05/08/2026
स्व. अजितदादांच्या विचारांना अभिवादन... पर्यावरण संवर्धनाचा संकल्प!
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमचे प्रेरणास्थान स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज हट्टा, ता. वसमत येथील जिल्हा परिषद शाळेत माझ्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून विकासासोबतच पर्यावरण संवर्धन हीदेखील आपली सामूहिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. स्व. अजितदादांनी दाखविलेल्या जनसेवा आणि विकासाच्या मार्गावर चालत, हिरवा आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांसमवेत वृक्षसंवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने लावलेले झाड जपण्याचे आवाहन केले.
"एक वृक्ष म्हणजे भावी पिढीसाठी दिलेली अमूल्य भेट. चला, स्व. अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करत हरित महाराष्ट्र घडवूया!"
Sunetra Ajit Pawar NCPSpeaks_Official
#स्व_अजितदादा_पवार #जयंती_विशेष #वृक्षारोपण #पर्यावरण_संवर्धन #हरित_महाराष्ट्र #एकवृक्षहजारोश्वास #जनसेवा #विकास #वसमत