत नाहीत, कुणी त्यांचं नाव घेत नाही, पण देशासाठी जीव धोक्यात घालतात. काहींना शत्रू देशात पकडलं गेलं, काहींनी आयुष्य गमावलं पण कोणी त्यांना ओळखत नाही.आपल्याच देशाच्या गुप्तचर संस्थेची, आपल्याच योद्ध्यांची अनकही गोष्ट वाचणं… एक वेगळाच अनुभव होता.

आज CIA ,Mossad वगैरे ला जगभर ओळखतात कारण त्यांच्यावर पुस्तकं आहेत, फिल्म्स आहेत. आता आपल्या RAW लाही ओळखायची वेळ आली आहे. रवि आमले यांचं खूप आभार की त्यांनी हे काम केलं.

थ्रिलर वाचायला आवडत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. आपल्याच देशाच्या अभिमानास्पद गोष्टी जाणून घ्या.

अदृश्य योद्ध्यांना सलाम 🙏🇮🇳

©️Moin Humanist ✍️

हे पुस्तक We Read मधून घरपोच बोलण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर Msg करा…❤️

300₹ घरपोच (शिपिंग फ्री)
https://wa.me/7066495828

https://chat.whatsapp.com/GflcupmFOtD5SExk8qsaU8s

Address

All Over
Buldana
443302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुस्तक घर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category