20/01/2015
प्रति,
मा.सर्व समाज बांधव,
मा.महोद्दय / महोदया
शैक्षणिक, सामाजिक, व्यवसायीक, व राजकिय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व बंधू-भगिनींना सप्रेम नमस्कार,बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम – २००९ चे आपण सर्वांनी मनापासुन स्वागत केले. या अधिनियमाने समाजातील शिक्षणापासुन वंचित घटकाला शिक्षणाचा हक्क कायद्याने प्राप्त झाला. मुलींना-तसेच समाजातील सर्व स्तरातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे हा आग्रह फारपुर्वी महात्मा ज्योतिबा फुले व मातोश्री सावित्रीबाई फुले यांनी धरला होता. १ जानेवारी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून ज्ञानदानाच्या पवित्र कार्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली, रुजविली आणि वाढविली. ज्ञानगंगा समाजातील सर्व स्तरावर पोहचविण्याच्या कार्याबरोबरच अस्पृश्यता, बालविवाह, सतीची प्रथा, या अनिष्ठ रुढी परंपरा व विधवाविवाह, शेतकर्यांचे प्रश्न, सत्यशोधक समाज, प्लेगच्या रूग्णांची सेवा आदी विषयांवर या दोन महान विभुतींनी खडतर परिस्थितीत केलेले कार्य या छोट्याशा पत्र प्रपंच्यातुन मांडणे केवळ अशक्य आहे हे आपण जाणताच. महात्मा ज्योतिबा फुले व मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याची, योगदानाची आणि कष्टाची तुलना याच क्षेत्रात कार्य करणार्या इतर कोणत्याही मान्यवरांशी होऊ शकत नाही. किंबहुना फुले दांपत्याचे कार्य सर्वाहुन श्रेष्ठ असेच आहे. असे असुनही भारत मातेची ही दोन रत्ने भारतरत्न या पुरस्काराने मरणोत्तरही सन्मानित होऊ शकली नाहीत हि मोठी शोकांतिकाच आहे.
ज्ञानदानाचा त्यांचा पवित्र वसा आपण सर्व आपल्या सेवेतुन पुढे नेत आहात, याचा आम्हाला आनंदच आहे. महात्मा ज्योतिबा फुले व मातोश्री सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा हि आपल्या सर्वांच्याच मनातील तीव्र इच्छा. या भावना मा. शासनापर्यंत पोहचविण्यासाठी आपली साथ अत्यंत महत्वाची वाटते, आपणापैकी ज्यांना आमची भुमिका सकारात्मक वाटत असेल त्यांनी सोबतच्या फॉर्म द्वारे साथ द्यावी या अपेक्षेसह……….
आपण जी माहिती देत आहात त्या माहितीचा काही दुरुपयोग झाल्यास मी माळी परिवार त्यास सर्वस्वी जबाबदार राहील आपली माहिती हि गोपनीय व गुप्त ठेवली जाईल ती माहिती फक्त शासनास पत्र व्यवहार अथवा माहिती सादर करतानी देण्यात येईल.
आपला मी माळी परिवार
[email protected]
Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.