ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा

  • Home
  • India
  • Bhoom
  • ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा

ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, संस्कृतिक, ?

*शिवजयंती व ग्रामस्वराज फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त प्रश्नमंजुषा विजेत्यांचा भव्य गौरव सोहळा*वाल्हा, दि. १९ फेब्रुव...
20/02/2026

*शिवजयंती व ग्रामस्वराज फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त प्रश्नमंजुषा विजेत्यांचा भव्य गौरव सोहळा*
वाल्हा, दि. १९ फेब्रुवारी २०२६ :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच ग्रामस्वराज फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाल्हा येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख करून देणे, त्यांच्या सामान्यज्ञानात भर घालणे आणि भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना तयार करणे हा होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.स्पर्धेला विविध वर्गातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत आपली ज्ञानसंपदा सिद्ध केली.
प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हा सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरला. पालक व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भोरे सर तसेच संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते. ग्रामस्वराज फाउंडेशनचे पदाधिकारी श्री. विष्णू औताडे, श्री. विशाल काशीद, श्री. पंकज चोरगे, श्री. बाबुराव चोरगे, श्री. अण्णासाहेब चोरगे तसेच फाउंडेशनचे इतर सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.राजेंद्र चव्हाण तसेच येमाईवस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.श्रीमंत चोरगे व सदस्य श्री.युवराज शेळवणे यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवली.
मान्यवरांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच स्पर्धात्मक दृष्टीकोन विकसित करण्याचे महत्त्व पटवून दिले. “आजची स्पर्धा ही केवळ बक्षीस मिळवण्यासाठी नसून, भविष्यातील मोठ्या यशाची पहिली पायरी आहे,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले.
ग्रामस्वराज फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
ग्रामस्वराज फाउंडेशनकडून ग्रामीण भागात शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रम सातत्याने राबवले जात असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी उत्सुकता वाढल्याचे शिक्षकांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. संपूर्ण वातावरणात उत्साह, प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा जाणवत होती.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी व ग्रामस्वराज फाउंडेशनच्या सदस्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशा शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असा संकल्प व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करत ज्ञानाचा उत्सव साजरा करण्याचा हा उपक्रम ग्रामस्वराज फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे.

*वाल्हा येथे ग्रामस्वराज फाउंडेशनचा वर्धापन दिन व शिवजयंती  निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न*वाल्हा : ग्रामस्वराज फा...
17/02/2026

*वाल्हा येथे ग्रामस्वराज फाउंडेशनचा वर्धापन दिन व शिवजयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न*

वाल्हा : ग्रामस्वराज फाउंडेशन, वाल्हा यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाल्हा येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली. पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघ प्रकाशित "प्रश्नमंजुषा" पुस्तकाच्या आधारे घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या परीक्षेत प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना भरघोस शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र आणि आकर्षक ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात येईल. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि शिक्षणप्रती त्यांची जिज्ञासा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनामध्ये ग्रामस्वराज फाउंडेशनच्या सदस्यांनी अतिशय परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची सवय लावावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि ज्ञानाच्या नव्या वाटा खुल्या व्हाव्यात, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेचे नियोजन आणि अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे या सर्व स्तरांवर ग्रामस्वराज फाउंडेशनच्या शिलेदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघाचे सहकार्य लाभले. परीक्षेतील प्रश्नांच्या दर्जेदार निर्मितीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी योग्य अभ्याससामग्री देण्यासाठी संघाने विशेष योगदान दिले. यामुळे विद्यार्थ्यांना समतोल आणि विचारप्रवर्तक प्रश्नांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. या परीक्षेच्या आयोजनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाल्हा चे मुख्याध्यापक श्री. भोरे सर आणि संपूर्ण शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. परीक्षेची शिस्त, नियोजन आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षकांनी अतिशय उत्तमरीत्या पार पाडले.या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. परीक्षेच्या माध्यमातून त्यांना नवे ज्ञान मिळवण्याची संधी मिळाली, स्पर्धात्मक परीक्षांची सवय लागली आणि अभ्यासाच्या नव्या पद्धती आत्मसात करता आल्या. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या ग्रामस्वराज फाउंडेशनच्या सर्व शिलेदारांचे विशेष कौतुक आणि मनःपूर्वक आभार. संस्थेच्या नव्या पिढीला दिशा देण्याच्या कार्यास सलाम! भविष्यातही असेच शैक्षणिक उपक्रम सुरू राहतील.

🚩ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा यांचा शिवजयंती निमित्त स्तुत्य उपक्रम 🚩ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा यांनी शिवजयंतीच औचित्य स...
19/02/2024

🚩ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा यांचा शिवजयंती निमित्त स्तुत्य उपक्रम 🚩
ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा यांनी शिवजयंतीच औचित्य साधून स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी मुलांना लहान वयातच स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी व स्पर्धा परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असणारी भीती दूर होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर शंभर गुणांच्या परीक्षेच आयोजन करण्यात आलेलं होत. सदरील परीक्षा ही दिनांक सतरा फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा वाल्हा व जिल्हा परिषद शाळा येमाई वस्ती या दोन्ही शाळेत घेण्यात आली. सदरील परीक्षेत प्रत्येक वर्गातून जास्त गुण मिळवणाऱ्या तीन मुलांचे क्रमांक काढण्यात आलेले असून प्रत्येक वर्गातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामस्वराज फाउंडेशन मार्फत ट्रौफी व शालेय साहित्य बक्षीस देण्यात आलेल आहे. हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद शालेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी फाऊंडेशन वाल्हा यांचे पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, गावकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.💐

*ग्रामस्वराज फाउंडेशन वाल्हा तालुका भूम जिल्हा धाराशिव* च्या वतीने 26 जानेवारी 2024 वार शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथ...
26/01/2024

*ग्रामस्वराज फाउंडेशन वाल्हा तालुका भूम जिल्हा धाराशिव* च्या वतीने 26 जानेवारी 2024 वार शुक्रवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाल्हा तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करून त्यांना रजिस्टर,वह्या,पेन,पेन्सिल,पट्टी इ. बक्षीस देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी *स्पर्धा आयोजन करण्याचे हे तिसरे वर्ष* आहे इथून पुढेही गावातील विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्वराज फाउंडेशन ही संस्था अविरत कार्य करत राहील.आपल्या सर्वांच्या योगदानाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

शैक्षणिक वर्ष 2023-24 चालू होत आहे. त्या निमित्ताने सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी ग्रामस्वराज फाउंडेशन वाल्हा तर्फे गाव...
18/06/2023

शैक्षणिक वर्ष 2023-24 चालू होत आहे. त्या निमित्ताने सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी ग्रामस्वराज फाउंडेशन वाल्हा तर्फे गावातील गरजु व होतकरु 9 विद्यार्थ्यांना यात कॉलेज चे 3 विद्यार्थी दहावी उत्तीर्ण व शाळेतील 6 विद्यार्थी यांना शालेय साहित्य किट वाटप करण्यात आले यामध्ये दप्तर, रजिस्टर, वह्या, पेन, पेन्सिल, पट्टी इत्यादी साहित्य देण्यात आले.

👏अभिमानास्पद 👏गावातील युवा तरुण माउली चांगदेव चोरगे याची रत्नागिरी पोलीस पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन👏पुढील वाटचालीस खूप...
13/04/2023

👏अभिमानास्पद 👏
गावातील युवा तरुण माउली चांगदेव चोरगे याची रत्नागिरी पोलीस पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन👏
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

👏अभिमानास्पद 👏गावातील युवा तरुण बालाजी केरबा शेळवणे याची सोलापूर शहर पोलीस चालक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन👏पुढील वाटचा...
13/04/2023

👏अभिमानास्पद 👏
गावातील युवा तरुण बालाजी केरबा शेळवणे याची सोलापूर शहर पोलीस चालक पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन👏
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

*ग्रामस्वराज फाउंडेशन वाल्हा ता. भुम जिल्हा उस्मानाबाद* तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाल्हा...
22/02/2023

*ग्रामस्वराज फाउंडेशन वाल्हा ता. भुम जिल्हा उस्मानाबाद* तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाल्हा* आणि *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येमाईवस्ती* येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले📚📔✏️🖊️🇮🇳❤️

देशभर थैमान घातलेल्या कोरोना महामारी रोगाने पूर्ण देश भयभीत झाला आहे . सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात झगडत असलेल्या गाव...
21/05/2021

देशभर थैमान घातलेल्या कोरोना महामारी रोगाने पूर्ण देश भयभीत झाला आहे . सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात झगडत असलेल्या गावातील गरीब कुटुंबाना आधार देत सामाजिक बांधिलकी जपत आज वाला येथे ग्रामस्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून किराणा किट वाटण्यात आल्या..

ग्रामस्वराज फाउंडेशन वाला

काल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामस्वराज फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा आणि रक्त दान शिबीर पार पडले, य...
21/02/2021

काल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामस्वराज फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा आणि रक्त दान शिबीर पार पडले, या सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या सर्व ग्रामस्थ, प्रमुख पाहुणे आणि पदाधिकारी यांचे आभार. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात मिळालेला प्रतिसाद पाहून खुप आनंद झाला. याने नक्किच सर्व सभासदांचे मनोबल उंचावेल आणि नव्या जोमाने काम करण्याची उर्जा निर्माण होईल. गावातील विविध क्षेत्रातील सुशिक्षित तरुण एकत्र येऊन गावचा सर्वागीण विकास करण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत. यामधे शिक्षणावर जास्त भर देण्यात येणार आहे. गावातील विध्यार्थी यांना योग्य ते मार्गदर्शन कसे करायचे यावर या संस्थेचा भर असेल. गावातील गरजू आणि होतकरु विध्यार्थी यांना शालेय किट चे वाटप करण्यात आले आणि इथुन पुढे त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च हि संस्था करणार आहे. यामधे सुरुवातीस आठ विध्यार्थी निवडण्यात आले, पुढीलकाळात आणखीन विध्यार्थी निवडले जाणार आहेत. प्रत्येक विध्यार्थी स्वताच्या पायावर कसा उभा राहिलं यावर काम केले जाईल. प्रत्येक घरात एकतरी सुशिक्षित/नोकरदार असावा या हेतुने हि संस्था उभारण्यात आली आहे.
हि संस्था राजकारण विरहित संस्था म्हणुन काम करणार आहे त्यामुळे या संस्थेकडे कोणिही राजकीय फायद्यासाठी पाहु नये. रक्त दान शिबीरात खुप मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे खुप खुप धन्यवाद. पुढीलकाळात देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे.
परत एकदा सर्वांचे मनापासून आभार..

17/02/2021

सहकार्यातून समाजकार्याकडे

सस्नेह निमंत्रण
13/02/2021

सस्नेह निमंत्रण

Address

Bhoom
413504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ग्रामस्वराज फाऊंडेशन वाल्हा:

Share

Category