30/05/2026
सद्भावना सेवा समितीच्यावतीने आयोजित
श्री खाटुशामजी रेल्वे यात्रा व भागवत कथेचे आयोजन
- राधेश्याम चांडक
बुलडाणा :-
सद्भावना सेवा समिती द्वारा दि. ३० ऑगस्ट २०२६ ते दि. ०५ सप्टेंबर २०२६ पर्यंत श्री खाटुशामजी रेल्वे यात्रेचे आणि श्रीमद्भावगत कथेचे आयोजन केले आहे. कथा प्रवक्ता चित्रकुट येथील बालसंत श्री दिपशरणजी महाराज आहेत.
शहरातील अनेक शाम भक्तांचा समितीकडे खाटुशाम रेल्वे यात्रा काढावी असा आग्रह केला होता. म्हणुन खास लोकाग्रहास्तव रेल्वे यात्रेचे आयोजन समितीच्यावतीने केले आहे. मर्यादीत संख्या असल्याने जे प्रथम नोंदणी करतील त्यांना घेण्यात येईल व ना नफा ना तोटा या तत्वावर ७ दिवशीय रेल्वे यात्रेचे आयोजन केले आहे. असे आवाहन सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे. भागवत कथेचे मुख्य यजमान सौ. सरला सुरेशचंद्र गट्टाणी असुन या कथेमध्ये विविध प्रसंग व उत्सव साजरे केले जाणार आहेत. दि. ३१ ऑगस्ट २०२६ ला भागवत कथा महात्म्य, राजा परिक्षीत व शुकदेव कथा, दि.०१ सप्टेंबर २०२६ रोजी शिव विवाह, धृव चरित्र, दि. ०२ सप्टेंबरला राम जन्म, कृष्ण जन्म दि. ०३ सप्टेंबर २०२६ ला रुख्मीनी स्वंयवर, गोवर्धन पुजा, दि. ०४ सप्टेंबर २०२६ ला सुदामा चरित्र, श्री खाटुशामजीच्या पावन भुमीवर भागवत कथेचे आयोजन अत्यंत महत्वाचे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाचा अवतार खाटुशामला मानतात. अदभुत त्याग व मानवतेच्या कल्याणासाठी शिशदान अशी अदभुत कथा खाटुशामजीची आहे. कौरव-पांडवाच्या युध्दात जो हारेल त्यांच्याकडुन मी लढेल असे वचन आईला देवून त्याचे तंतोतंत पालन कलीयुगातही खाटुशामजी करीत आहेत. म्हणुन जे जिवनात हताशः होतात, प्रयत्न व परिश्रम करून यश पदरी पडत नाही, नैराश्य येते व हारतात असे भाविक भक्त खाटुशामजीला जातात कारण "हारे का सहारा खाटुखाम हमारा" असे सर्व भक़्त खाटुशामजीला जाऊन आपले गाऱ्हाणे मांडतात व ते पुर्ण होते अशी श्रध्दा भाविकांमध्ये आहे.
अल्पशः खर्चात सर्व भाविकांनी चहा, नाश्ता, दोन वेळेचे भोजन, निवास व्यवस्था सद्भावना सेवा समितीद्वारा करण्यात येणार आहे. मलकापूर स्टेशनवरून दि. ३० ऑगस्ट २०२६ दुपारी ११.३० वाजता रेल्वे द्वारा निघायचे आहे. दोन महिने आधी रेल्वेचे आरक्षण करावयाचे असल्याने भाविकांनी ताबडतोब नोंदणी करावे असे आवाहन समितीने अध्यक्ष भाईज़ींनी केले. संपर्कासाठी चंपालाल शर्मा, प्रकाशचंद्र पाठक, राजेश देशलहरा, तिलोकचंद चांडक, सुरेशचंद्र गट्टाणी, सिध्दार्थ शर्मा, उमेश मुंधडा, विजय व्यवहारे, सुभाष दर्डा, मधुकर गायके, पुरणमल शर्मा, मनमोहन शर्मा, लालाभाई माधवाणी यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा. यात्रा यशस्वी होण्यासाठी ही सर्व मंडळी विशेष परिश्रम घेत आहेत. पुढील वर्षी समितीच्या वतीने बद्रीकेदार येथे अश्या प्रकारच्या रेल्वेच्या आयोजनाचे प्रयत्न केले जाणार आहे व कथा आयोजित केली जाणार आहे. श्री खाटुशामजीच्या आसपास अनेक दर्शनिय स्थळे आहेत जसे शामकुंड, जीनमाता मंदिर, काजळ शिखर रोप वे ने, हर्षनाथ मंदिर, पुष्कर, सावित्रीमाता मंदिर रोप वे द्वारा, लोहगील तिर्थधाम, सालासर बालाजी, जयपुर इत्यादी सद्भावना सेवा समितीद्वारा आयोजित श्री खाटुशामजीच्या पावन भुमीवर श्रीमद्भावगत कथेचा आनंद घ्यावा व पाच दिवस निवास करून अध्यात्तमिक आनंद प्राप्त करावा असे भावपुर्ण आवाहन भाईजींनी केले.
Radheshyam Chandak
Deepsaran Ji Maharaj
Rajesh Deshlahra
Prakashchandra Pathak
Tilokchand Chandak
श्री सदभावना सेवा समिति, बुलढाणा
Rajesh Shobhagauri Suryakumar Madhawani
Umesh Mundada
Umesh Mundada
Umesh Mundada Umesh Kumar