18/07/2022
बाल संजीवन छावणी
बाल आरोग्य शिबीर
आज दिनांक 17/7/ 2022 रोजी, विठू माऊली चँरीटेबल ट्रस्ट (बाल संजीवन छावणी जव्हार), समर्थन व श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रामीण रुग्णालय कासा तालुका डहाणू येथे कुपोषित मुलांचा आरोग्य तपासणी कॅम्प घेण्यात आला. त्यांचे उद्घाटन सन्माननीय डॉक्टर शिंदे सर, अध्यक्ष उंबरकर भाऊ, मान. डॉक्टर धोडी सर व स्वाती कलाल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या कॅम्प साठी संघटनेची डहाणूची टीम अध्यक्ष उंबरकर भाऊ, मंजी भाऊ, जानू डोकफोडे भाऊ किरण ताई, सुभाष कामडी भाऊ रमेश भोये भाऊ हे उपस्थित होते. या कॅम्पमध्ये आलेल्या मुलांची आरोग्य तपासणी सन्माननीय डॉक्टर दत्तात्रय शिंदे सर यांनी केली. तसेच आर बी एस के ची टीम डॉक्टर अरविंद राठोड सर, डॉक्टर किरण वरठा सर, डॉक्टर शरद पल्ले सर यांची मदत मिळाली. आज डहाणू तालुक्यातील कासा प्रकल्पातील एकूण 62 मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सँम श्रेणीतील 46 मुले, मॅम श्रेणीतील 12 मुले व नॉर्मल श्रेणीतील 04 मुले याप्रमाणे मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रथम छावणी टीमने सर्व मुलांची वजन/ उंची/लांबी घेऊन मुलांची श्रेणी काढली. या कॅम्पला एकूण 32 अंगणवाडीतील मुले आली होती. यामध्ये सीडीपीओ स्वाती कलाल मॅडम, सुपरवायझर, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती यांची मुले आणण्यासाठी खूप मदत मिळाली. सन्माननीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी झाल्यावर 05 मुलांचा एक्स-रे करण्यासाठी सांगितलेला आहे व 03 मुले ही
2DECO करण्यासाठी सांगितलेले आहे. RBSK टीम हजर असल्यामुळे तिथेच त्यांना ही मुलांची नोंद देण्यात आली. या कॅम्पला श्रमजीवी संघटना डहाणू तालुका व कासा आर एच चे मान. डॉ. धोडी सर व तांबे सिस्टर व त्यांच्या सर्व टीमने खूप मदत केली. तसेच सीडीपीओ मॅडम, सुपरवायझर, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. आरबीएसके च्या टीमने शिंदे सरांकडून आलेल्या सल्ल्याप्रमाणे व मुलांची तपासणी करण्यापर्यंत सर्वकाही मदत केली. मी मान. डॉ. शिंदे सरांचे विशेष आभार मानते सरांच्या घरी अडचन असताना सुद्धा ते या कॅमसाठी आले व त्यांचा अमूल्य वेळ, मोलाचं योगदान या कॅमसाठी त्यांनी दिले. मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देते व आभार मानते। 🙏🙏, तसेच डॉक्टर धोडी सर व तांबे सिस्टर, गायकवाड सिस्टर त्यांची पूर्ण टीम त्यांचेही मनापासून आभार व धन्यवाद 🙏🙏. सीडीपीओ मॅडम, सुपरवायझर, अंगणवाडी कार्यकर्ते, आशा कार्यकर्ते, यांचेही मनापासून धन्यवाद व आभार।श🙏🙏. तसेच आरबीएसके टीम सर्व डॉक्टरांचे मनापासून धन्यवाद व आभार 🙏🙏. श्रमजीवी संघटना डहाणू अध्यक्ष उंबरकर भाऊ व पूर्ण टीम यांचेही मनापासून धन्यवाद व आभार🙏🙏🙏 छावणी टीमचे वसंत वाजे, रवींद्र वाघ, सोमनाथ भोये व साधना भुसारा या सर्वांचे सुद्धा मनापासून आभार व धन्यवाद 🙏🙏. आज रोजी शेतीच्या कामाचा हंगाम असून सुद्धा वरील सर्व लोकांनी खूप मेहनत घेतली व हा कॅम्प यशस्वी केला म्हणून सर्वांचे पुन्हा एकदा आभार व धन्यवाद।।🙏🙏
सिता घाटाल
संपर्क: 96077 77816
विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, जव्हार ,
बाल संजीवन छावणी संचालिका .