07/04/2026
दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी बेळगाव तालुक्यातील बीजगर्णी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचे गैरप्रकार समोर आले असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिक व ग्रामस्थांनी, मानवाधिकार सहाय्यता संघाच्या कर्नाटक राज्य अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, येत्या १५ दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल आणि ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थ व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.