वृक्ष संमेलन बीड 2020

  • Home
  • India
  • Bhir
  • वृक्ष संमेलन बीड 2020

वृक्ष संमेलन बीड 2020 The very first Tree Conference organized by Sayyadri Devarai in January in Beed district.

11/03/2020

वृक्षदिंडी व दुसरा काटेसावर महोत्सव
सह्याद्री देवराई परिवार व वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या तर्फे पुण्यात वृक्षदिंडी व दुसरा काटेसावर महोत्सव आयोजित करण्यात येत आहे...!

कधी:
दिनांक - 15 मार्च 2020 वेळ सायं 4 ते 7.

कुठे :
ठिकाण - कुंदन गार्डन मंगल कार्यालय, बाणेर,पुणे.

#वृक्षदिंडी || #काटेसावर_महोत्सव
#बाणेर || #पुणे
#सह्याद्रीदेवराई || #वसुंधराअभियान
||

बीड पालवणं येथे एक आगळ वेगळं अस वृक्षसंमेलन होत आहे १३ आणि १४ फेब्रुवारी ला ! चला वृक्ष संमेलनाला... #पाहिले_वृक्ष_संमेल...
13/02/2020

बीड पालवणं येथे एक आगळ वेगळं अस वृक्षसंमेलन होत आहे १३ आणि १४ फेब्रुवारी ला !
चला वृक्ष संमेलनाला...

#पाहिले_वृक्ष_संमेलन
#बीड_वृक्ष_संमेलन
#सह्याद्री_देवराई

नमस्कारजानेवारी २०२० मध्ये सह्याद्री देवराई या संस्थेतर्फे बीड यथे घेण्यात येणाऱ्या वृक्ष संमेलनात स्वयंकसेवक नोंदणी / R...
16/12/2019

नमस्कार

जानेवारी २०२० मध्ये सह्याद्री देवराई या संस्थेतर्फे बीड यथे घेण्यात येणाऱ्या वृक्ष संमेलनात स्वयंकसेवक नोंदणी / Registration as Volunteer Participation साठी खालील फॉर्म भरून देण्यात यावा.

Online Registration Form Link:
https://forms.gle/CZDCt6uwZaTYbWgS8

आपण देत असलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
आपल्या सुचनांचे स्वागत असेल. आपल्या सहकार्याने वृक्ष संमेलन यशस्वी होईल याची खात्री आहे.

जानेवारी २०२० मध्ये बीड यथे घेण्यात येणाऱ्या वृक्ष संमेलनात Registration as Volunteer Participation / स्वयंकसेवक नोंदणी साठी खालील फॉर्म ....

एक लावा आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ ! अभिनेते सयाजी शिंदेठळक मुद्दे• पहिले वृक्षप्रेमी संमेलन भरविणार; राज्यभर चळवळ...
15/12/2019

एक लावा आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ ! अभिनेते सयाजी शिंदे

ठळक मुद्दे
• पहिले वृक्षप्रेमी संमेलन भरविणार; राज्यभर चळवळ वाढवणार

• येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलन घेणार

पुणे : आपलं जगणं हे झाडांच्या ऑक्सिजनमुळे आहे. म्हणून या झाडांना जपलं, तर आपण जगू. एक आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ ही संकल्पना घेऊन लाखो झाडे लावणारे अभिनेते आणि
सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी पहिल्यांदाच बीड येथे पहिले वृक्षप्रेमी संमेलन घेत आहेत. त्याच्या नियोजनासाठी पुण्यात नुकतीच
बैठक झाली. या संमेलनाविषयी लोकमत ने त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न : पहिले वृक्षप्रेमी संमेलन बीडमध्ये घेणार आहात, त्यामागील संकल्पना काय?
आज झाडाला किंमत नाही, पैशांना किंमत दिली जात आहे. आपण बँकेत पैसे ठेवतो. परंतु त्या पैशांपेक्षा अधिक फायदा वृक्ष आपल्याला देतात. त्यामुळे हे माझ्या ध्यानात आले आणि अगोदर स्वत: काम
करायचे ठरवले. फक्त घरात बसून किंवा उपदेश करून निसर्गप्रेमी होता येत नाही, तर प्रत्यक्ष काम करायला हवे. त्यातून मग मी उजाड असलेले बीड येथील पालवन हे ठिकाण निवडले. तिथे लाखभर झाडं लावली आणि आता ते सर्वांनी पहावीत, यासाठी पहिले वृक्षप्रेमी संमेलन घ्यायचे ठरवले.येत्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलन घेणार आहोत.

प्रश्न : संमेलनाची रूपरेषा कशी असेल?
- बीड जिल्ह्यातील पालवन येथे मी गेल्या काही वर्षांमध्ये लाखभर झाडे लावली आहेत. तिथे पूर्वी सर्व उजाड होते. आता हिरवाई आहे. ते लोकांना दाखवायचे आहे. तिथे रॉक गार्डन करत आहोत.येथे
भरविण्यात येणाऱ्या संमेलनासाठी आम्ही विद्यार्थ्यांना बोलावणार आहोत. ते येतील आणि इथला निसर्ग पाहतील. संमेलनात भाषणबाजी नसेल. निसर्ग शिक्षण देणारे स्टॉल्स असतील. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थी जाऊन निसगार्ची माहिती घेतील. वृक्षसंमेलनासारखेच वृक्ष दिंडी, वृक्ष शाळा, वृक्ष जत्रा असे उपक्रम देखील असतील.

प्रश्न : सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपण काम करताय. पालवन येथील उपक्रमाला प्रतिसाद कसा आहे ?
- सध्या काही लोकं स्वखचार्ने काम करत आहेत. खूप थोडी लोक सोबत आहेत. सहभाग अधिक वाढला पाहिजे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात असे संमेलन घेणार आहोत. स्थानिक नागरिक, राजकीय लोक, उद्योजक आदींनी यात सहभागी होऊन ही निसगासाठीची
चळवळ वाढवायला हवी. प्रत्येकाने पाच झाडं लावून ती वाढवली पाहिजेत. त्या झाडांची गोष्ट इतरांना सांगितली पाहिजे. ज्याच्याकडे जास्त झाडं तो सर्वात श्रीमंत मानला पाहिजे.

प्रश्न : वृक्ष संमेलनासोबत विविध उपक्रम घेत आहात, त्या विषयी सांगा?
- झाड आपल्याला जगवतात. त्यामुळे आता प्रत्येक रूग्णालयात बाळ जन्माला आल्यानंतर त्यांना रोप दिलं पाहिजे. हे रोप देशी हवे. बोर, वड, पिंपळ, काटेसावर, कडूनिंब अशी रोपं द्यायला हवी. बाळाबरोबर त्या रोपाला वाढवलं पाहिजे. ते बाळ मोठं झाल्यावर इतरांनाही झाडाची गोष्ट सांगू शकेल. प्रत्येक शाळेत देखील विद्याथ्यार्चे एक झाड असले
पाहिजे. त्या विद्याथ्यार्ने ते झाड वाढवलं पाहिजे. मग सर्व परिसर हिरवाईने नटून जाईल. शाळांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

* वाढदिवसाला झाड लावा, या उपक्रमाची सुरवात कशी झाली?
- आई हे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. मी राजा असलो, तरी तिला मरणापासून वाचवू शकत नाही. आई आपल्याला जन्म देते आणि वाढवते. पण आईनंतर आपल्याला झाडच जगवते. त्यामुळे आपण
झाडांना जगवलं पाहिजे. झाडं लावली पाहिजेत. मी माझ्या आईच्या वाढदिवसाला बियांची तुला केली. तिच्या वजनाएवढ्या बिया रूजविण्याचा संकल्प केला आणि आईला सांगितले की, तू आता या
झाडांच्या रूपात आयुष्यभर सोबत असशील. झाडाच्या पानांमधील आवाजातून, पक्ष्यांच्या किलबिलाटातून, फुलांच्या सुगंधातून, फळांतून
तू मला भेटत राहशील. या निसर्गाच्या फुलण्यातून तुझं हसणं मला दिसेल. जिथे बी रूजेल तिथे तुझं रूप मला दिसेल. म्हणून प्रत्येकाने वाढदिवस झाड लावून या धरणीमातेला हिरवाईने नटवायला हवे.

सध्या आमचा नारा हा 'येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय दुसरं कोण, आमचा एकच पक्ष, तो म्हणजे वृक्ष, लिंबाच्या नावाने चांगभलं
अशा घोषणा विद्यार्थ्यांच्या तोंडी आल्या की, जनजागृती व्हायला वेळ लागणार नाही. झाड आपल्याला ऊर्जा देते, आँक्सिजन देते. जगण्याचे
बळ देते. त्यासाठी झाडे जगली पाहिजेत.

- सयाजी शिंदे, अभिनेते आणि वृक्षप्रेमी, वृक्ष संमेलन बीड येथील संमेलनाचे संयोजक.

- श्रीकिशन काळे, लोकमत.

सह्याद्री देवराई आयोजित पहिले वृक्ष संमेलन नियोजन बैठक काल पुण्यात पार पडली.पुणे आणि महाराष्ट्रातील ईतर भागातून आवर्जून ...
14/12/2019

सह्याद्री देवराई आयोजित पहिले वृक्ष संमेलन नियोजन बैठक काल पुण्यात पार पडली.पुणे आणि महाराष्ट्रातील ईतर भागातून आवर्जून आलेल्या अनेक वृक्षप्रेमी मित्रांनी आपली मतं व्यक्त केली.वृक्षसंमेलन बद्दल आपल्याला वेळोवेळी माहिती दिली जाईल.
आपल्या सहभागासाठी इमेल द्वारा संपर्क साधा - [email protected]

सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत "सह्याद्रि देवराई" वृक्षसंमेलन नियोजनासाठी बैठक.वृक्ष प्रेमी मित्रांनो आज पुण्यात नक्की भे...
13/12/2019

सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत "सह्याद्रि देवराई" वृक्षसंमेलन नियोजनासाठी बैठक.
वृक्ष प्रेमी मित्रांनो आज पुण्यात नक्की भेटुयात.

दिनांक - १३ डिसेंबर.
वेळ - सायंकाळ ५ ते ८ पर्यंत
स्थळ - पंडित भीमसेन जोशी सभागृह, बागुल उद्यान,सहकारनगर. पुणे.

Address

Palwan, Beed Sub-District
Bhir
414205

Alerts

Be the first to know and let us send you an email when वृक्ष संमेलन बीड 2020 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to वृक्ष संमेलन बीड 2020:

Share