MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation

MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation Mira Bhayandar is a city which has its own Historic value. It was an important port for business during past. As we all know that India was governed by British.

This port has seen some most important Historic Legends right from Alexander to Peshwas and some great kings who have travelled through this port. The city is surrounded by big mountains on both the side boundaries along with Arabian Sea guarding the west side of the city. The North side of the city is surrounded by Vasai (Basin) Creek. So is the city of Bhayandar Situated at the Heart of the Natu

re. British also came to Bhayandar but it was far time after as Bhayandar and Vasai were governed by Portuguese . Portuguese were the first one to rule on this part. But British also ruled over Bhayandar for quite some time. The example of British existence can be seen by the Railway Bridge over Vasai (Basin) Creek. A large estate of 3688 acres, exclusive of salt marsh was granted by deed dated 1870 to Ramchandra Laxmanji of Bombay, on a lease of 999 years, in the village of Ghodbunder, Bhayandar and Mira. The condition attaching to this grant were that the lessee should pay a yearly rent of Rs. 6790/-; that he should keep the embankments, dams, and sluic s in repair; that he should demand no rent from Inamdars; that he should demand only survey rates for Suti and Varkas lands; that he should keep boundary marks in repair; that he should pay Patil’’s and hereditary officers’ claims and allowances; that he should not interfere with the rights of way; that he should surrender land free of cost for the Bhayandar Railway Station; that he should give the Notice for the assignment of the lands; that he should not assign lands without leave; and that the salt marsh lands were liable for resumption if not reclaimed within twenty years. This estate has been the cause of much litigation, owing to an attempt of the leaseholder to levy from the yearly tenants one-half instead of one-third of the produce. The District court and the High Court on appeal (appeal 292 and 1880) have decided that the leaseholder’s claim to levy one-half is contrary to the custom of the country. (Source : Gazetteer Of The Bombay Presidency, Volume XIII, Part II, Chapter VIII)

The Devnar Estate include five villages : Devnar, Borla, Kirol, Chene and Varsava Borbhat . It was granted in perpetual lease to Mr. Dhakji Dadaji in 1809 on a rental of Rs. 5180. In addition to this a sum of Rs. 390/- is paid for lands held by husbandmen direct from Government. Only two of the villages Chene and Varsava Borbhat remain in the family of the original grantee. The other three have been sold to different buyers. (Source : Gazetteer Of The Bombay Presidency, Volume XIII, Part II, Chapter VIII)

मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर केली अ...
31/05/2026

मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषद ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर केली असून, दिनांक १८ मे २०२६ पासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने, दिनांक ०१ जून २०२६ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालयात आयोजित लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #अहिल्यादेवी_होळकर  #जयंती
30/05/2026

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#अहिल्यादेवी_होळकर #जयंती

आता मालमत्ता कर भरणे झाले आणखी सोपे!फक्त WhatsApp वर “Hi” मेसेज करा आणि काही मिनिटांत घरबसल्या मालमत्ता कर भरणा पूर्ण कर...
30/05/2026

आता मालमत्ता कर भरणे झाले आणखी सोपे!

फक्त WhatsApp वर “Hi” मेसेज करा आणि काही मिनिटांत घरबसल्या मालमत्ता कर भरणा पूर्ण करा.

३० जून २०२६ पूर्वी संपूर्ण मालमत्ता कर भरून मिळवा ५% सूट!
वेळ वाचवा, रांगा टाळा आणि डिजिटल सेवांचा लाभ घ्या.

WhatsApp Chatbot : 9967611234

आज शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता यांनी भाईंदर पश्चिम येथील राधास्वामी सत्संग नाल्यापासून...
30/05/2026

आज शनिवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी मा. महापौर श्रीमती डिंपल मेहता यांनी भाईंदर पश्चिम येथील राधास्वामी सत्संग नाल्यापासून पाहणी दौऱ्याची सुरुवात करून डी. बी. रियल्टी परिसर, मिरा रोड पूर्व येथील रेल्वे समांतर नाला, जाफरी खाडी, पेणकर पाडा, बापा सीताराम परिसर, महामार्गालगतचे लक्ष्मी बाग व मीनाक्षी नगर येथील नाले, साई पॅलेस परिसर, जे. पी. इन्फ्रा, टाटा पॉवर हाऊस नाला तसेच भाईंदर पूर्व येथील एस. एन. कॉलेज परिसर आणि रेल्वे समांतर नाल्यांची पाहणी केली.

पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबण्याचा त्रास होऊ नये यासाठी नालेसफाईची कामे दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नाल्यांची सखोल स्वच्छता करून काढण्यात आलेला गाळ तातडीने उचलण्याचे निर्देश मा. महापौर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहरातील प्रत्येक भाग पावसाळ्यासाठी सज्ज राहावा, नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि संभाव्य पूरस्थिती टाळता यावी यासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

या पाहणी दौऱ्यात मा. उपमहापौर श्री. ध्रुवकिशोर पाटील, मा. स्थायी समिती सभापती श्री. हसमुख गहलोत, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.



जनगणना २०२७ — विकासाच्या नव्या वाटेचा पाया!आपल्या शहराचा, आपल्या परिसराचा आणि आपल्या भावी पिढ्यांच्या विकासाचा आराखडा अच...
30/05/2026

जनगणना २०२७ — विकासाच्या नव्या वाटेचा पाया!

आपल्या शहराचा, आपल्या परिसराचा आणि आपल्या भावी पिढ्यांच्या विकासाचा आराखडा अचूक जनगणनेवर अवलंबून असतो. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि विविध शासकीय योजनांचे नियोजन जनगणनेतील माहितीच्या आधारे केले जाते.

घरभेटीस येणाऱ्या प्रगणकांना योग्य व सत्य माहिती देऊन सहकार्य करा. लक्षात ठेवा, जनगणना अधिकारी कोणतेही सरकारी कागदपत्र, बँक तपशील किंवा QR कोड स्कॅन करण्याची मागणी करत नाहीत.

🏠 मालमत्ता कर भरण्यासाठी आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही!📱 घरबसल्या, काही मिनिटांत आणि डिजिटल पद्धतीने करा मालमत्ता कर...
29/05/2026

🏠 मालमत्ता कर भरण्यासाठी आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही!
📱 घरबसल्या, काही मिनिटांत आणि डिजिटल पद्धतीने करा मालमत्ता कर भरणा!

My MBMC App, वेबसाईट किंवा WhatsApp Chatbot च्या माध्यमातून सहज करा ऑनलाइन पेमेंट आणि ३० जून २०२६ पूर्वी संपूर्ण मालमत्ता कर भरून मिळवा ५% सूट!

⏳ वेळ वाचवा
☀️ उन्हात फिरणं टाळा
📲 मोबाईलवरूनच करा पेमेंट
💰 आणि मिळवा विशेष सवलतीचा लाभ!
मिरा भाईंदर महानगरपालिका — नागरिकांसाठी अधिक सुलभ, जलद आणि डिजिटल सेवा.

जनगणना म्हणजे केवळ आकडेवारी नाही…ती उद्याच्या विकासाची दिशा ठरवणारी जबाबदारी आहे.आपल्या मुलांच्या शिक्षणापासून ते शहराती...
29/05/2026

जनगणना म्हणजे केवळ आकडेवारी नाही…
ती उद्याच्या विकासाची दिशा ठरवणारी जबाबदारी आहे.

आपल्या मुलांच्या शिक्षणापासून ते शहरातील सुविधा वाढवण्यापर्यंत, प्रत्येक अचूक माहिती महत्त्वाची आहे. जनगणना अधिकाऱ्यांना योग्य माहिती द्या, पण कोणतीही वैयक्तिक आर्थिक माहिती, बँक तपशील किंवा QR कोड शेअर करू नका.

✔️ जागरूक नागरिक बना
✔️ सुरक्षित माहिती द्या
✔️ विकासात सहभागी व्हा

#जनगणना2027

29/05/2026

स्वच्छ मिरा-भाईंदर ही आपली सामूहिक जबाबदारी!🧹

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेला सहकार्य करा, परिसर स्वच्छ ठेवा आणि शहराला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी आपला सहभाग नोंदवा असे आवाहन मा. महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्या वतीने करण्यात येत आहे.

28/05/2026

महाराष्ट्र जनगणना २०२७च्या पुढील टप्प्यास प्रारंभ!

दि. १६ मे २०२६ पासून घरगुती प्रत्यक्ष गणना (Door-to-Door Enumeration) प्रक्रिया सुरू झाली असून ती दि. १४ जून २०२६ पर्यंत चालणार आहे.

जनगणना अधिकारी आपल्या घरी भेट देणार आहेत.आपल्या सहकार्यामुळे अचूक आणि प्रभावी जनगणना पूर्ण होण्यास मदत होईल.

✅ कृपया आवश्यक माहिती व कागदपत्रे तयार ठेवा
✅ अधिकाऱ्यांना योग्य माहिती द्या
✅ जनगणना प्रक्रियेस सहकार्य करा

आपला सहभाग म्हणजे राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान.

चला, जबाबदार नागरिक म्हणून जनगणना २०२७ यशस्वी करूया.

28/05/2026

अजून मालमत्ता कर भरला नाहीये?

तर ही आहे तुमच्यासाठी सुवर्णसंधी! ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरा आणि मिळवा थेट ५% सूट!

आता रांगेत उभं राहायची गरज नाही 👇
📲 घरबसल्या ३ सोप्या मार्गांनी भरणा करा:

✅ My MBMC App डाउनलोड करा
✅ pg.mbmc.gov.in वर ऑनलाइन पेमेंट करा
✅ WhatsApp वर 9967611234 ला "Hi" पाठवा आणि लगेच भरणा करा

आजच पेमेंट करा आणि सूटचा लाभ मिळवा!

Address

Indira Gandhi Bhawan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhayandar West
Bhayandar

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MBMC- Mira Bhaindar Municipal Corporation:

Share