31/12/2015
बोरगाव Recruitment कट्टा- 2015
Date-31 st December-2015
कृषी आयुक्तालयाच्या विविध विभागात कृषी सेवक पदाच्या 730 जागा
कृषी आयुक्तालच्या अधिनस्त विभागीय कार्यालयाअंतर्गत गट-क संवर्गातील कृषी सेवकांची पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे - 156 पदे, ठाणे - 181 पदे, नाशिक - 31 पदे, कोल्हापूर - ८६ पदे, औरंगाबाद - १०७ पदे, लातूर - २२ पदे, अमरावती - ९ पदे, नागपूर - १३८ पदे अशी विभागनिहाय पदसंख्या आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२ जानेवारी २०१६ आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदाची भरती (३३९ जागा)
बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज दिनांक 23 डिसेंबर 2015 ते 18 जानेवारी 2016 या कालावधीत करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज व अधिक माहिती http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये अधीक्षक पदाची भरती
जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट्रमध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तिंसाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत अधीक्षक (व्यवस्थापन सेवा) (वर्ग-1) (1 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.jnport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विकलांग व्यक्तींसाठी विशेष भरती मोहिम (11 जागा)
गेल (इंडिया) लिमिटेड, महारत्न पीएसयू हे सीनिअर इंजिनियर (इन्स्ट्रुमेंटेशन), सीनिअर ऑफिसर (मार्केटिंग), सीनिअर ऑफिसर (लॉ), सीनिअर ऑफिसर (सीसी), सीनिअर सुपरिटेंडन्ट (हिंदी), सीनिअर अकाऊन्टन्ट, सीनिअर सुपरिटेंडन्ट (एचआर), सीनिअर केमिस्ट, फोरमन (मॅकेनिकल), फोरमन (ईलेक्ट्रिकल), फोरमन (इन्स्ट्रुमेंटेशन) अशा एकूण 11 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 11 जानेवारी 2016 आहे. ऑनलाईन अर्ज तसेच अधिक माहिती www.gailonline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये हमाल पदाच्या 5 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील हमाल (गट-ड) पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 4 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या 700 जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळात इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 5 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती www.licindia.in या संकेतस्थळावर ‘careers’ च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, पुणेमध्ये विविध पदांच्या 728 जागा
अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिपत्याखालील गट-क संवर्गातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (रेडिओ यांत्रिकी) (191 पदे), पोलीस हावालदार (बिनतारी यंत्रचालक) (432 पदे), पोलीस हवालदार (वीजतंत्री) (52 पदे), पोलीस शिपाई (कर्मशाळा मदतनीस) (53 पदे) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज दि.18 डिसेंबर 2015 ते 6 जानेवारी 2016 या कालावधीत करावयाचे आहेत. अधिक माहिती व ऑनलाईन अर्जासाठी www.mahpolwireless.gov.in व https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
कामगार राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 485 जागा
कामगार राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (8 जागा), वरिष्ठ लिपीक (270 जागा), मल्टीटास्कींग स्टाफ (207 जागा) अशी एकूण 485 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटची तारीख 6 जानेवारी 2016 आहे. अधिक माहिती www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भंडारा येथे 6 जानेवारीला सैन्य भर्ती
भंडारा येथे आर्मीची दिनांक 6 जानेवारी 2016 रोजी सैन्य भरती आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.