शारदा सार्वजनिक वाचनालय, चलवेनहट्टी

  • Home
  • India
  • Belgaum
  • शारदा सार्वजनिक वाचनालय, चलवेनहट्टी

शारदा सार्वजनिक वाचनालय, चलवेनहट्टी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शारदा सार्वजनिक वाचनालय, चलवेनहट्टी, Library, Chalvenhatti, Belgaum.

नुकतेच नवीन पुस्तके मागवली
30/01/2023

नुकतेच नवीन पुस्तके मागवली

13/10/2017

#वाचावीत_अशी १०१ #पुस्तके

*०१) ययाती* = वि. स. खांडेकर
*०२) वळीव* = शंकर पाटील
*०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर
*०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती
*०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात
*०६) शिवाजी कोण होता*- गोविंद पानसरे
*०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर
*०८) तीन मुले* = साने गुरुजी
*०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे.
*१०) आय डेअर* = किरण बेदी
*११) तिमिरातुन तेजाकड़े*- डॉ. नरेंद्र दाभोलकर
*१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत
*१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे(all book)
*१४) बुद्धाची शप्पंत* - अण्णाभाऊ साठे
*१५) अल्बर्ट एलिस* - अंजली जोशी
*१६) प्रश्न मनाचे* - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर
*१७) समता संगर*- डॉ. नरेंद्र दाभोलकर
*१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू
*१९) ठरलं डोळस व्हायचं*- डॉ. नरेंद्र दाभोलकर
*२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल
*२१) गोपाळ गणेश आगरकर* = ग. प्र. प्रधान
*२२) कुमारांचे कर्मवीर* - डॉ. द. ता. भोसले
*२३) खरे खुरे आयडॉल*- यूनिक फीचर्स
*२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी
*२५) प्रकाशवाटा* - प्रकाश आमटे
*२६) अग्निपंख*- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
*२७) लज्जा* - तसलीमा नसरीन
*२८) दैनंदिन पर्यावरण* - दिलीप कुलकर्णी
*२९) रणांगण* = विश्राम बेडेकर
*३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे
*३१) श्यामची आई* = साने गुरुजी
*३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे
*३३) बि-हाड* - अशोक पवार
*३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे
*३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर
*३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड
*३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर
*३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर
*३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर
*४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर
*४१) झोंबी* = आनंद यादव
*४२) इल्लम* = शंकर पाटील
*४३) ऊन* = शंकर पाटील
*४४) झाडाझडती* = विश्वास पाटील
*४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर
*४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट
*४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात
*४८) इस्त्राइलची शेती*-
*४९) बहाद्दुर थापा* - संतोष पवार
*५०) सेकंड सेक्स* - सिमोन
*५१) आई* = मोकझिम गार्की
*५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी
*५३) बलुत* = दया पवार
*५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर
*५५) स्वामी* = रणजीत देसाई
*५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे
*५७) पांगिरा* = विश्वास पाटील
*५८) पानिपत* = विश्वास पाटील
*५९) युंगंधर* = शिवाजी सावंत
*६०) छावा* = शिवाजी सावंत
*६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई
*६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६४) वावटळ*- व्यंकटेश माडगुळकर
*६५) ग्रेटभेट* - निखिल वागळे
*६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू
*६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती
*६८) वाईज अंड आदर वाईज*
*६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे
*७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे
*७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा
*७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव
*७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे
*७४) गांधीनंतरचा भारत*- रामचंद्र गुहा
*७५) आधुनिक भारताचे निर्माते*- रामचंद्र गुहा
*७६) नापास मुलांची गोष्ट* = अरुण शेवते
*७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे
*७८) महानायक* = विश्वास पाटील
*७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर
*८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
*८१) मिरासदार*- द. मा. मिरासदार
*८२) सुरेश भट यांचे* सर्व कविता संग्रह
*८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
*८४) स्पर्धा काळाशी*- अरुण टिकेकर, अभय टिळक
*८५) बदलता भारत*- भानु काळे
*८६) कोल्हाटयाचं पोरं*- किशोर काळॆ
*८७) राष्ट्र निर्माते वीर लहुजी साळवे* -डॉ.देशमुख
*८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास*- मा. म. देशमुख
*८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी
*९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई
*९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर*- चांगदेव खैरमोडे
*९२) समग्र महात्मा फुले*- राज्य सरकार
*९३) झोत*- रावसाहेब कसबे
*९४) ओबामा* - संजय आवटे
*९५) एकेक पान गळावया*- गौरी देशपाडे
*९६) आई समजुन घेताना*- उत्तम कांबळे
*९७) छत्रपति शाहू महाराज* - जयसिंगराव पवार
*९८) अमृतवेल*- वि. स.

खांडेकर
*९९) महात्म्याची अखेर*-जगन फडणीस
*१००) बुद्ध आणि त्याचा धम्म*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*101) धर्म नसलेली माणसे (निबंध)*-क्रांतीज्योती मुक्तताई साळवे

*हे वाचाल तर विचारत परिवर्तन होणारच*

20/04/2017
शारदा सार्वजनिक वाचनालय आयोजित प्रा. संजय बंड यांच्या व्याख्यानाचे वृत्तांकन दै. सकाळ मधे आले आहे.
14/03/2017

शारदा सार्वजनिक वाचनालय आयोजित प्रा. संजय बंड यांच्या व्याख्यानाचे वृत्तांकन दै. सकाळ मधे आले आहे.

शारदा सार्वजनिक वाचनालया तर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्या सपर्धांचे बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला. य...
08/03/2017

शारदा सार्वजनिक वाचनालया तर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्या सपर्धांचे बक्षिस वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुने म्हणून आमचे मित्र श्री संजयजी बंड हे उपस्थित होते.
प्रथम शारदा वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष अशोक आलगोंडी यानी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि उपस्थित मान्यवराना "शब्दांचे व्यासपीठ" हा दिवाळी अंक भेट देवून स्वागत केले.
संजयजी बंड यानी विध्यार्थ्याना स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करायची याचे मार्गदर्शन केले. प्रथम आपल्यातला न्यूनगंड काढून टाकून जिद्दीने, चिकाटीने अभयासाला लागल्यास यश निश्चित आहे. खेडयातील मुलेच अधिक प्रमाणे या परीक्षा मधे यश मिळवतात. त्यामुळे तुम्हालाही ते शक्य आहे असे प्रतिपादन त्यानी केले.
यावेळी प्रमुख पाहुने म्हणून नवलेखक सागर मरगानाचे, लक्ष्मण बडवानाचे, अशोक भरमा पाटील, नारायण सातेरी पाटील आणि भरमा यल्लाप्पा सनदी आणि गावातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

04/03/2017

💐🍀 *शारदा सार्वजनिक वाचनालय, चलवेनहट्टी*🍀💐


*रविवार दि.५ मार्च २०१७ रोजी ठीक संध्या. ७.३० वा.*
स्थळ- मारुती मंदिर समोर, चलवेनहट्टी, ता. बेळगाव

वाचनालया तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व विध्यार्थ्याना *स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन* कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले आमचे मित्र *श्री संजयजी बंड* हे मार्गदर्शन करणार आहेत.
सर्वानी वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा.

*आपले नम्र*
*श्री अशोक आलगोंडी*
(९०३५३८५९२३)
संस्थापक अध्यक्ष, शारदा सार्वजनिक वाचनालय

02/03/2017

लवकरच आम्ही पुन्हा येत आहोत.......

19/02/2017

" मराठी शाळा हा मराठी भाषेच्या आंदोलनाचा कणा आहे , असं आम्ही कार्यकर्ते मंडळी उठल्याबसल्या म्हणत असतो . पण हे सारं आम्ही कोणाला सांगतो आहोत किंवा आमचं कोण ऐकतं आहे ? १५ जानेवारी २०१७ च्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये विविध राज्यांच्या सचिवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शाळांबाबत शिफारस करणाऱ्या अहवालाबाबतची बातमी आहे . या अहवालात सर्व माध्यमिक शाळांमध्ये येत्या एप्रील पासून इंग्रजी अनिवार्यपणे शिकवलं जावं आणि देशातल्या ६६१२ तालुक्यांमध्ये किमान एक इंग्रजी शाळा सरकारने चालवलेली असावी , असं म्हटलं आहे .
आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले सचिव ही स्वातंत्र्योत्तर भारतातली एक प्रबळ जमात आहे . काही अपवाद वगळता ( सन्माननीय अपवाद असं मी सवयीनं लिहिणार होतो , पण ते इतके कमी आहेत की असन्माननीय ठरण्याचा धोका अधिक आहे.) सचिव मंडळी इंग्रजीच्या बाजूची असतात . तशी सचीव मंडळी सत्तेतल्या माणसाच्या बाजुचीही असतात , पण सचिव कधीच चुकत नसतात . त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्लासुद्धा देशातल्या अतिबुद्धिमान असूनही देशात राहिल्यामुळे देशावर उपकार केलेल्या लोकांचा सल्ला असल्यामुळे तो चुकण्याची शक्यता अजिबात नाही . विशेष म्हणजे त्यांनी हा सल्ला त्यांच्यापेक्षाही शक्तिमान असलेल्या पंतप्रधानांना दिला आहे . त्यामुळे त्यांनी तो स्वीकारला तर तो त्यांच्या पद्धतीने अनपेक्षितपणे आणि धडाक्याने अंमलात येईल . " --- " एक उद्विग्न चिंतन ! -" या डॉ . दीपक पवार , यांच्या शब्द रुची फेब्रुवारी २०१७ - मराठी भाषा विशेषांक मधील लेखातून साभार

माझ्या गोष्टीवेल्हाळ बाराखडीतला एक साहित्यिक पाठ...."वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडल...
27/12/2016

माझ्या गोष्टीवेल्हाळ बाराखडीतला एक साहित्यिक पाठ....
"वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले..." या एकपंक्तीय घटनेची मराठी साहित्यिकांनी कल्पनाविलासाद्वारे कशी मांडणी केली असती याचे हे प्रकटन.

वि. स. खांडेकर-
तप्त सूर्यगोलाची चकाकती दिव्य किरणे आपल्या कोमल तनुवर आनंदाने झेलत कौमुदी विस्तीर्ण वटवृक्षाखाली न उभारता उन्हात उभी होती. जणू ती अग्निपरीक्षा देत होती. जीवनात सदैव काटेरी सन्मार्गाच्या वाटेवरून आपल्या मखमली पावलांनी विनासायास चालत जाणारया वैदेहीला जे चुकले नाही ते आपल्याला कसे चुकेल असा उदात्त हेतू मनी धरून ती उभी होती. उन्ह सावल्यांचे कवडसे तिला न्याहाळताना खुदकन हसत होते. अखेर तिच्या जिद्दीपुढे रविकिरणे ओशाळून गेली. घटप्रभेच्या झिरमिळ्या प्रवाहाचे पाणी तांबूस झाले तेंव्हा तिच्या ध्यानी आले की उन्हे कललीत, आता भास्कर क्षितिजाच्या कुशीत विसावेल. या विचारासरशी तिच्या मनातली घालमेल वाढत गेली, तिने त्या विश्वनिहंत्याचा धावा सुरु केला आणि निमिषार्धात तिला दुरून येणारया सुजितची चाहूल लागली. त्याबरोबर तिच्या हृदयात आनंदाचे कारंजे थुईथुई नाचू लागले.......

जी. ए. कुलकर्णी -
उदास वटवृक्षाच्या लांबत चाललेल्या कभिन्न सावल्या हळूहळू मोठ्या होत होत्या. चिंतेच्या गर्द काजळडोहात आस्ते कदम रुतत चाललेल्या कौमुदीचा धीर सुटत चालला होता. निर्जन वनराईतून वाहत येणारा वारा रानभूल झाल्यागत तिच्याभोवती पिंगा घालत होता. पानांची सळसळ बेचैनीत भर घालत होती. वारयावर हळुवार डोलणारया करडया रंगाच्या पारंब्यात तिचे मनच दोलायमान होऊन गेले होते. अंगाला कंप सुटला होता, ओठ कोरडे पडत चालले होते. दुपारी भेटण्याचा शब्द देणारा सुजित आपल्याला फसवत तर नसेल ना या विचाराने तिचे काळीज वेगाने धडधडत होते. दूर कुठे तरी 'टीट्टी वीटीव टीव'चा आवाज करत टिटव्या ओरडत होत्या, त्या आवाजाने तिला अकारण घाबरल्यासारखे होत होते. हातातल्या पर्सला घट्ट आवळून उभ्या असलेल्या कौमुदीच्या डोळ्यातील बुब्बुळांचे लोलक तिच्या प्रतिक्षेमुळे फुटतील की काय असे वाटत होते आणि इतक्यात तिला दुरून येणारा सुजित दिसला ...

ग्रेस -
पेंगूळलेल्या पायांनी विमनस्क दुपार पुढे सरकत होती. जरठ साधूच्या चिंबटलेल्या शुष्क जटा जमिनीशी लगट करत असाव्यात तशा घुम्या वटवृक्षाच्या तटतटलेल्या पारंब्या मातीला स्पर्शत होत्या. खिन्न बिलोरी डोळ्यांत अल्वार आसमंत विरघळवत उभ्या असलेल्या कौमुदीच्या केसांत माळलेल्या गंधवेडया मोगरयाचा आवेश हलकेच तिच्या तलम केसांत उतरत होता. रानातला सैरभैर झालेला वारा तिच्यापाशी येताच थबकत होता. तिच्या अस्तित्वाचा पुरता आनंद घेऊन गवताच्या पात्यात सूर घेत होता. वळणावळणाच्या वाटेवरची कोवळी दगडफुले दुरूनच मान वेळावून कौमुदीकडे पाहून लाजेने चूर होत होती. गायीच्या डोळ्यातला पाझर घेऊन निळाईच्या रंगात बुडालेला ओसाड माळ तिच्याकडे टक्क पाहत होता. काळाचे काटे ओघळत गेले अन कलत्या सूर्याने कौमुदीकडे डोळे भरून पाहिले, त्याचा रक्तिमा नभात झिरपत गेला. त्याचवेळी लवलवत्या सुर्यबिंबापुढे सुजितची प्रतिमा अवतीर्ण झाली अन कौमुदीच्या मनाला रंगउधाण आले ....

वसंत आबाजी डहाके -
हिरव्यापिवळ्या टोकदार पानांच्या जथ्थ्यात तो वटवृक्ष लगडून गेला होता. एकमेकाच्या खांद्यावर हात गुंफलेल्या त्याच्या चॉकलेटी करडया फांद्या आणि त्यांना लटकणारया लुसलुशीत कोवळ्या डहाळया खुलून दिसत होत्या. हात लोंबते ठेवून उभ्या असलेल्या विरक्त योग्यासारखा तो घनदाट वटवृक्ष अगदी निश्चल उभा होता. त्याच्या सावलीत उभी असणारी गौरवर्णी, कमलनयनी, आरसपानी कौमुदी सुजितच्या प्रतिक्षेत पुरती आरक्त झाली होती. तिच्या कमनीय देहाच्या गारुडात आसमंत रंगून गेला होता. झाडांवरची पाखरे तिला आपल्या डोळ्यात साठवत जागेवर थिजून गेली होती. ओठांच्या पाकळ्या मधुनच उघडत ती हलकेच सुस्कारे सोडत होती. दुपारपासून तिचे मन पुरते अधीर होऊन सुजीतची वाट बघत होते. श्वासाची धडधड वाढतच राहिली, तांबूस प्रकाशाची पखरण करत सुर्यगोल पश्चिमतटास गेला. त्याच क्षणी अंगी गोधुळ घेऊन फिरणारा पवनसखा सुजितची चाहूल घेऊन तिच्या कानात कुजबुजला तेंव्हा तिच्या सर्वांगावर रोमांच उठले ....

व.पु. काळे -
प्रेमाच्या नात्याची उकल करताना कौमुदी स्वतःच त्यात गुंतत गेली होती, आपल्या आयुष्याचा गुंता आपणच केलाय याची जाणीव तिला कासावीस करून गेली. विश्वास आणि प्रेम ही एका गाडीची दोन चाके आहेत, एक जरी निखळून पडले तरी गाडी जागेवर थांबते याची तिला पुरती जाणीव होती. सुजित चांगल्या विचारांचा सुसंस्कारीत तरुण आहे तो आपल्याला फसवणार नाही. शिवाय आपणही त्याला पारखून घेतलेले आहे. आपली निवड चुकणार नाही, हंसाने दाणे तृण अन कावळ्याने मोती निवडले असं आपल्या बाबतीत होणार नाही. सुजीतसोबत घालवलेले क्षण मर्मबंधाची ठेव म्हणून हृदयाच्या कप्प्यात जतन करूनही जगणं शक्य आहे पण विरहाच्या, विश्वासघाताच्या धक्क्यात स्वतःला सावरणं कठीण जाणार आहे याची तिला जाणीव होती. तिचं मन कसं फुलपाखरांच्या रंगीबेरंगी पंखांसारखं नाजूक होतं अन स्फटिकासारखं नितळ होतं, तिच्या मनात जरी डोकावलं तरी लक्ष काजव्यांचे प्रकाशवृक्ष पाहणाऱ्याच्या अंतःकरणात प्रदीप्त होत ! सुजितच्या प्रतिक्षेत हातातील गुलाबाच्या एकेक पाकळ्या हळुवार तोडता तोडता आता देठ आणि काटे उरले होते, रस्त्याकडे नजर लावून गुंग झालेल्या कौमुदीचे बोट गुलाबाच्या काट्यावर जायचा अवकाश की दुरून येणाऱ्या सुजितने तिला आवाज दिला, " कौमुदी ! मी आलोय !'...काटा रुतता रुतता राहिला !!!

मारुती चितमपल्ली -
निलगायींचा रवंथ करत जाणारा संथ कळप हलकेच मार्गस्थ होत जावा तशी दुपार संथपणे पुढे सरकत होती. घटप्रभेचे पाणी आटून नदीपात्रात करडे पिवळे मातकट डोह तयार झाले होते. दुपार टळण्याची वेळ होत आल्याने सांबरांचा एक कळप धूळ उडवत त्यातल्याच एका डोहापाशी दाखल झाला. सांबरांनी पाण्यात तोंड घालताच शांत पाण्याची तंद्री मोडली अन त्यात लक्ष तरंग उठले. असेच विचारतरंग घटप्रभेच्या काठापासून दूर असणारया डेरेदार वटवृक्षाखाली उभ्या कौमुदीच्या मनात उठले होते. तिच्या मस्तकातल्या बाराशिंग्याने धुमाकूळ घातला होता, अनेक शंका कुशंकांनी बेजार होऊन तो नुसताच धडक्या देत होता. मस्तवाल खूर मातीत घासून विचारांचा धुरळा उडवत होता. वडाच्या फांद्यांच्या बेचक्यात दोन चार घरटी होती, त्यातली नवजात पिले माना बाहेर काढून तिच्याकडे टकमका बघत होती. बुंध्यावरून ओघळत आलेल्या डिंकाला मुंगळे लागावेत तसे तिचे झाले होते. भुंग्याने फांदी टोकरत आत खोल घुसावे तशी भीती तिच्या मेंदूला पोखरत होती. सुजित आला की त्याच्या अंगावर वाघिणीसारखी झेपच घ्यायची असं मनोमन ठरवून ती उभी होती. मावळतीला तांबडफुटी व्हायला अन सुजित यायला एकच गाठ पडली. मात्र तो दिसताच बगळ्याने मान वेळावून बसावे तशी ती लाजून मान वेळावून बघत राहिली..

रत्नाकर मतकरी -
रोरावणाऱ्या वारयाच्या रुद्रध्वनीत आपला आवाज मिसळत सुजितने दुरूनच कौमुदीला आवाज दिला आणि सुजितला पाहून कौमुदीच्या अंगावर सर्रकन काटाच आला. सूर्य माथ्यावर आल्यापासून कौमुदी त्या विशाल वडाच्या झाडाखाली उभी होती. त्यानंतर दोनेक तासात सुजित तिथं आला होता. आल्यापासून तो विक्षिप्त वागत होता, त्याच्या बोलण्यात विसंगती होती, देहबोलीत चैतन्य नव्हते. काही तरी हरवलेल्या विचित्र अवस्थेत तो तिच्याशी जेमतेम काही मिनिटं बोलून अचानक काहीतरी आठवल्यागत एकाएकी निघून गेला होता. आता समोर दिसणारया सुजितच्या अंगावरचे कपडे आणि काही वेळापूर्वी येऊन गेलेल्या सुजितचे कपडे वेगळे होते. आताचा सुजित असेल तर मघाशी भेटून गेलेला तो कोण असावा या भीतीने तिच्या मस्तकात जणू खिळेच ठोकले. एकाएकी त्या अजस्त्र वडाच्या झाडावरून शेकडो वटवाघळे पंख फडफडवत उडाली. जीर्ण मळकट पारंब्यांनी कडकड आवाज करत जणू तिच्या गळ्याला विळखाच घातला. अस्ताव्यस्त पसरलेल्या बुंध्याच्या ढोलीतून विचित्र चित्कार कानी आले, आकाशात वीजा कडाडल्या आणि ती तत्काळ तिथून सुजितच्या दिशेने धावत गेली. त्याच्या बाहूत विसावताना भासातली भेसूरता ती विसरून गेली होती .....

व्यंकटेश माडगूळकर –
रणरणती दुपार होती. गावाबाहेरल्या हाळावरच्या जुन्या वडाखाली उभ्या असलेल्या कौमुदीचे चित्त कशातच लागत होते. वारं पिऊन तर्राट झालेलं ते झाड कोष्ट्याच्या माळावरून पालथ्या घागरीसारखं दिसायचे. आजूबाजूला भरड मुरमाची जमीन अन डाव्या अंगाला असणाऱ्या पाझर तलावावरून येणारी गार हवा यामुळे त्या डेरेदार सावलीच्या झाडाखाली कुणीही आलं की त्याला पेंगुळल्यागत व्हायचे. आसपासच्या माळावर गुरं चरायला आणणारे गुराखी दुपारची भाकरी खायला तिथंच यायचे पण आज गावात जत्रा असल्याने कुणी तिथं येणार नाही याची खात्री असल्याने कौमुदी तिथं बिनघोर थांबली होती. दुपारची ओढाळ हवा सरत आली तरी सुजित अजून आला नव्हता त्यामुळे तिला जरा चिंता वाटत होती. दावणीचा दोर ओढून रोजच्या सवयीने तिथं आलेली एक अवचिंदी जाफराबादी म्हैस अन तिच्या मागोमाग शेपूट हलवत आलेले मरतुकडे काळे कुत्रे वगळता भोवताली कुणीच नव्हते. मधूनच आभाळात उडणारा भोरडयांचा थवा अन वारयावर डुलणारी गवताची पाती इतकीच काय ती हालचाल होत होती. दिस जाता जात नव्हता अन डोईवरची उजेडाची उतळी घेऊन सूर्यनारायण मावळतीकडे रवाना झाला. बाभळीच्या बांधावरून दिसणारा काळा ठिपका मोठा होत गेला, तिचं लक्ष तिकडंच होतं. तो सुजितच होता !

मायमराठीला समृद्ध करण्यात अनेक सारस्वतांचे मोलाचे योगदान लाभले आहे. यातील प्रत्येकाची लेखनशैली भिन्न होती. यापैकीच काही दिग्गज साहित्यिकांच्या शैलीचे मला जे आकलन झाले त्यानुरूप लेखन करण्याचा हा छोटासा प्रयत्न. काही चुकले असल्यास रसिक वाचकांनी सांभाळून घ्यावे, लेखन आवडले तर शेअर करायला काहीच हरकत नाही...

- समीर गायकवाड.

25/11/2016

शारदा सार्वजनिक वाचनालय हे आता गावातील सांस्कृतिक केंद्र बनलेलं आहे। गेल्या दोन वर्षांपासून आम्ही वाचनालय सुरळीत चालवत आहोत। विविध कार्यक्रम घेत आहोत. यासाठी वाचनालयाचे सभासद आणि गावातील ग्रामस्थ अतिशय चांगले सहकार्य करत आहेत. त्याबद्दल सर्वांचे आभार मानावे तेवढ कमीच.
पण.........
वाचनालय ज्या इमारतीत आहे त्याचे मालक काही कारणांमुळे खोली खाली करायला सांगितल्यामुळे दोन महीने वाचनालय बंद ठेवायची नामुष्की आमचयावर आली. पण आता दुसऱ्या खोलीची व्यवस्था झाल्याने लवकरच वाचनालय पुन्हा सुरु करत आहोत, याचा आम्हाला आनंद हॉट आहे.

Address

Chalvenhatti
Belgaum
591143

Telephone

9035385923

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शारदा सार्वजनिक वाचनालय, चलवेनहट्टी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category