महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

  • Home
  • India
  • Belgaum
  • महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी शाळा संवर्धन करण्यास कटिबद्ध..! "जय शिवराय" "जय महाराष्ट्र"

03/06/2026

बघा कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी माध्यमातून शिकणाऱ्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी कशाप्रकारे पुस्तकांची छपाई केली आहे.

03/06/2026
💐 हार्दिक अभिनंदन! 💐​बेळगावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे मार्गदर्शक​श्री.दिनेश ओऊळकर  ​यांचे मनःपूर्वक अ...
02/06/2026

💐 हार्दिक अभिनंदन! 💐
​बेळगावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे मार्गदर्शक
​श्री.दिनेश ओऊळकर ​यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
​आर.बी.आय.च्या (RBI) नागरी सहकारी बँक क्षेत्रासाठी स्थापित 'आदर्श उपविधी (मॉडेल बायलॉज) उच्चस्तरीय समितीच्या' अध्यक्षपदी ही नियुक्ती संपूर्ण बेळगाव आणि सहकार क्षेत्रासाठी अत्यंत भूषणावह व अभिमानास्पद आहे.
​ आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस आणि कार्यास अनंत शुभेच्छा!

​महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

01/06/2026

जोपर्यंत बैठका नाहीत,तोपर्यंत धरणे आंदोलनाचा निर्धार कायम : मध्यवर्ती अध्यक्ष प्रकाश मरगाळे

बेळगाव - महाराष्ट्राचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत काल रविवारी बेळगावला आले होते.त्यांना सीमा भागातील मराठी जनतेच्या समस्यांची माहिती दिली. नजीकच्या काळात म.ए.समितीने हाती घेतलेल्या आंदोलनांची माहिती दिली. त्यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन दिले आहे. मात्र जोवर उच्चाधिकार समिती तसेच तज्ञ समिती जेषठ वकीलांची बैठक आयोजित केले जात नाही. तोपर्यंत मुंबईतील धरणे आंदोलना पासून म.ए.समिती माघार घेणार नाही असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी बोलताना केले.

आज सोमवारी सकाळी हिंडलगा येथे कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करून आपले मनोगत व्यक्त करताना मरगाळे पुढे म्हणाले,३ तारखेला बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. 22 तारखेपर्यंत बेळगाव शहरातील मराठी भाषेच्या फलकांसंदर्भात आग्रही भूमिका मांडणार आहोत.प्रश्न न्यायालयात असताना कर्नाटक सरकार आताताईपणा करत आहे.याबाबतची माहिती महाराष्ट्र सरकारलाही देणार आहोत. उच्च अधिकार आणि तज्ञ समितीचे बैठक तात्काळ बोलवावी अशी मागणी करण्यात आली आहे. बैठका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. एका बाजूला अलमट्टी धरणाच्या उंचीसाठी कर्नाटकचे सर्वपक्षीय खासदार एकत्र येऊन लोकसभेत आवाज उठवतात.त्याचप्रमाणे आगामी अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदारांनी सीमा प्रश्नासंदर्भात आणि सीमा भागातील जनतेवर होत असलेल्या अन्याया संदर्भात लोकसभेत आवाज उठवावा याबाबतही आग्रही मागणी करण्यात येणार आहे असे ही मरगाळे यांनी सांगितले.

*१ जून १९८६ च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे महाराष्ट्र एकीकरण युवा सम...
01/06/2026

*१ जून १९८६ च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले

दि. ०१.६.२०२६*कै.राहुल भाऊराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त* समस्त पाटील परिवार नेताजीगल्ली व तानाजी गल्ली येळ्ळ...
01/06/2026

दि. ०१.६.२०२६
*कै.राहुल भाऊराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त* समस्त पाटील परिवार नेताजीगल्ली व तानाजी गल्ली येळ्ळूर यांचेकडून युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
कै. राहुल भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भावपुर्ण आदरांजली.💐💐

Address

Belgaum
590006

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव:

Share