03/06/2026
📢 भारताची जनगणना 2026-27 : बीडकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे – जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांचे आवाहन
बीड, दि. 3 जून : भारत सरकारच्या जनगणना 2026-27 अभियानाला बीड शहरात प्रारंभ झाला असून नियुक्त प्रगणक (Enumerator) घराघरांत जाऊन नागरिकांची माहिती संकलित करीत आहेत.
या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय अभियानात सहभागी होत जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी स्वतः जनगणनेची माहिती प्रगणकांना देऊन नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. तसेच सर्व नागरिकांनी अचूक, सत्य आणि पूर्ण माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
🇮🇳 भारताची ही पहिली डिजिटल जनगणना असून ती दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी व निवासविषयक माहिती (House Listing and Housing Census) संकलित केली जात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येशी संबंधित सविस्तर माहिती गोळा करण्यात येणार आहे.
📋 जनगणनेदरम्यान कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय, निवासाची परिस्थिती, मूलभूत सुविधा तसेच विविध सामाजिक-आर्थिक बाबींची माहिती नोंदविण्यात येणार आहे.
🔒 नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल व तिचा वापर केवळ सांख्यिकीय व धोरणात्मक उद्देशांसाठीच केला जाणार आहे.
जनगणना ही देशाच्या विकास नियोजनाचा पाया आहे. चला, जबाबदार नागरिक म्हणून या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊया आणि जनगणना 2026-27 अभियान यशस्वी करूया.