Team Varsha Chaudhari

Team Varsha Chaudhari Team Varsha Chaudhari

प्रभागातील संभाजी पार्क येथे श्रावण सरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माझ्या सहयोगी नगरसेविका सौ ...
23/08/2026

प्रभागातील संभाजी पार्क येथे श्रावण सरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माझ्या सहयोगी नगरसेविका सौ लक्ष्मीताई यादव आणि महिला मोर्चा मधील सर्व भगिनींसोबत सहभागी झाले.

माजी आमदार, नागपूर नगरीचे माजी महापौर तथा सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संदीपजी जोशी यांना वाढदिवसाच्या मनःपू...
20/08/2026

माजी आमदार, नागपूर नगरीचे माजी महापौर तथा सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संदीपजी जोशी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि समाजसेवेच्या कार्यासाठी निरंतर ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

माझी प्रिय मैत्रिण, नागपूर महानगर महिला मोर्चा ची माजी महामंत्री Manisha Kashikar ला तिच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन त...
19/08/2026

माझी प्रिय मैत्रिण, नागपूर महानगर महिला मोर्चा ची माजी महामंत्री Manisha Kashikar ला तिच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन तिचा जन्मदिवस साजरा केला.

"हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा..." ​उत्कृष्ट वक्ता, दूरदर्शी राजकारणी आणि भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहार...
18/08/2026

"हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा..."

​उत्कृष्ट वक्ता, दूरदर्शी राजकारणी आणि भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी नमन. आपल्या ओघवत्या वाणीने आणि महान विचारांनी त्यांनी देशवासीयांच्या मनात कायमचे अढळ स्थान निर्माण केले. तुमची राष्ट्रसेवा आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.

18/08/2026

महिला सक्षमीकरण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या 'सक्षम उद्योजिका' रक्षा स्पेशल प्रदर्शनाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून संवाद साधला. महिलांच्या कलागुणांना आणि व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक भक्कम पाऊल पडत आहे.

माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या नक्षत्र कार्यालयात स्वातंत...
16/08/2026

माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या नक्षत्र कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम!

13/08/2026

ॐ नमः शिवाय! 🕉️

भक्ती, समृद्धी आणि पवित्रतेचा सण असलेल्या 'श्रावण महिन्याची' आजपासून सुरुवात होत आहे. भोलेनाथाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿

स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित 'हर घर तिरंगा' अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊया. भारताच्...
08/08/2026

स्वातंत्र्य दिनानिमित्त ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित 'हर घर तिरंगा' अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊया. भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर स्वातंत्र्यसैनिकांना कृतज्ञ अभिवादन करत, आपल्या प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवूया आणि तिरंग्यासोबतची आपली सेल्फी harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करून हा हॅशटॅग वापरूया. 🇮🇳
🇮🇳

१० हजार फॉलोअर्सचा टप्पा: जनतेच्या विश्वासाचा प्रवास! 🙏🏻🧿​महापालिका (NMC) निवडणुकीच्या प्रचारापासून सुरू झालेला हा प्रवा...
07/08/2026

१० हजार फॉलोअर्सचा टप्पा: जनतेच्या विश्वासाचा प्रवास! 🙏🏻🧿

​महापालिका (NMC) निवडणुकीच्या प्रचारापासून सुरू झालेला हा प्रवास आज १० हजार फॉलोअर्सच्या टप्प्यावर पोहोचला आहे. हा केवळ आकडा नसून, आपल्या सर्वांच्या अथांग विश्वासाची आणि प्रेमाची पावती आहे.
​जेव्हा हा फेसबूक पेज सुरू केला, तेव्हा मनात एकच ध्यास होता - जनतेपर्यंत पोहोचायचे, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या आणि एक प्रामाणिक जनसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडायचे.

​या डिजिटल माध्यमामुळे मला तुमच्यापर्यंत पोहोचणे, माझे काम, प्रभागाचा विकास आणि लोकोपयोगी उपक्रम थेट तुमच्यासमोर मांडणे शक्य झाले. तुम्ही दाखवलेले प्रेम, दिलेला पाठिंबा आणि वेळोवेळी केलेल्या सूचनांमुळे मला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक लाईक, कमेंट आणि शेअरमागे माझा थेट तुमच्याशी जोडलेला संवाद होता.

​एक नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करताना येणारा प्रत्येक दिवस मला नवीन शिकवण देतो. तुमच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता, आपल्या शहराच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी मी अशीच कटिबद्ध राहीन.
​हा प्रवास इथेच थांबत नाही, तर हा तर एका नवीन आणि उज्ज्वल प्रवासाचा आरंभ आहे!

​या संपूर्ण प्रवासात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या लाडक्या जनतेचे मनापासून आभार... असाच लोभ आणि साथ पुढेही असू द्या! ❤️

माझ्या प्रभाग क्र 16 मध्ये एल.आय.सी कॉलनी, येथे माजी आमदार श्री संदीपजी जोशी यांच्या स्थानिक विकास निधीतून सिव्हर लाईन ट...
05/08/2026

माझ्या प्रभाग क्र 16 मध्ये एल.आय.सी कॉलनी, येथे माजी आमदार श्री संदीपजी जोशी यांच्या स्थानिक विकास निधीतून सिव्हर लाईन टाकण्याच्या आणि आय-ब्लॉक परिसरात इंटरलॉकिंग पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.

यावेळी माझे सहयोगी नगरसेवक सर्वश्री लखन येरवार जी आणि सुनील दांडेकर जी, भाजपा प्रभाग अध्यक्ष गजानन निशितकर जी, सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.

Address

Bisrampur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Varsha Chaudhari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share